ट्रॅक्टरच्या सबसिडी मध्ये भरगोस वाढ| ट्रॅक्टरवर मिळेल तब्बल आता 5 लाखांचे अनुदान: Agri Machinery Subsidy

ट्रॅक्टर अनुदान योजना

Agri Machinery Subsidy

शेतीमध्ये आता दिवसेंदिवस विविध कामांसाठी यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून शेताच्या पूर्व मशागतीपासून तर कापणीपर्यंत विविध यंत्रे शेतामध्ये वापरले जातात. यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देखील विविध योजना राबवल्या जात आहेत.

या योजनांच्या अंतर्गत अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्यात येते व कृषी यांत्रिकीकरणाला बळ मिळून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या दृष्टिकोनातून सरकारचा हा प्रयत्न आहे. जर आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा विचार केला तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या उप अभियान हे देखील एक महत्त्वाची योजना आहे.

मंत्रिमंडळात मिळणार मान्यता

नुकतेच एका समितीने ट्रॅक्टरवर 50% अनुदान देण्याच्या तरतुदीला मान्यता दिली आहे आणि आता ती मंत्रिमंडळात मांडण्याची तयारी आहे. 50% ट्रॅक्टर सबसिडी ही सरकारी योजना 2023 मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर राज्यातील सर्व रहिवाशांना ट्रॅक्टरवर 50% अनुदान मिळेल. हा प्रस्ताव मंजूर होण्याची दाट शक्यता आहे कारण राज्याच्या निवडणुका आणि संसदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि रहिवाशांसाठी हा एक उपयुक्त निर्णय असू शकतो.

या योजनेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रे व उपकरणाच्या खरेदीवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात होते. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला असून अनुदानात वाढ करण्यात आली आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या लेखात महत्त्वाची माहिती घेऊ.

नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान हवे असेल तर खालील बटन वर क्लिक करा. ????

50%Tractor Subsidy Scheme 2023  ची वैशिष्ट्ये आणि फायदे :

  • शेतकरी हे या योजनेचे लक्ष्यित लाभार्थी आहेत.
  • योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेतीसाठी नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • राज्य सरकार योजना राबवतील.
  • अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडमध्ये सबमिट केले जाऊ शकतात.
  • सरकारने दिलेली सबसिडी थेट अर्जदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

 ट्रॅक्टर  इतर यंत्रांच्या अनुदानात मोठी वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असून या योजनेच्या माध्यमातून शेतीमध्ये यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढवा याकरिता अनुदान स्वरूपात मदत केली जाते. अगोदर कृषी यंत्र व उपकरणांवर या योजनेच्या अंतर्गत 50 ते 80% पर्यंत अनुदान मिळत होते.

परंतु आता या योजनेमध्ये शासनाने मोठा बदल केला असून मिळणाऱ्या अनुदानामध्ये भरघोस अशी वाढ करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने ट्रॅक्टर, पावर टिलर तसेच कम्बाईन हार्वेस्टर या यंत्रांच्या अनुदानामध्ये जवळजवळ तिप्पट वाढ झालेली आहे.

शासनाच्या महाडीबीटी वेबसाईटवरून अर्ज करून नवीन ट्रॅक्टर साठी सबसिडी मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

 कसे असणार आता मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप?

या अंतर्गत आता ट्रॅक्टर, पावर टिलर, हार्वेस्टर, नांगर तसेच पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर आणि चॉपकटर यासारख्या कृषी यंत्रांवर सामान्य श्रेणीत येणाऱ्या शेतकऱ्यांना म्हणजे सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत जास्तीत जास्त अनुदान मिळणार असून एससी/ एसटी /

अत्यंत मागासवर्गीय प्रवर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50 टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा विचार केला तर ट्रॅक्टरकरिता 4WD( 40 पीटीओ एचपी किंवा अधिक) करिता जनरल प्रवर्गासाठी चार लाख रुपये अनुदान मिळणार असून एससी/ एसटी प्रवर्गाकरिता पाच लाखांचे अनुदान मिळणार आहे. याआधी या अनुदानाची मर्यादा एक लाख 25 हजार पर्यंत होती.

 अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल?

1- या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर https://mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज करणे गरजेचे आहे. ( तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर अर्थात सीएससी सेंटरवर जाऊन देखील अर्ज करू शकतात.)

2- या संकेतस्थळावर गेल्यानंतर होम पेजवर तुम्ही जेव्हा पोहोचाल तेव्हा त्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी पर्यायावर क्लिक करावे.

3- त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करा यावर क्लिक करावे लागेल.

4- या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सात बाबी दिसतील व यातील कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावर क्लिक करावे.

5- यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरावी. त्यामध्ये तुम्ही तुमचे गाव,तालुका, मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य इत्यादी  माहिती नमूद करावी.

6- तपशील मध्ये ट्रॅक्टर निवडावा व एचपी श्रेणीमध्ये 20 ते 35 एचपीपर्यंत निवडा. त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकारामध्ये 2WD/4WD यापैकी कोणतीही एका बाबीची निवड करावी. त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमची बाब सक्सेस होईल.

अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून अर्ज करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन अर्ज करून या अनुदानाचा लाभ मिळवू शकतात.

Tractor Subsidy Scheme 2023  संबंधित काही प्रश्न

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी कोण पात्र आहे?

शेतकऱ्याकडे शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे. पंतप्रधान ट्रॅक्टर योजना ही अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. योजनेअंतर्गत फक्त एकदाच योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेसाठी कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकते.

ट्रॅक्टरवर किती अनुदान दिले जाते?

यासाठी सरकार शेतकऱ्यांना ५ लाख रुपये देत आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर ५० टक्के सबसिडी मिळणार आहे.

2023 साठी ट्रॅक्टर सबसिडी किती आहे?

सरकारच्या पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत म्हणजेच ५०% अनुदानावर ट्रॅक्टर मिळू शकतील.

प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना ऑनलाइन कशी लागू करावी?

जर तुम्हाला प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला सार्वजनिक अर्ज केंद्राशी संपर्क साधावा लागेल आणि स्वतःची नोंदणी करावी लागेल

groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा ???????? groww ...
पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आज जमा झाला|केवायसी केली आहे का नाही चेक करा.

पी एम किसान योजनेचा चौदावा हप्ता आज जमा झाला|केवायसी केली आहे का नाही चेक करा.

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारे ...
ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

प्रत्येक शेतकऱ्याची शेजाऱ्या बरोबर काही ना काही तक्रार असते तक्रार ...
एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल ...
भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान - सन २०२३-२४

भाउसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान – सन २०२३-२४

या सारणीनुसार, तुम्ही ज्या फळपीकांची लागवड कराल त्यानुसार तुम्हाला तीन ...
शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

शेती : तुमच्या जमिनीवर विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर तुम्हाला इतका मोबदला मिळणार. |Land record

अति उच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरता सुधारित धोरणास ...

Leave a Comment