टोमॅटो शेती साठी खत व पाणी व्यवस्थापन

खत व्यवस्थापन :

  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन :   माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत.  अ) सेंद्रिय खते ः  प्रतिहेक्‍टर २० टन शेणखत व २०० किलो निंबोळी पेंड. ब) रासायनिक खते ः  मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी हेक्‍टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद व १५० किलो पालाश. तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्‍टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश घ्यावे.  याशिवाय संकरीत व सुधारीत आणि सरळ वाणासाठी हेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २५ किलो मॅगनीज सल्फेट, ५ किलो बोरॅक्‍स आणि २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.  क) जैविक खते ः  एकरी २ किलो ॲझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जीवाणू हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. या व्यतिरिक्त सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावेत.

पाणी व्यवस्थापन :

  पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.  हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व त्यामानाने चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.  लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे.  पिकांच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे.  ठिबक संचामधून पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे.  फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे या समस्या निर्माण होतात.  पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.  पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

इलेक्ट्रिक मोटर पंप अनुदान योजना 2023, असा भरा ऑनलाईन फॉर्म.🔴 Electric Motor Anudan Yojana.

मोटर पंप योजना महाराष्ट्र |motar pump yojna Maharashtra

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही मोटर पंप योजनाचा लाभ ...
द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी |खरड छाटणी नियोजन.

द्राक्ष बागेच्या खरड छाटणीची पूर्वतयारी |खरड छाटणी नियोजन.

द्राक्ष काढणीनंतर खरड छाटणीच्या पूर्वतयारीची आवश्यकता फळ छाटणीनंतर द्राक्ष तयार ...
मागेल त्याला शेततळे योजना 2023

मागेल त्याला शेततळे योजना 2023

शेततळे योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मागेल त्याला शेततळे ...
पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आज जमा झाला|केवायसी केली आहे का नाही चेक करा.

पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आज जमा झाला|केवायसी केली आहे का नाही चेक करा.

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारे ...
एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल ...
गावानुसार मतदार याद्या पाहा, तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा.

गावानुसार मतदार याद्या पाहा, तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा.

नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या गावातील सर्व वॉर्डातील मतदारांची यादी ...
फ्री सिलाई मशीन योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया.

फ्री सिलाई मशीन योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया.

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ...
बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

कसा करणार अर्ज ? Biogas subsidy scheme संबंधित पशुपालकाने आवश्यक ...

Leave a Comment