लोन सेटलमेंट केल्यानंतर सिबिल स्कोरवर काय परिणाम होतो? | Loan Settlement

Loan Settlement cibil score

Loan Settlement:- सिबिल स्कोर बँक किंवा इतर एनबीएफसी यांच्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची बाब असून अनेक छोट्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचा चांगला किंवा वाईट परिणाम हा सिबिल स्कोरवर होत असतो. यामध्ये कर्जाचे हप्ते चुकणे किंवा क्रेडिट कार्डची बिल वेळेवर न भरणे इत्यादी या आर्थिक बाबींमुळे सिबिल स्कोर घसरू शकतो

व एकदा का हा स्कोर घसरला तर तुम्हाला भविष्यकाळात कर्ज मिळणे दुरापास्त होते. यासोबतच लोन सेटलमेंट या आर्थिक प्रक्रियेमुळे देखील क्रेडिट स्कोर वर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. याच अनुषंगाने आपण लोन सेटलमेंट केले तर सिबिल स्कोर वर  त्याचा कसा परिणाम होतो? याबद्दलची माहिती बघणार आहोत.

तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????

 लोन सेटलमेंट म्हणजे नेमके काय?

 जेव्हा कर्जदार एखाद्या आपत्कालीन किंवा पैशांच्या कमतरतेमुळे कर्ज भरण्यामध्ये यशस्वी ठरतो अशा वेळेस लोन सेटलमेंट केले जाते. अशा परिस्थितीमध्ये कर्जदार हा एकरकमी पेमेंटद्वारे आपले कर्ज फेडण्यासाठी संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेची वाटाघाटी करतो.

जेव्हा अशा कर्जाची असामान्य पद्धतीने परतफेड केली जाते तेव्हा हे खाते बंद केल्याचे नोंद क्रेडिट ब्युरोला केली जाते आणि तुमच्यासमोर याचा नकारात्मक परिणाम होतो. कर्ज सेटलमेंट मुळे तुमचे नुकसान होऊ शकते. जर आपण कर्ज सेटलमेंट ची प्रक्रिया पाहिली तर यामध्ये तुमच्या कर्जाच्या ईएमआय मध्ये डिफॉल्ट करणाऱ्या सर्व कर्जदारांना वन टाइम सेटलमेंट पर्याय ऑफर केला जात नाही.

याकरिता कर्ज देणाऱ्या संस्था या एका विशिष्ट प्रक्रियेचा अवलंब करतात. साधारणपणे अशा वित्तीय संस्थांना कर्जदार हा प्रत्यक्षात कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ आहे.

अशी जेव्हा खात्री होते तेव्हाच एकरकमी सेटलमेंटचा पर्याय कर्जदाराला दिला जातो. तुमचे थकीत कर्ज व दंडासह थकबाकीची रक्कम जितकी आहे त्यापेक्षा कमी रक्कम ही सेटल होत असते. कर्जदाराची परतफेड ची क्षमता काय आहे व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ही सेटलमेंटची रक्कम निश्चित केली जाते.

 क्रेडिट स्कोरवर लोन सेटलमेंटचा प्रभाव कसा पडतो?

 तुम्ही कर्ज कंपनीचा प्रस्ताव स्वीकारला आणि कर्जाची पूर्तता करण्याचा निर्णय घेतल्यास कंपनी तुमचे खाते बंद करते आणि तुमच्या लोन सेटलमेंटचा रिपोर्ट क्रेडिट ब्युरोला देत असते. एक सामान्य प्रक्रियेमध्ये तुम्ही जसे कर्ज फेडता त्यापेक्षाही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असल्यामुळे याचा खूप विपरीत परिणाम तुमच्या क्रेडिट हिस्टरीवर होतो.

एक महिन्यासाठी बिनव्याजी १ लाख रुपये मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

 लोन सेटलमेंट कसे टाळावे?

 यामध्ये आपल्याला कमीत कमी पेमेंट करावे लागते म्हणून आपल्याला लोन सेटलमेंट हा एक चांगला पर्याय वाटतो. परंतु त्याचा क्रेडिट स्कोरवर होणारा निगेटिव्ह परिणाम जर पाहिला तर लोन सेटलमेंट हा पर्याय टाळणे चांगले ठरते. नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये कर्ज किंवा क्रेडिट कार्ड सारख्या सुविधा मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.

कर्ज सेटलमेंटचा पर्याय हा अगदी शेवटचा पर्याय असावा. जर तुम्ही सध्याची कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर तुम्ही दुसऱ्या पर्याय वापरून पैशांची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तुम्हाला दुसरे कर्ज घेणे शक्य असेल तर ते घेऊन कर्ज परतफेड पूर्णपणे करणे गरजेचे आहे. वाटल्यास या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला वेळ देणे महत्त्वाचे आहे परंतु लोन सेटलमेंट चा पर्याय टाळावा.

 लोन सेटलमेंट टाळण्यासाठी हे पर्याय ठरतील फायद्याचे.

1- बचत आणि गुंतवणूक वापरून कर्जाची परतफेड करू शकतात.

2- एक कुटुंब किंवा मित्रांकडून पैसे उधार घेऊन कर्ज परतफेड करणे फायद्याचे ठरू शकते.

3- तसेच तुम्ही घेतलेल्या कर्जाची पुनर्रचना करू शकता किंवा व्याजदर कमी करण्यासाठी किंवा परतफेडीचा कालावधी वाढवण्याकरिता कर्ज देणाऱ्या एजन्सीशी तुम्ही वाटाघाटी करून या मधून मार्ग काढू शकता.

4- थकबाकी ची पूर्ण परतफेड करण्यासाठी तुम्ही कमी व्याजाचे वैयक्तिक कर्ज घेऊन थकबाकी ची पूर्ण परतफेड करू शकता.

bff पेरणी यंत्रासाठी mahadbt वेबसाईटवर अर्ज करण्याची पद्धत

bff पेरणी यंत्रासाठी mahadbt वेबसाईटवर अर्ज करण्याची पद्धत

राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्यासाठी प्रोत्साहन ...
मागेल त्याला शेततळे योजना 2023

मागेल त्याला शेततळे योजना 2023

शेततळे योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मागेल त्याला शेततळे ...
शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाची शिलाई मशीन योजना ही एक कल्याणकारी योजना आहे ...
Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ...
कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा पर्सनल लोन | low cibil score personal loan

कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा पर्सनल लोन | low cibil score personal loan

Low Cibil Score personal loan CIBIL Score :  तुमचा CIBIL स्कोअर किंवा ...
तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा किंवा अपडेट करा | link your aadhar card online.

तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा किंवा अपडेट करा | link your aadhar card online.

आपल्या आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्त्वाचे ...
Namo shetkari yojana benefit 2024 : खुशखबर,नमो शेतकरी योजनेचे आता 2000 नाही; 4000 येणार खात्यात.

Namo shetkari yojana benefit 2024 : खुशखबर,नमो शेतकरी योजनेचे आता 2000 नाही; 4000 येणार खात्यात.

Namo shetkari yojana benefit 2024 नमो शेतकरी योजनेचे मागील महिन्यापासून ...
ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा |  job card list 2023

ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा | job card list 2023

जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र: job card list 2023 : जॉब ...
OLX वरून जुने वाहन कसे घ्यावे | how to buy old cars on olx

OLX वरून जुने वाहन कसे घ्यावे | how to buy old cars on olx

Second Hand Car : भारतात सेकेंड हँड वाहनांची मोठी बाजारपेठ ...

Leave a Comment