गाव नकाशा डाऊनलोड करा.|जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा.

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे संबंधित गावामध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतु:सिमा, आजबाजूचे गटनंबर आणि मालक कोण आहेत, याची माहिती घरबसल्या एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहे.

गाव नकाशा ऑनलाईन

ऑनलाइन सातबारा उतारा, आठ “अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हे नंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूनकाशा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी गाव नकाशाची माहिती गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. 

सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्‍यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांक्ष-रेखांक्षसह (जीपीएस) सर्व माहिती नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणे शक्‍य झाले आहे.

सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे जमिनीचे स्थान निश्‍चितीसाठी ही माहिती उपयुक्‍त ठरणार आहे. त्याच बरोबर संबंधित सर्व्हे नंबरवर मालकी कोणाची आहे हे समजणार आहे. राज्यात एकूण 44 हजार 278 गावे असून त्यापैकी 36 हजार 500 गावचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

गाव नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

त्याच बरोबर संबंधित सर्व्हे नंबरवर मालकी कोणाची आहे हे समजणार आहे. राज्यात एकूण 44 हजार 278 गावे असून त्यापैकी 36 हजार 500 गावचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित गावांचे नकाशा लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.ऑनलाइन सातबारा उतारा, आठ “अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हे नंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूनकाशा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

गाव नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती :????

असा शोधा नकाशा

– सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा संकेतस्थळावर उपलब्ध

सर्वात पहिला महाभु नकाशा या वेबसाईटवर जा.????

– या संकेतस्थळावर गेल्यावर पहिल्यांदा जिल्हा निवडा, तालुका आणि त्यानंतर गाव निवडा

– यानंतर गाव नकाशा हा पर्याय निवडा

– गाव नकाशा उपलब्ध होईल.

– संबंधित सर्व्हे नंबर टाकल्यावर त्या क्षेत्राचा नकाशा पीडीएफमध्ये उपलब्ध.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा.

आता सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

  1. जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला महाभूलेख या वेब साईट वर जायचं आहे.☝️☝️
  2. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. 
  3. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
  4. त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.
  5. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो
  6. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
  7. त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो. 
  8. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक करून तुम्हाला पहिल्या पेजवर परत जायचं आहे.
  9. आता जमिनीचा नकाशा कसा काढायचा ते पाहूया.
  10. या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
  11. इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
  12. होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
  13. आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
  14. एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.
  15. ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.
  16. यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक करून तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

बोअरवेल अनुदान योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया

बोअरवेल अनुदान योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी आपल्या गावच्या कृषी अधिकाऱ्यांशी भेट ...
एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक ...
PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ...
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे ...
तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण मतदान कार्ड मोबाईल वरून pdf ...
शेतकऱ्यांना मिळणार ₹6000 | पीएम किसान योजनेचे 2000 व नमो योजनेचे 4000 रूपये मिळणार.

शेतकऱ्यांना मिळणार ₹6000 | पीएम किसान योजनेचे 2000 व नमो योजनेचे 4000 रूपये मिळणार.

शेतकऱ्यांना मिळणार 6000 रूपये. लोकसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पीएम किसान ...
Moneyview वर पर्सनल लोन घेऊन आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करा | how to get loan from moneyview app.

Moneyview वर पर्सनल लोन घेऊन आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करा | how to get loan from moneyview app.

शेतकऱ्यांना किंवा प्रत्येक सामान्य माणसाला सध्याच्या महागाईमुळे पैशांची गरज खूप ...

Leave a Comment