तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन पहा संपूर्ण माहिती.

SBI e-Mudra| कोणत्याही लघू उद्योजकाला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी यंत्रसामुग्रीची गरज असेल तर SBI e-Mudra योजनेतंर्गत त्याला कर्ज मिळू शकते. लहान उत्पादक, सेवा क्षेत्रातील कंपन्या, पुरवठादार, दुकानदार अशांना या कर्जाचा लाभ घेता येतो.

तुम्हाला ई मुद्रा लोन e mudra loan संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी देत आहोत जेणे करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकाल. मुद्रा लोन अनेक बँकतर्फे दिले जाते आणि त्यांची थोडीशी पद्दत वेगळी सुद्धा असू शकते.

तुम्ही sbi ग्राहक असाल आणि mudra loan साठी apply करू इच्छित असाल तर लक्षात घ्या की मुद्रा लोनसाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो.

  • प्रत्यक्ष शाखेत जावून
  • ऑनलाईन पद्धतीन

ऑनलाइन पद्धतीने एसबीआय ई मुद्रा लोन मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

e mudra loan द्वारे मिळू शकते ५० हजारापर्यंत लोन

प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जावून तुम्ही मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकता. परंतु जर तुम्हाला ऑनलाईन e mudra loan apply करायचा असेल तर त्याद्वारे देखील तुम्हाला मुद्रा लोन मिळू शकते.

ऑनलाईन अर्ज केल्यास बँकेच्या नियमानुसार ५० हजार रुपयाचे लोन मिळते. ५० हजार रुपयांपेक्षा जास्त लोन हवे असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधावा लागतो.

अनेक बँकेत e mudra loan देण्याची सुविधा असते परंतु आज आपण sbi e mudra loan संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. sbi e mudra loan योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटवर कास्रावा लागतो.

ई मुद्रा ऑनलाई अर्ज कसा करावा लागतो, या योजनेमुळे कोणते फायदे मिळतात, कोणकोणती कागदपत्रे या योजनेसाठी आवशयक असतात हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल.

e mudra loan कशी आहे ते समजून घ्या.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर हि योजना कोणासाठी आहे तसेच योजनेचे स्वरूप काय आहे ते समजावून घेवूयात.

  • तरुणांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने हि योजना राबविण्यात येते.
  • e mudra loan योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार sbi बँकेचा ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधीचा चालू किंवा बचत खातेदार असावा.
  • sbi बँकेतर्फे mudra loan म्हणून जास्तीत जास्त १ लाख रुपये कर्ज दिले जाते.
  • कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे एवढा असतो.
  • sbi बँकेच्या मापदंडानुसार e mudra loan साठी ५० हजार रुपयांचे कर्ज लगेच दिले जावू शकते.
  • ५० रुपयांच्या वरील कर्ज हवे असेल तर मात्र बँकेशी संपर्क साधावा लागतो.

मुद्रा लोन कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बँक खात्याचे तपशील.
  • जो व्यवसाय किंवा उद्योग करू इच्छित असाल त्या संबधित संपूर्ण तपशील.
  • बँकेशी आधार नंबर सलग्न असावा म्हणजेच लिंक असावा.
  • जातीचे विवरण आवश्यक असेल.
  • तुम्ह्या उद्योगाचे GSTN व उद्योग आधार तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावे लागते.
  • शॉप act देखील तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे.
  • ओळख पुरावा.
  • पत्त्याचा पुरावा.
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र.

तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी तुम्ही आर्थिक दृष्ट्या असक्षम असाल तर हि योजना तुमच्यासाठी आहे.

तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन स्वतःचा नवीन उद्योग उभारून उदयोजक बनण्याची नवीन संधी निर्माण होते. पंतप्रधान मुद्रा योजना किंवा पीएमएमवाय PMMY ही सूक्ष्म व लघु उद्योगांना पतपुरवठा करण्यासाठी भारत सरकारची योजना आहे.

मुद्रा योजनेबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना फायदे

  • मुद्रा लोन मध्ये (mudra loan) कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत हा या योजनेचा मुख्य फायदा आहे. मुद्रा कर्ज योजना उत्पन्न निर्मितीमध्ये गुंतलेल्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पत सुविधा प्रदान करते.
  • PMMY Mudra Loan अंतर्गत विस्तारित पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बिगर-फंड आधारित आवश्यकतांसाठी असू शकतात. म्हणून, कर्जदार मुद्रा कर्ज योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकतात.
  • मुद्रा कर्जाची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी किंवा पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

तीन प्रकारची मुद्रा कर्जे

  • तरुण – PMMY Mudra Loan योजने अंतर्गत ५  ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
  • किशोर – Mudra Loan योजनेंतर्गत कर्ज ५० ते ५ लाख रुपयांपर्यंत मंजूर होऊ शकते.
  • शिशु – ५०,०००/- रुपयांपर्यंतची कर्ज मंजुरी मिळू शकते.

