मिरची वरील थ्रिप्स नियंत्रण | मिरची पिकावरील थ्रिप्स

मित्रांनो थ्रिप्स हे बऱ्यापैकी सर्वच पिकांमध्ये आढळते. काही पिकांमध्ये याचे नुकसान होत नाही पण काही पिकांमध्ये हे भरपूर नुकसान करून जाते. मिरची पिकावर थ्रिप्स हे भरपूर प्रमाणात आढळते व यामुळे याचे नुकसान देखील करते.

मिरची वरील थ्रिप्स

मित्रांनो मिरची या पिकावर ट्रिप्स हे इतर कीड किंवा रोगापेक्षा सर्वात जास्त त्रास देते. या किडीसाठी मिरचीवर सर्वात जास्त औषधांचा खर्च करावा लागतो. तसेच थ्रिप्स हे मिरची पिकाचे जवळजवळ १०० टक्क्यांपर्यंत नुकसान करू शकते. त्यामुळे मिरची पिकांमधील थ्रिप्स नियंत्रण करणे खूपच गरजेचे आहे. मिरची पिकावर ती एकदा तरी चा अटॅक जास्त प्रमाणात जर झाला तर ट्रीपला पुन्हा कव्हर करणे खूपच अवघड जात असते. मिरची पिकावर चुरडा मुरडा किंवा बोकड्या या रोगाची सुरुवात थ्रिप्स मुळेच होत असते. थ्रिप्समुळे इतर व्हायरसचे देखील प्रसारण एका झाडातून दुसऱ्या झाडात होते.

यामुळे मित्रांनो थ्रिप्स या किडीला नियंत्रित करणे खूपच गरजेचे आहे. जर आपण या किडीला नियंत्रित केले नाही तर हे आपल्या पिकाचे नुकसान खूपच जास्त करते. यासाठी थ्रिप्स येऊ नये म्हणून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

थ्रिप्स या किडीचे जीवन चक्र

थ्रिप्स या किडीचा जीवन काळ सरासरी 30 ते 35 दिवसांचा असतो. यामध्ये ती चार ते पाच अवस्थांमधून पुढे जाते. पहिली अवस्था ही अंडी अवस्था असते. या अवस्थेमध्ये ही सात ते आठ दिवस त्यानंतर दुसऱ्या अवस्थेमध्ये ही लारवा स्टेजला असते. यावेळी थ्रिप्स ही लहान अळीसारखी असते. ही थ्रिप्स ची अवस्था जवळजवळ आठ दिवस असते. त्यानंतर ही थ्रिप्स सुतावस्थेमध्ये जाते. यावेळेस थ्रिप्स आठ दिवस आपला जीवन काळ जमिनीमध्ये काढते. ही देखील अवस्था आठ ते दहा दिवसांची असते. त्यानंतर शेवटची अवस्था म्हणजेच प्रौढ थ्रिप्स ची अवस्था असते. यावेळी थ्रिप्स कोशावस्ते मधून बाहेर पडल्यानंतर थ्रिप्स ला पंख फुटलेले असतात. यावेळीच थ्रिप्स प्रजनन करते व अंडी देते. व त्यानंतर थ्रिप्स मरून जाते. ही अवस्था जवळजवळ आठ दिवसांची असते. अशाप्रकारे थ्रिप्सचे जीवन चक्र असते.

मिरची पिकावर थ्रिप्स येऊ नये यासाठीचे नियोजन

मिरची पिकाची लागवड करत असताना उन्हाळ्यात जमीन चांगली तापवलेली असावी .मिरची पिकावरती थ्रिप्स येऊ नये यासाठी आपल्या प्लॉटच्या चारी बाजूंनी शेडनेट लावावे. या शेडनेटची उंची दहा फूट इतकी असावी. मिरचीच्या प्लॉटमध्ये पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत. तसेच एकरामध्ये दोन प्रकाश सापळे लावावेत. मिरची पिकावर ट्रिप्स येण्याअगोदर म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह कीटकनाशकांचे स्प्रे घ्यावेत. थ्रिप्स हे कोवळ्या फुटी तसेच कोळी फळे फुले व पाणी यांच्यावर जास्त अटॅक करत असते, त्यामुळे आपला प्लॉट हा जास्तीत जास्त कोवळा राहू नये याकडे लक्ष द्यावे. यासाठी सिलिकॉन व पोटॅश चा वापर करावा. नायट्रोजन व झिंक चा वापर थ्रिप्स नियंत्रित ठेवण्यासाठी कमी करावा. व जर याचा वापर करावाच लागणार असेल तर नायट्रोजन सोबत फॉस्फरस व पोटॅश सोबत द्यावे. कीटकनाशकांची फवारणी करत असताना चांगले कव्हरेज येत आहे का या गोष्टीकडे लक्ष द्यावे.

आलेले थ्रिप्स नियंत्रणात आणण्यासाठी काही मुद्दे

जर आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये थ्रिप्सचा अटॅक झालेला असेल तर त्याला नियंत्रित करणे खरंतर खूप कठीण जाते. पण चांगले नियोजन व काटेकोरपणाने व्यवस्थापन केल्यास आपण थ्रिप्सला नियंत्रित करू शकतो. यासाठी आपण थ्रिप्स नियंत्रित करण्यासाठी खालील मुद्द्यांचा वापर करावा.

