शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना|gopinath munde accidental insurance.

महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित होती.

पण, या योजनेत विमा कंपनीकडून दावे वेळेत निकाली न काढणं, अनावश्यक त्रुटी काढून विमा नाकारणं या बाबी समोर आल्या होत्या.

त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं या योजनेत सुधारणा केली आहे.

त्यानुसार, आता राज्यात ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांस 2 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे.

अपघातात शेतकऱ्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यासही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

अपघातात 2 अवयव निकामी होऊन शेतकऱ्याला कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये, तर 1 अवयव निकामी होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? अपघाताचे कोणते प्रकार मदतीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत? आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल? या प्रश्नांची उत्तर आता आपण जाणून घेणार आहोत.

या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

पात्रता काय?

  • ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकणार आहेत.
  • पण, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचं सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील कोणताही 1 सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा 10 ते 75 या वयोगटातील असावा.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

हे अपघात लाभासाठी पात्र

शेतकऱ्याचा अपघात पुढील कारणांमुळे झाला असल्यास या योजनेअंतर्गत त्याच्या कुटुंबाला अर्ज करता येणार आहे.

  • रस्ता किंवा रेल्वे अपघात
  • पाण्यात बुडून मृत्यू
  • जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा
  • विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
  • वीज पडून मृत्यू
  • खून
  • उंचावरून पडून झालेला अपघात
  • सर्पदंश व विंचूदंश
  • नक्षलाईटकडून झालेल्या हत्या
  • जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू
  • बाळंतपणातील मृत्यू
  • दंगल

या योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना

‘हे’ अपघात अपात्र

पुढील अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अंपगत्व आल्यास ते या योजनेसाठी ग्राह्य धरलं जाणार नाही.

  • नैसर्गिक मृत्यू
  • योजना सुरू होण्यापूर्वीचे अपंगत्व
  • आत्महत्येचे प्रयत्न किंवा जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करुन घेणे
  • गुन्ह्याच्या उद्देशानं कायद्याचं उल्लंघन करताना झालेला अपघात
  • अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात
  • भ्रमिष्टपणा
  • शरीरांतर्गत रक्तस्राव
  • मोटार शर्यतीतील अपघात
  • युद्ध
  • सैन्यातील नोकरी

Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

नमस्कार मित्रानो, Dhani App वरून कर्ज कसे घ्यावे? Dhaniअँप्स लाखो ...
Maharashtra Shochalay Anudan Yojana | महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

Maharashtra Shochalay Anudan Yojana | महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र मध्ये सरकारकडून शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये इतकी अनुदान मिळत ...
स्लाईस पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करा |slice personal loan app download

स्लाईस पर्सनल लोन ॲप डाऊनलोड करा |slice personal loan app download

स्लाईस पर्सनल लोन ॲप मधून लोन मिळवण्यासाठी स्टेप बाय स्टेप ...
TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital पर्सनल लोन

TATA Capital Personal Loan 2023 : अनेकदा गरजेच्यावेळी आपल्याला पैशांची ...
कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

सोप्या पद्धतीने कोटक बँकेत खाते काढण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेची प्रक्रिया ...
भूमी अभिलेख नवीन नियम | दोन-तीन गुंठे जमीन अशा प्रकारे खरेदी विक्री करता येणार | land record Maharashtra

भूमी अभिलेख नवीन नियम | दोन-तीन गुंठे जमीन अशा प्रकारे खरेदी विक्री करता येणार | land record Maharashtra

गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या ...

Leave a Comment