Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल. | Ayodhya mandir live.

राम मंदिर ट्रस्टचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अधिकृत अकाउंट तयार करण्यात आले आहे.

Ayodhya : राम प्रतिष्ठापना सोहळ्याचे लाइव्ह प्रसारण; मोबाईल, टीव्हीवर कसे पहाल.

अयोध्येत (Ayodhya) भव्यदिव्य राम मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारीला साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या दिवशी जगातील अनेक मान्यवर व्यक्ती या दिवशी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. जगभरात असेही लाखो रामभक्त आहेत ज्यांना ‘याची देही याची डोळा’ हा कार्यक्रम इच्छा असूनही प्रत्यक्ष पाहता येणार नाही, अशा रामभक्तांना घरबसल्या किंवा ते जिथे असतील तिथे हा कार्यक्रम मोबाईल अथवा टीव्हीवर पाहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता येईल. दूरदर्शन, डीडी न्यूज,  यू ट्यूब वाहिन्या याचे थेट प्रसारण करणार आहेत.  टीव्हीवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा कसा पाहायचा?

आज तक वरील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पहा.????

– जर तुम्हाला हा कार्यक्रम टीव्हीवर पाहायचा असेल तर २२ जानेवारीच्या सकाळपासून दूरदर्शन पाहू शकता. या दिवशी सकाळपासून दूरदर्शनच्या बहुभाषिक वाहिनीवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोहळ्याचे थेट प्रसारण दाखवण्यात येणार आहे.

– हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहील. तुम्ही याला 4K HDRमध्येदेखील पाहू शकता.

मराठीतून राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पहा.????

प्राणप्रतिष्ठापना सोहळा पाहण्याचे विविध पर्याय –

  • दूरदर्शनच्या यू ट्यूब वाहिनीवर राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
  • – मोबाईलवर जिओ सिनेमा अॅप डाउनलोड करा. जिओ सिनेमा अॅपमध्ये ‘प्राणप्रतिष्ठा’ नावाची लिंक असेल. त्यावर क्लिक करून हा भव्य सोहळा पाहू शकाल.
  • – एक्स (जुने नाव ट्विटर) वर रामजन्मभूमी ट्रस्ट नावाचे खाते फॉलो करू शकता. या खात्यावर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची प्रत्यक्ष अद्ययावत माहिती दिली जाईल.
  • – डीडी न्यूज या सोहळ्याचे व्हिडियो आणि छायाचित्रे शेअर करणार आहे.
  • – राम मंदिर ट्रस्टचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अधिकृत अकाउंट तयार करण्यात आले आहे. लाईव्ह अपडेट्ससाठी तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl  वेळापत्रक 2024.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl वेळापत्रक 2024.

22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 ...
Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

Jamin Kharedi Anudan Yojana जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 100% अनुदान

राज्यातील भूमिहीनांना, शेतमजुरांसाठी landless, agricultural labourers एक आनंदाची बातमी आहे ...
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली ...
सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती | Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती | Sukanya Samriddhi Yojana

केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत ...
ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

प्रत्येक शेतकऱ्याची शेजाऱ्या बरोबर काही ना काही तक्रार असते तक्रार ...
ट्रॅक्टर साठी बिनव्याजी कर्ज योजना |आण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना.

ट्रॅक्टर साठी बिनव्याजी कर्ज योजना |आण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना.

Annasaheb Patil Tractor Yojana | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ...

Leave a Comment