शेडनेट व पॉलिहाऊस 23 लाख रु. अनुदान |shade net house subsidy maharashtra.

Polyhouse Subsidy in Maharashtra 2023 Shadenet Subsidy 2023 कृषी योजना 2023 महाराष्ट्र  Maharashtra Sarkari Yojana

Polyhouse Subsidy in Maharashtra 2023  नमस्कार शेतकरी मित्रांनो,      आपल्या देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरी वस्ती वाढून दिवसेंदिवस शेती योग्य शेतजमीन कमी होत आहे. शेतीतील उत्पन्न वाढवून आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी शेतीच्या नवनवीन पर्यायाकडे वळू लागले आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अनेक पद्धतीचे अनुदान देत असते. शेतकरी कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्यासाठी  शेडनेट हाऊस, ग्रीन हाऊस आणि पॉलीहाऊस यासारख्या शेतीकडे वळत आहेत. शेडनेट, ग्रीन हाऊस, पॉलीहाऊस याकरिता शासनाकडून 23 लाख रु. पर्यंत शासकीय अनुदान देण्यात येते.

यामध्ये बिगर हंगामी भाजीपाला आणि फळे यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बिगर हंगामी भाजीपाला, फळे यांच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे  शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न देखील वाढते.

शेडनेट हाऊस मध्ये लागवडीसाठी कमी सूर्यप्रकाश आवश्यक असलेले पिक निवडले जाते. सोबतच जी पिके उच्च तापमानात वाढू शकत नाही त्या पिकांची शेडनेट मध्ये लागवड केली जाते. शेडनेट, पॉलीहाऊस उभारण्याचा विचार केला तर त्यामध्ये जास्त गुंतवणूक ही मोठी समस्या आहे. याचा विचार करता सरकारने पॉलीहाऊस, शेडनेट ची उभारणी करण्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली आहे.

शेडनेट व पॉलिहाऊस योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 

शेडनेट, पॉलीहाऊस अनुदानासाठी असलेल्या पात्रता व अटी:

या योजनेमध्ये प्रति लाभार्थी जास्तीत जास्त चार हजार चौरस मीटर पर्यंतचे अनुदान दिले जाते.  ग्रीनहाऊस, शेडनेट हाऊसचे बांधकाम हे केवळ कंत्राटी फर्मच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस करिता बँकेकडून कर्ज घेण्याची सक्ती राहणार नाही. शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता असल्यास सहाय्यक संचालक किंवा कृषि उपसंचालक यांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

ग्रीनहाऊस उभारणीसाठी त्याच्या किंमतीनुसार शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज देण्यात येईल. लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतात उंच सखल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचे सपाटीकरण करावे. मोठ्या वृक्षाच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा यासाठी निवडण्यात येऊ नये. भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडावी. पाणीपुरवठ्याची सुविधा जवळपास असणे आवश्‍यक आहे.

पाण्याचा सामू 6 ते 7.5 च्या दरम्यान असेल व क्षारतेचे प्रमाण कमी असेल अशी जागा शक्‍यतो निवडावी. जमीन पाण्याचा निचरा होणारी नसेल किंवा क्षारयुक्त असेल तर बाहेरून लाल रंगाची पाण्याचा निचरा होणारी वालुकामय माती वाफे तयार करण्यासाठी वापरावी. जमीन निचरा होणारी नसेल तर शेडनेट हाऊस भोवती लहान चर काढावा, जेणेकरून पाण्याचा निचरा होईल. विद्युत पुरवठ्याची सुविधा गरजेची आहे. पाणथळ जागा शेडनेट हाऊससाठी निवडू नये.

  योजनेच्या अनुदानासाठी अर्ज कसा करावा? या माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा ????????

अनुदान किती मिळतं?

ग्रीन शेडनेट हाऊस उभारण्यासाठी लागणारी  रक्कम शेतकरी संबंधित जिल्हा फलोत्पादन विकास सोसायटीकडे जमा करेल. शेडनेटचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याने  संबंधित कार्यालयाला माहिती दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत भौतिक पडताळणी केली जाईल.

हरित शेडनेट हाऊसवर शेतकऱ्याचे नाव, स्थापन केलेलं वर्ष, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत अनुदानित लिहावं लागणार आहे. शेतकऱ्यांना युनिट खर्चाच्या 50% अनुदान देण्यात येणार आहे. पण अल्प, अत्यल्प, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती शेतकर्‍यांना 20% अनुदान राज्य योजना प्रमुखाकडून देण्यात येत असतं. म्हणजेच, या शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान मिळू शकणार आहे.  अनुदानाचा हा आकडा राज्यनिहाय वेगळा असू शकतो.

पॉलिहाऊस अनुदान

4 हजार स्क्वेअर मीटरचे पॉलीहाऊस बांधण्यासाठी 34 लाख रुपये खर्च येतो, म्हणजेच प्रत्येक प्रति चौरस मीटरसाठी 844 रुपये इतका खर्च येतो. त्यानुसार शेतकऱ्यांना 70 टक्के अनुदान मिळाल्यानंतर शासनाकडून 23 लाख रुपये रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल.

शेडनेट हाऊस अनुदान

4 हजार स्क्वेअर मीटरचे शेडनेट हाऊसच्या बांधणीसाठी सुमारे 28 लाख रुपये खर्च येतो. त्यापैकी 19 लाख रुपये अनुदान म्हणून देण्यात येईल.

या योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा याच्या माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.????

 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

शेतकऱ्याचे आधार कार्ड ७/१२ उतारा, ८अ उतारा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, जातीचा दाखला ( आरक्षण असल्यास) शेडनेट कोटेशन मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असावा (मोबाईल OTP साठी सोबत असावा).

  मित्रांनो वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रमंडळामध्ये नक्के share करा. शेती विषयक updates मिळवण्यासाठी आमच्या whats app ग्रुपला जॉईन करा. धन्यवाद..!

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा |land record map online

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पहा |land record map online

Land Records Maharashtra 7/12 And Map शेतकरी, घर मालक, प्लॉट ...
पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी कशी करायची | pm Kisan new farmer registration.

पी एम किसान योजनेमध्ये नवीन नाव नोंदणी कशी करायची | pm Kisan new farmer registration.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र ...
तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन पहा संपूर्ण माहिती ...
Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ...
आता शेतकऱ्यांना मिळेल होम लोन साठी 2.67 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान | subsidy for home loan.

आता शेतकऱ्यांना मिळेल होम लोन साठी 2.67 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान | subsidy for home loan.

होम लोन म्हणजे काय? गृहकर्ज किंवा होमलोन म्हणजे घरखरेदीसाठी, घर ...
पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी | poultry loan bank list.

पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी | poultry loan bank list.

शेतीसह पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. पण अनेकांकडे पैसा ...
सोयाबीन खत व्यवस्थापन | सोयाबीन पिकासाठी खत नियोजन

सोयाबीन खत व्यवस्थापन | सोयाबीन पिकासाठी खत नियोजन

सोयाबीन लागवड ही भारतीय कृषी क्षेत्रामध्ये आर्थिक महत्त्व आणि आहारातील ...

Leave a Comment