पी एम किसान योजनेमध्ये नाव नोंदविण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • एक – या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकतो. यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स लागते.
  • CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
  • शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.

ऑनलाईन नोंदणी अशी करा…

पी एम किसान च्या वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

किंवा

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला pm kisan असं गुगलवर सर्च करावं लागेल. त्यानंतर PM-Kisan Samman Nidhiची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.

त्यानंतर उजवीकडे तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की 7 पर्याय तुमच्यासमोर येतात. त्यातील पहिलाच पर्याय आहे New Farmer Registration.

या पर्यायावर क्लिक केलं की ‘New Farmer Registration form’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

इथं तुम्हाला आधार क्रमांक आणि captcha टाकायचा आहे.

captcha म्हणजे तुम्ही रोबोट किंवा यंत्र नाही, तर माणूस आहात, हे तुम्हाला तुम्ही ज्या मशीनवर फ़ॉर्म भरता त्या मशिनीला (फोन किंवा कॉम्प्युटर) पटवून द्यायचं असतं. त्यासाठी captchaमधील आकडेवारी किंवा अक्षरं जशीच्या तशी समोरच्या रकान्यात लिहायची असतात.

त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावर क्लिक केलं की Record not found with given details असा मेसेज स्क्रीनवर येईल. याचा अर्थ तुमच्या आधार क्रमांकाची या योजनेसाठी यापूर्वी नोंदणी झालेली नाही. तुम्हाला या मेसेजखाली असलेल्या ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला “Record not found with given details. Do you want to register on PM-Kisan Portal?” असा मेसेज स्क्रीनवर दिसेल. याचा अर्थ तुम्ही नोंदवलेल्या आधार क्रमांकाचा कोणताही रेकॉर्ड आमच्याकडे जमा नाही, तुम्हाला PM-Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं आहे का, असा होतो. त्याखाली असलेल्या YES या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

वेबसाईट

त्यानंतर एक पानी रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे.

यात सुरुवातीला state म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर district म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे sub-district आणि block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.

त्याखाली farmer name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेली असते, एकदम तंतोतंत तशीच स्पेलिंग इथं नाव टाकताना लिहायची आहे. एक जरी इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला, तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही. यात चूक झाल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पुढे लिंग निवडायचं आहे (मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे.

त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक Identity proof number आपोआप जनरेट होतो.

आता पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड तुमच्या पासबुकवर दिलेला असतो. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे आणि मग खाते क्रमांक टाकायचा आहे.

शेतकरी

त्यानंतर पत्ता टाकून झाला की, तुम्हाला Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

या पर्यायावर क्लिक केलं, की “Yes, Aadhar Authenticated Succesfully” असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झालं आहे.

यानंतर Farmers other details मध्ये शेतकऱ्याविषयीची इतर माहिती भरायची आहे. यात मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि आई किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे.

त्यानंतर Land Holdingमध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर single या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.

आता इथं तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा इथं टाकायचा आहे.

हे टाकून ॲड बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते.

माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download |ladki bahin yojana form and hamipatra download

माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download |ladki bahin yojana form and hamipatra download

माझी लाडकी बहिन योजना फॉर्म व हमीपत्र PDF download तुम्ही ...
पी एम किसान योजनेमध्ये नाव नोंदविण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती

पी एम किसान योजनेमध्ये नाव नोंदविण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती

PM Kisan योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 ...
शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजनेची माहिती

शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजनेची माहिती

शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या पशुपालन विभागाकडून ...
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे ...
Namo shetkari yojana benefit 2024 : खुशखबर,नमो शेतकरी योजनेचे आता 2000 नाही; 4000 येणार खात्यात.

Namo shetkari yojana benefit 2024 : खुशखबर,नमो शेतकरी योजनेचे आता 2000 नाही; 4000 येणार खात्यात.

Namo shetkari yojana benefit 2024 नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून ...
शेतकऱ्यांना मिळणार ₹6000 | पीएम किसान योजनेचे 2000 व नमो योजनेचे 4000 रूपये मिळणार.

शेतकऱ्यांना मिळणार ₹6000 | पीएम किसान योजनेचे 2000 व नमो योजनेचे 4000 रूपये मिळणार.

शेतकऱ्यांना मिळणार 6000 रूपये. लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान ...
क्रॉप इन्शुरन्स द्वारे नुकसान भरपाईची  नोंद कशी करावी |crop insurance app download

क्रॉप इन्शुरन्स द्वारे नुकसान भरपाईची नोंद कशी करावी |crop insurance app download

PMFBY विमा योजना च्या crop insurance या ॲपद्वारे पिकाच्या नुकसान ...
सरकारच्या उमंग ॲप मधून सातबारा उतारा डाऊनलोड करा|download satbara utara from umang app

सरकारच्या उमंग ॲप मधून सातबारा उतारा डाऊनलोड करा|download satbara utara from umang app

नमस्कार मित्रांनो, सध्या आपण पाहतो की प्रत्येक गोष्ट ही ऑनलाइन ...
Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

Dhani ॲप मधून पर्सनल लोन कसा मिळवायचा |indiabulls dhani app personal loan

नमस्कार मित्रानो, Dhani App वरून कर्ज कसे घ्यावे? Dhaniअँप्स लाखो ...
जीबी व्हाट्सअप डाउनलोड कसं करायचं | जीबी व्हाट्सअप म्हणजे नक्की काय. | Download GB WhatsApp.

जीबी व्हाट्सअप डाउनलोड कसं करायचं | जीबी व्हाट्सअप म्हणजे नक्की काय. | Download GB WhatsApp.

WhatsApp Feature : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचे अनेक फायदे आहेत ...

Leave a Comment