मुद्रा कर्ज लाभार्थी पात्रता Mudra loan eligibility

  • लघु उद्योग व्यवसाय मालक यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • फळ आणि भाजी विक्रेते देखील mudra loan साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  • दुग्ध उत्पादक.
  • कुक्कुटपालन व्यावसायिक
  • मत्स्यपालन व्यवसाय करणारे.
  • विविध शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार.

Mudra Loan Bank List

  • oriental bank ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  • State bank of India स्टेट बँक ऑफ इंडिया
  • Union bank of india यूनियन बँक ऑफ इंडिया
  • syndicate bank सिंडिकेट बँक
  • Andhra bank आंध्र बँक
  • Bank of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्र
  • Dena bank देना बँक
  • IDBI bank आईडीबीआई बँक
  • Karnataka bank कर्नाटक बँक
  • Panjab national bank पंजाब नेशनल बँक
  • tamil nadu merchant bank तमिलनाडु मर्चंड बँक
  • Axis Bank एक्सिस बँक
  • canara bank केनरा बँक
  • federal bank फेडरल बँक
  • Indian bank इंडियन बँक
  • Kotak Mahindra bank कोटक महिंद्रा बँक
  • sarswat bank सरस्वत बँक
  • allahabad bank  अलाहाबाद बँक
  • Bank of India बँक ऑफ इंडिया
  • corporation bank कॉरपोरेशन बँक
  • ICICI bank आईसीआईसीआई बँक
  • j&k बँक
  • Punjab and sindh bank पंजाब एंड सिंध बँक
  • Central bank of India सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • HDFC Bank एचडीएफसी बँक
  • Indian overseas bank इंडियन ओवरसीज बँक
  • uco bank यूको बँक
  • bank of baroda  बँक ऑफ़ बडोदा

ई मुद्रा लोन साठी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

मुद्रा लोन मुळे मिळणार लहान उद्योगांना मदत

ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणत बेरोजगारी वाढत चाललेली आहे. बेरोजगार युवकांनी जर mudra loan योजनेचा लाभ घेतला तर नक्कीच त्यांना व्यवसाय उभारणीसाठी मदत मिळेल.

कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा झाल्यास सगळ्यात आधी त्या योजनेची माहिती हवी असते. कारण तुम्हाला जर एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे परंतु तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल तर मात्र नक्कीच तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेण्यास अडचण येवू शकते.

विविध शासकीय योजनांची मोफत माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये जॉईन व्हा.

मुद्रा लोन किती मिळते?

५० हजार रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यत मुद्रा लोन मिळू शकते.

या लोनसाठी कोठे संपर्क साधावा लागेल?

मुद्रा लोन मिळविण्यासाठी तुमच्या परिसरातील बँकेस भेट द्या. मुद्रा लोन देणाऱ्या बँकांची यादी या लेखामध्ये दिलेली आहे.

कागदपत्रे कोणकोणती लागतात?

बँक तपशील, उद्योगाचा तपशील, शॉप act देखील तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. ओळख पुरावा, पत्त्याचा पुरावा, व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.

मुद्रा लोन पात्रता काय आहे?

दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्सव्यवसाय त्याचप्रमाणे शेती संबधित व्यवसाय करणारे व्यावसायिक या मोद्र लोनसाठी पात्र असेल.

मोबाईल वरून वारसांची नोंद करा ऑनलाईन | सातबार्यावर वारसाची नोंद करा

मोबाईल वरून वारसांची नोंद करा ऑनलाईन | सातबार्यावर वारसाची नोंद करा

वारसांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी? तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या ...
आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तयार कसे करायचे खालील स्टेप्स फॉलो ...
गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

सह्याद्री हवामान राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. २४) ...
PM किसान चा हप्ता मिळाला नाही. |नमो शेतकरी महा सन्मान योजना kyc.

PM किसान चा हप्ता मिळाला नाही. |नमो शेतकरी महा सन्मान योजना kyc.

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना kyc ...
Location tracker app download | लोकेशन ट्रॅक्टर ॲप डाऊनलोड करा.

Location tracker app download | लोकेशन ट्रॅक्टर ॲप डाऊनलोड करा.

गुगल मॅप्स (Google Maps) गुगल मॅप्स ये अ‍ॅप वापरुन तुम्ही ...
रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण ...
गूगल पे वरून एक लाख रुपये पर्सनल लोन मिळवा. |Get personal loan from Google Play.

गूगल पे वरून एक लाख रुपये पर्सनल लोन मिळवा. |Get personal loan from Google Play.

Google Pay Personal Loan 2024: मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित असेलच ...
सुकन्या समृद्धी योजना बँकांची यादी |अर्ज करण्याची पद्धत.

सुकन्या समृद्धी योजना बँकांची यादी |अर्ज करण्याची पद्धत.

सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांच्या यादी Sukanya Samriddhi Yojana ...

Leave a Comment