Power Tiller Subsidy in Maharashtra | पॉवर टिलरसाठी मिळणार ८५ हजार पर्यंत अनुदान

Power Tiller Subsidy in Maharashtra : शेतकरी बंधुनो आपल्यासाठी खास योजना आपल्याला जर पॉवर टिलर घ्यायचाय तर चिंता करू नका. कारण पॉवर टिलर घेण्यासाठी शासन देताय ८५ हजार पर्यंत अनुदान.

यालेखात तुम्हाला आम्ही योजनेबद्दल माहिती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता, अनुदान या बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

  1. अर्जदार हा शेतकरी असावा.
  2. 8अ व सातबारा असावा ज्यावर कमीत कमी एक एकराची नोंद असावी.
  3. अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर जमीन असावी.
  4. आधार कार्ड असावे. ते महाडीबीटी पोर्टल वरील लिंक असावे. जेणेकरून ते आपण महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करू शकतो.
  5. अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी म्हणून नोंदणी करावी.
  6. अर्जदार हा अनुसूचित जाती, जमाती चा असेल तर त्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  7. अशा प्रकारच्या योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल तर दहा वर्षेपर्यंत पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  8. ज्या डीलर कडून पावर टिलर खरेदी करायचा आहे त्यांच्याकडून कोटेशन घ्यावेत. कोटेशन बरोबरच एक तपासणी अहवाल घ्यावा जास्त केस रिपोर्ट असे सुद्धा म्हणतात जो ऑनलाइन अपलोड करावा लागणार आहे.

पॉवर टिलर योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करा ????????????

Power Tiller Subsidy in Maharashtra

शेती म्हंटल कि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आणि  हीच शेतकऱ्यांची ओळख, शेतीच्या कामासाठी/मशागतीसाठी औजारे हा महत्वाचा घटक. यामध्ये शेतीच्या कामासाठी  विवध औजारांचा समावेश होतो. ट्रँक्टर, पेरणी यंत्र, पॉवर टिलर, नांगर, रोटाव्हेटर, वखर, सारा यंत्र इ. अशा विविध औजारांचा शेतीच्या मशागतीसाठी उपयोग होतो.

पॉवर टिलर प्रामुख्याने उस चाळणी/बांधणे यासाठी उपयोग होतो. बरेच शेतकरी आता शेतात ऊस पिक घेतात. आणि यासाठी चाळणी/बांधणी बैलाच्या सहाय्याने/पॉवर टिलर च्या सहाय्याने करतात.

पॉवर टिलर ट्रँक्टरपेक्षा लहान असल्यामुळे ऊस बांधणीकरिता त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. यामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचत होते. परंतु पॉवर टिलर यंत्राची किंमत जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना घेण्यासाठी जास्त खर्च येतो. शासन शेतीशी निगडीत विविध योजना अनुदानावर राबवित असते. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान अंतर्गत शेतीच्या सर्व यंत्र व औजारे यासाठी अनुदान दिले जाते.

पॉवर टिलर साठी अर्ज कसा करावा याबाबत माहितीसाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

Power tiller subsidy : पॉवर टिलर अनुदान

  • क्षमता ८ बी एचपी पेक्षा कमी असेल : 
    • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी : ६५,०००/- रु.
    • इतर लाभार्थीसाठी : ५०,०००/- रु.
  • क्षमता ८ बी एचपी व त्यापेक्षा जास्त असेल तर :
    • अनुसूचित जाती & अनुसूचित जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी : ८५,०००/- रु.
    • इतर लाभार्थीसाठी : ७०,०००/- रु.

पोर्टल वरील माहिती नुसार.

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे/माहिती.

  • आधार कार्ड झेरॉक्स.
  • बँक पासबुक झेरॉक्स.
  • ७/१२, ८अ उतारा.
  • मोबाईल नंबर.
  • अनु.जा./अनु.ज असल्यास जात प्रमाणपत्र.

अटी व शर्ती

  • लाभार्थी शेतकरी असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्याच्या नावे ७/१२, ८ अ उतारा असणे बंधनकारक आहे.

हे करू नका?

  • निवड होण्याआधी कोणतीही वस्तू/यंत्र खरेदी करू नका.
  • निवड झाल्यानंतर पूर्व संमती मिळाल्याशिवाय  खरेदी करू नये.
  • वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचा लगेच वापर करू नका.

हे करा?

  • अर्जाची निवड झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे विहित कालावधीत अपलोड करा.
  • पूर्वसंमती मिळाल्या नंतरच औजार/यंत्राची खरेदी करा.
  • आपण घेत असलेले यंत्र औजार पूर्वी कोणी घेतले नाही, याची खात्री करा.
  • अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा.

ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

तर माझ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा ...
महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून मिळणार 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार 2024

महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून मिळणार 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार 2024

महाराष्ट्र मध्ये आता कर्जमाफी होण्याची शक्यता दिसून येत आहे महाविकास ...
तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, ...
सर्व कागदपत्रे मिळवा भारत सरकारच्या डिजीलॉकर वर

सर्व कागदपत्रे मिळवा भारत सरकारच्या डिजीलॉकर वर

DigiLocker ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल ...
SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

"आयुष्य लहान आहे त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घ्या" ही लोकप्रिय ...
सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती | Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना संपूर्ण माहिती | Sukanya Samriddhi Yojana

केंद्र सरकार आणि राज्य शासनाद्वारे बँक व पोस्ट ऑफिस मार्फत ...
तुमची कुणबी नोंद आहे का पहा? कुनबी नोंद कुठे तपासायची? : Kunabi nondi Maharashtra

तुमची कुणबी नोंद आहे का पहा? कुनबी नोंद कुठे तपासायची? : Kunabi nondi Maharashtra

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची व्याप्ती पाहता महाराष्ट्र सरकार झुकले ...

Leave a Comment