थ्रिप्स नियंत्रित करण्यासाठी आपण जी कीटकनाशके वापरणार आहोत त्या कीटकनाशकांसोबत आपण निम ऑइल चा वापर करायचा आहे, कारण निम ऑइल हे अंडी नाशक म्हणून काम करते व याच्या कडवटपणामुळे थ्रिप्स हे आपल्या प्लॉटवर जास्त प्रमाणात अटॅक करत नाही. जर आपल्या प्लॉटमध्ये थ्रिप्स ही भरपूर प्रमाणात आलेली असेल तर आपण थ्रिप्स साठी चांगल्या फवारण्या एक दिवस आड एक अशा तीन फवारण्या घ्याव्या लागतील. यामुळे याचा फायदा असा होईल की एखादा ना एखाद्या फवारणी मध्ये थ्रिप्स संपर्कात येऊन मरण पावेल. या फवारण्या घेत असताना औषधाचे कव्हरेज हे सर्व ठिकाणी यायला हवे. यासाठी जास्त पाण्याचा वापर करावा. थ्रिप्स साठी आपण जास्त प्रमाणामध्ये आंतरप्रवाही औषधांचा वापर करायला हवा, कारण आंतरप्रवाही औषधे पानांच्या वरती जरी फवारणी असली तर ती आंतरप्रवाही होऊन पानांच्या खाली बसलेल्या थ्रिप्स पर्यंत पोहोचतात व त्यांच्यावर परिणाम करतात. थ्रिप्स नियंत्रणासाठी ची फवारणी करत असताना आपण फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करायला हवी, यावेळेस थ्रिप्स हे पानांवर आलेली असते दुपारच्या काळामध्ये व जास्त तापमानाच्या वेळेस थ्रिप्स हे दडून बसलेले असते, यामुळे ते औषधांच्या संपर्कात येत नाही.

थ्रिप्स नियंत्रणासाठी ची चांगली औषधे

थ्रिप्स नियंत्रणासाठी चांगला रिझल्ट देणारी औषधे ही खालील प्रमाणे आहेत.

कराटे १ मिली प्रति लिटर + ॲक्टरा ०.५ ग्रॅम प्रति लिटर.

लेसेंटा ५० ग्रॅम प्रति एकर किंवा ०.२० ग्रॅम प्रति लिटर

रिजेन्ट २ मिली प्रति लिटर

डेलिगेट १२० ते १५० मिली प्रति एकर किंवा ०.७५ मिली प्रति लिटर.

बेल्ट एक्सपर्ट ०.४ मिली किंवा १०० मिली प्रति एकर.

स्प्रिंटॉर १०० मिली प्रति एकर किंवा ०.३० मिली प्रति लिटर

ब्रोफ्रेया ५० ग्रॅम प्रति एकर किंवा ०.१५ मिली प्रति लिटर.

थ्रिप्स नियंत्रणासाठीची इतर औषधे

रेकॉर्ड ०.५ ग्रॅम प्रति लिटर किंवा १५० ग्रॅम प्रति एकर .

बेनेव्हिया २५० मिली प्रति एकर किंवा १ मिली प्रति लिटर .

प्रोक्लेम ०.३० ग्रॅम प्रति लिटर किंवा १०० ग्रॅम प्रति लिटर.

कॉन्फिडॉर ०.६० मिली प्रति लिटर किंवा २०० मिली प्रति एकर.

कराटे १ मिली प्रति लिटर.

या कीटकनाशकांपैकी कोणतीही कीटकनाशके आपण टप्प्याटप्प्याने दोन ते तीन दिवसांच्या गॅपने फवारावीत. जेणेकरून आपल्याला थ्रिप्स नियंत्रण होण्यास मदत होईल.

शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

अति उच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरता सुधारित धोरणास ...
ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे | pan card apply online in marathi

ऑनलाइन पॅन कार्ड कसे काढावे | pan card apply online in marathi

आज आम्ही तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पॅन कार्ड कसे काढावे हे ...
पी एम किसान लाभार्थी स्टेटस

पी एम किसान लाभार्थी स्टेटस

वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा PM किसान (वेबसाईटवर ...
बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज /नोंदणी प्रक्रिया

अर्ज करण्याची प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण योजना 2023 साठी अर्ज ...
Voter helpline ॲप द्वारे मतदान कार्ड काढा. |Apply new voter ID card using voter helpline app.

Voter helpline ॲप द्वारे मतदान कार्ड काढा. |Apply new voter ID card using voter helpline app.

मतदान कार्डसाठी तयार करण्याची प्रक्रिया Apply New Voter ID Card ...
पी एम किसानचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार|PM Kisan 15th Installment

पी एम किसानचा १५ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार|PM Kisan 15th Installment

PM Kisan Samman Nidhi 15th Installment : पंतप्रधान किसान योजनेच्या ...
मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator.

मोबाईल वरून जमीन कशी मोजावी |मोबाईल वरून जमीन मोजण्यासाठी नवीन एप्लीकेशन|land area calculator.

मोबाईलवरून जमीन मोजण्याची सोपी पद्धत! आता जमीन मोजा मिनिटांत! Jamin ...
Kreditbee पर्सनल लोन ॲपद्वारे लोन मिळवा

Kreditbee पर्सनल लोन ॲपद्वारे लोन मिळवा

१) Kreditbee Personal loan App डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक ...

Leave a Comment