पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी कशी करायची | pm Kisan new farmer registration.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला.

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आज 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 20 हजार कोटींहून अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.

पण, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर PM-Kisan योजनेसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे.

पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

आपण PM-Kisan किसान योजना काय आहे, या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, PM-Kisan निधीचा हप्ता आपल्या बँक खात्यात जमा झाला आहे की नाही, हे कसं बघायचं, इतकंच नाही तर आधार कार्ड संबंधित माहितीत दुरुस्ती कशी करायची, याची माहिती जाणून घेणार आहोत.

सुरुवातीला पाहूया PM-Kisan योजना काय आहे ते.

PM- Kisan योजना

PM- Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली.

या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.

पण, मग या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरतो, असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. तर या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात.

सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.

या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

असं असलं तरी घटनात्मक पदावरील व्यक्ती (राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ.) आजी-माजी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, महापौर), आजी-माजी सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजीनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार यांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे.

प्रातिनिधिक फोटो

आता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा add या पर्यायावर क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता.

ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर “[X]I certify that all the given details are correct” याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या डब्ब्यात टीक करायचं आहे

त्यानंतर तुम्ही Self -Declaration Form* वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, करदाते नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते.

सगळ्यात शेवटी सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, *****हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. पुढील मंजूरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.

पी एम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करायची असेल तर खालील बटणावर क्लिक करा.

एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता.

त्यासाठी फार्मर कॉर्नर मधील status of self registered or csc farmer या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि captcha टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तिथं पाहायला मिळतं. यात सगळ्यात शेवटी नोंदणीची तारीख आणि फॉर्मचं स्टेटस दिलेलं असतं.

आता पाहूया पीएम-किसान योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे कसं बघायचं ?

हप्ता जमा झाला की नाही?

तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.

ते कसं तर यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.

आतापर्यंत PM-Kisanचे 9 हप्ते सरकारनं जारी केले आहेत. त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्याला मिळाले, त्याविषयीची माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.

शेती

आधार संबंधित दुरुस्ती कशी करायची?

पीएम-किसान योजनेत नाव नोंदवताना आधार कार्डसंबंधीची माहिती चुकली असेल, तर दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नरमधील Edit Aadhar Failure Record या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर आधार क्रमांक आणि captcha टाकून सर्च या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

त्या पेजवर आधार कार्डवर जसं नाव आहे, तसंच तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही केलेली दुरुस्ती तिथं नोंद होईल.

ढोबळी मिरची लागवड संपूर्ण माहिती |सिमला मिरची लागवड तंत्रज्ञान .

ढोबळी मिरची लागवड संपूर्ण माहिती |सिमला मिरची लागवड तंत्रज्ञान .

शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची म्हणूनही ओळखले जाणारे शिमला मिरची, ...
हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स डाऊनलोड करा. 1.हवामान ...
Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ...
आता गूगल पे ॲप मधून पर्सनल लोन मिळवा | get personal loan using Google pay application

आता गूगल पे ॲप मधून पर्सनल लोन मिळवा | get personal loan using Google pay application

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा सुरक्षितपणे पैशाची ऑनलाईन ...
मोफत भांडी योजना महाराष्ट्र | कामगार योजना महाराष्ट्र संपुर्ण माहिती

मोफत भांडी योजना महाराष्ट्र | कामगार योजना महाराष्ट्र संपुर्ण माहिती

कामगार योजनेअंतर्गत मोफत भांडी मिळण्याबाबत संपूर्ण माहिती भारतामध्ये असंख्य कामगार ...
कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

सोप्या पद्धतीने कोटक बँकेत खाते काढण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेची प्रक्रिया ...
युट्युब चॅनेल कसे तयार करायचे |How to Start Youtube Channel in Marathi.

युट्युब चॅनेल कसे तयार करायचे |How to Start Youtube Channel in Marathi.

नमस्कार मित्रांनो, मराठी स्पिरिट वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या ...
दामिनी अॅप

दामिनी लाइटनिंग ॲप कसे वापरावे | how to use damini lightning app.

दामिनी लाइटनिंग ॲप हे एक शक्तिशाली साधन आहे जे वापरकर्त्यांना ...

Leave a Comment