महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस व गारपीटीची शक्यता. | Weather Maharashtra

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

उत्तर भारतात वादळी वारे वाहत असतानाच महाराष्ट्रातही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. दिवसा उन्हाचा तीव्र अनुभव येत असला तरी सायंकाळनंतर हवेत गारठा जाणवतो. याच पार्श्वभूमीवर राज्यात पावसाला अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. हवामान विभागाने रविवार (२५ तारीख) पासून विदर्भ आणि मराठवाडा या भागात विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सध्या, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचा पट्टा यांच्या संयोगामुळे वारे वाहत आहेत. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील १५ जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

पी एम किसान योजनेच्या अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तापमानात चढ-उतार, गारपीट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

साधारणपणे पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. ह्या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह वीजा, गारांचा पाऊस कोसळत असतो.

महाराष्ट्रात अनेक भागात तापमानात चढ-उतार सुरू आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

विहीर काढण्यासाठी चार लाख रुपये अनुदान मिळवा. ????

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी (रविवार ते मंगळवार) या काळात जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता आहे.

गोंदिया, भंडारा, नागपूर आणि अमरावती या विदर्भातील चार जिल्ह्यांच्या उत्तरेकडील सीमावर्ती तालुक्यात सोमवारी तुरळक ठिकाणी किरकोळ गारपीट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील उर्वरित २१ जिल्ह्यात मात्र पाऊस किंवा गारपीटीची शक्यता नाही.

फेब्रुवारीअखेर सध्याच्या हिवाळी हंगामाचा शेवट होतो आणि पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू होतो. या संक्रमण काळात अशा हवामान बदलांचा अनुभव येतो.

पूर्वमोसमी हंगामात पूर्व मध्य प्रदेश ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत पूर्व किनारपट्टी समांतर वक्रकार हवेच्या कमी दाबाचा आस किंवा वारा खंडितता प्रणाली दिसू लागतात. या आस किंवा पट्ट्याच्या पश्चिमेला उत्तरेकडून तर पूर्वेला दक्षिणेकडून आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या मिलनातून गडगडाटीसह वीजा, गारांचा पाऊस कोसळत असतो.

उत्तर भारतातील राज्यांबरोबरच महाराष्ट्रातही दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. दिवसा उन्हाचा चटका कायम असला तरी सायंकाळनंतर हवेत गारठा अनुभवायला मिळत आहे. यातच राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण होत आहे. रविवारपासून (ता. २५) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पार गेल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी (ता. २२) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात घट तर किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.

विदर्भातही उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. आज (ता. २३) उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात चढ-उतार शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जागरूक राहण्याचे आवाहन

हवामान बदलांची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासकरून विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि पाऊसाची शक्यता असल्यामुळे या भागातील लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl  वेळापत्रक 2024.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl वेळापत्रक 2024.

22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 ...
गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

गाडीचा नंबर टाकून मालकाचे नाव पहा. कोणत्याही गाडीच्या नंबर वरुन ...
युट्युब वर व्हिडिओ टाकून पैसे कमवा | earn money from YouTube.

युट्युब वर व्हिडिओ टाकून पैसे कमवा | earn money from YouTube.

आज काल आपण पाहतो की समाजामध्ये नोकरीचे प्रमाण हे खूप ...
शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

कुसुम सोलार योजना ही भारत सरकारने सिंचनासाठी सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन ...
व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा? |Check cibil score on whatsapp

व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा? |Check cibil score on whatsapp

Cibil Score Check on Whatsapp : आपल्यापैकी अनेकांना कर्जाची आवश्यकता ...

Leave a Comment