तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा |Traffic Challan Check

How to Check E Challan Status : तुम्ही वाहन चालवत असताना चुकून एखादा ट्रॅफिक नियम मोडलात आणि तिथे तुम्हाला वाहतूक पोलिसांनी पाहिलं नाही तर खूश होऊ नका, कारण रस्त्यालगतच्या कॅमेऱ्यात तुमची ही चूक कैद झालेली असणार. त्यामुळे तुमच्या नावे इलेक्ट्रॉनिक चालान जारी होऊ शकतं.

तर नमस्कार मित्रांनो, आपण आपले गाडी चार चाकी किंवा दुचाकी घेऊन कुठे बाहेर गेलो असेल, आणि आपली गाडी सिग्नल वरती किंवा नो पार्किंग मध्ये उभी असेल, किंवा काही वाहतुकीचे नियम आपण तोडले असतील तर आपल्या गाडीवर ऑनलाइन दंड  Traffic Challan Check  रेकॉर्ड केला जातो. आपल्या गाडीने नियम तोडले आहेत का? आपल्या गाडीला काही दंड भरावा लागणार आहे का? दंड असेल तर तो किती आणि कुठे भरायचा आहे? यासंबंधीची सर्व माहिती आपण  लेखामध्ये घेणार आहोत.

E challan चेक करण्यासाठी महा ट्रॅफिक ॲप डाऊनलोड करावे लागेल हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

अनेकदा वाहन चालकाला माहिती देखील नसतं की त्याच्या नावे चालान जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी वाहन चालवत असाल तर अधून मधून पेंडिंग चालान तपासत जा. कारण तुमच्या नावे जारी केलेलं चालान तुम्ही वेळेवर भरलं नाही तर तुम्हाला कोर्टात जाऊन दंड भरावा लागेल. यासाठी तुम्हाला कोर्टाचे हेलपाटे मारावे लागू शकतात. जर तुम्हाला कोर्टाचे हेलपाटे मारायचे नसतील तर तुम्ही ऑनलाईन चालान जमा करायला हवं. आज आम्ही तुम्हाला ऑनलाईन चालान कसं भरायचं याची माहिती देणार आहोत.


वाहतूक पोलिसाद्वारे लावलेले फाईल ऑनलाईन कसा चेक करायचा? ! 
Check e Challan Online : आपल्या गाडीवर किती दंड बसलेला आहे हे सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण पाहू शकतो. ही माहिती आपण सविस्तरपणे कसे पाहायचे हेच आता आपण जाणून घेऊया. त्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

जर तुमच्याकडे दुचाकी किंवा चार चाकी किंवा कोणत्याही वाहन असेल तर तुमच्या वाहनावर लावला जाणारा कोणत्याही प्रकारचा दंड आणि त्याची जाणीव असणे आवश्यक आहे. पूर्वी कोणत्याही प्रकारच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी वाहतूक पोलीस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओला भेट द्यावी लागत असे. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाल्यामुळे आपल्या कोणत्याही प्रकारच्या वाहनावरील दंड तपासणे Traffic Challan Check अगदी सोपे झाले आहे.

इ चालान चेक करण्यासाठी महा परिवहन च्या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा????

आज आपण आपल्या वाहनावरील कोणताही प्रकारचा दंड ऑनलाईन कसा तपासायचा आहे? याची माहिती घेऊया.
भारतातील प्रत्येक राज्याच्या परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर, तुमच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी ऑनलाईन सेवा देण्यात येतात. त्यासाठी त्या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि त्याखाली दिलेला कॅपचा कोड टाकावा लागेल. आणि बाकीची माहिती तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनावर काही दंड Traffic Challan Check आकारण्यात आला आहे की नाही? हे तुम्ही पाहू शकता.
महाराष्ट्र सोबतच संपूर्ण देशभरात दंड लावण्याची ही प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे वाहतिक पोलीस तुम्ही कोणताही नियम तोडला तर तुम्हाला न थांबवता तुमच्या गाडीचा नंबर आणि तुमचा एक फोटो काढून त्यावर दंड लावतात. काही वेळा महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून तुम्हाला अनेक कारणांमुळे दंड आकारला जातो. आणि मग त्यानंतर महाराष्ट्र वाहतूक पोलिसांकडून याबाबत तुमच्या फोनवर एक मेसेज येतो. आपल्याला कोणत्या कारणासाठी हा दंड लावलेला आहे हे आपण खाली लिंक वर जाऊन तपासू शकता.

रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण ...
महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून मिळणार 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार 2024

महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून मिळणार 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार 2024

महाराष्ट्र मध्ये आता कर्जमाफी होण्याची शक्यता दिसून येत आहे महाविकास ...
लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या सामाजिक, आर्थिक ...
शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाची शिलाई मशीन योजना ही एक कल्याणकारी योजना आहे ...
स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न हे तृणधान्य पीक आहे जे प्रामुख्याने आहारामध्ये वापरले ...
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया पूर्वी खूप किचकट आणि वेळखाऊ होती ...

1 thought on “तुमच्या गाडीवर असलेला दंड ऑनलाईन चेक करा |Traffic Challan Check”

Leave a Comment