पी एम किसानचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार|PM Kisan 15th Installment

PM Kisan Samman Nidhi 15th Installment : पंतप्रधान किसान योजनेच्या 15 हफ्ता जमा होण्याची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

PM Kisan Yojana Installment Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची (Good News for Farmenrs) बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा 15 वा हफ्ता मिळण्यासाठीची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्याची रक्कम जमा होणार आहे. पण त्याआधी लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव तपासा. यासोबतच जर तुम्ही ईकेवायसी केलं नसेल तर, ते करणं आवश्यक आहे.

शेतकऱ्यांसाठी खूशखबर

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सांगितलं जात होते. आता दिवाळी संपल्यानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा 15 व्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 15 वा हफ्ता

केंद्र सरकारकडून लवकरच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता जारी करण्यात येईल. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) सुरू केली होती. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पीएम किसान योजनेसाठी महत्वाचे

15 नोव्हेंबर ला केंद्र सरकार 15 वा हप्ता जारी करणार आहे. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) करणं बंधनकारक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केलं नसेल तर लगेच करुन घ्या.

पी एम किसान चा पंधरावा हप्ता मिळवण्यासाठी इ केवायसी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

‘या’ दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा हफ्ता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 ला देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे. जर तुम्हीही पीएम किसानच्या 15 व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर लाभार्थी यादीत तुमचे नाव एकदा नक्की तपासा.

गावानुसार लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठी भेट

पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी 7200 कोटी रुपयांच्या विविध योजनांची पायाभरणी करणार आहेत. त्यासोबतच अनेक योजनांचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी PM किसान योजनेचा 15 वा हप्ता म्हणून 18 हजार कोटी रुपये जारी करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 15 वा हफ्ता जमा होईल.

लाभार्थी यादीत तुमचं नाव तपासा

  • पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या 
  • पेमेंट सक्सेस टॅबच्या खाली तुम्ही भारताचा नकाशा पाहू शकाल.
  • उजव्या बाजूला पिवळ्या रंगाचा टॅब डॅशबोर्ड दिसेल, त्यावर क्लिक करा
  • तुम्हाला तुमचा संपूर्ण तपशील डॅशबोर्ड टॅबवर भरा.
  • राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायत निवडा.
  • यानंतर तुम्ही तपशील निवडू शकता.

या योजनेची स्थिती पाहा

  • पीएम किसान वेबसाइटला https://pmkisan.gov.in/  भेट द्या
  • ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ (Know Your Status) या पर्यायावर क्लिक करा
  • नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. 
  • Get data वर क्लिक करा
  • आता तुम्हाला स्टेटस दिसेल. ज्यामुळे तुम्ही लाभार्थी यादीत आहात की नाही हे स्पष्ट होईल.

सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

Kusum Solar Pump Price नमस्कार शेतकरी बांधवानो, केंद्र सरकारच्या सौर ...
जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज करा.

जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज करा.

जमीन अनुदान योजनेचा अर्ज PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन ...
रोटावेटर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

रोटावेटर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी ...
गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना 2023 | gay mhais sheli mendhi palan anudan yojna Maharashtra.

गाय म्हैस शेळी पालन अनुदान योजना 2023 | gay mhais sheli mendhi palan anudan yojna Maharashtra.

गाय,म्हैस,शेळी,मेंढी,कुकुटपालन,तलंगा,सुधारित पिल्ले अनुदान योजना | Gai Mhais Sheli Mendhi Palan ...
Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview personal loan application| मनीव्यू एप्लीकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करा.

Moneyview हे ॲप्लीकेशन मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक ...
मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळवा 90 टक्के अनुदान | Mini Tractor anudan Yojana

मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळवा 90 टक्के अनुदान | Mini Tractor anudan Yojana

Mini tractor anudan yojna मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा ...

Leave a Comment