पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Pipe Line anudan Yojana Maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी कोरडवाहू शेती न करता सिंचनाची शेती करून जास्तीत जास्त पीक घ्यावे व स्वतः समृद्ध व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र राबविण्यात येत आहे. या Pipe Line Yojana Maharashtra अंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येत आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण पाईपलाईन योजना संदर्भात विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत.

Pipe Line Scheme Maharashtra अंतर्गत महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी अर्ज मागवून अनुदान वितरण करीत आहेत. या योजनेअंतर्गत कोणत्या शेतकऱ्याला अर्ज करता येणार आहे तसेच अर्ज प्रक्रिया व कागदपत्रे या संदर्भात विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया. Pipe Line Scheme ही आपल्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचे सरकारचे लक्षांक आहे.

पाईपलाईन योजना अंतर्गत अनुदान – Pipeline Anudan Yojana Maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पाईपलाईन योजना Pipe Line Yojana Maharashtra अंतर्गत शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्याकरिता 50 टक्के अनुदान देण्यात येते.

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत वितरित करण्यात येणारे अनुदान हे 50 टक्के तसेच जास्तीत जास्त 15 हजार रुपये पर्यंत असणार आहे. त्यामुळे शेतकरी पाईपलाईन योजना अंतर्गत अर्ज करून 50 टक्के अनुदान मिळवू शकतात.

पाईपलाईन अनुदान योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा ????????

पाईपलाईन अनुदान योजना लाभ कुणाला मिळणार – Pipelne Anudan Yojana Eligibility ?

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र 2023(pipeline anudan Yojana Maharashtra 2023) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर विहिरीची नोंद आहे किंवा इतर कोणत्याही सिंचन स्त्रोतांची नोंद आहेत जसे की शेततळे, विहीर किंवा इतर सिंचन पद्धती इत्यादी. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांना पाईपलाईन करिता अनुदान वितरित करण्यात येणार आहे. पाईपलाईन करिता सिंचन स्त्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पाईपलाईन अनुदान योजना अर्ज प्रक्रिया व निवड प्रक्रिया

शेतकरी मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज हा शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रकारे करायचा आहे. पाईपलाइन योजना(pipeline yojana maharashtra)अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर करायचा आहे. पाईपलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जावर छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यात येईल व त्यांना एसएमएस प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात. कागदपत्रांची यादी खाली दिलेली आहे.

पाईपलाईन अनुदान योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा. ????????????

पाईपलाईन योजना आवश्यक कागदपत्रे -Required Documents for Pipeline Scheme

या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  1. सातबारा उतारा व आठ अ
  2. बँक पासबुक
  3. आधार कार्ड
  4. आधार कार्ड बँकेसोबत लिंक असावे
  5. पाणी उपलब्धतेची प्रमाणपत्र
  6. पाईप खरेदी केल्याची बिल

MPJAY अंतर्गत हॉस्पिटल लिस्ट व अधिकृत वेबसाईट.

MPJAY अंतर्गत हॉस्पिटल लिस्ट व अधिकृत वेबसाईट.

महत्वाचे मुद्दे खाली आहेत. हॉस्पिटल लिस्ट कशी पहावी. अर्ज कसा ...
16 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई मिळणार.

16 जिल्ह्यांमधील 25 लाख शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई मिळणार.

पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ ...
apply for personal loan on Google pay  | गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा

apply for personal loan on Google pay | गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा

Google Pay वर पर्सनल लोन साठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज ...
महाराष्ट्र राज्य जनावर खरेदी विक्री महासंघ यांचे जिल्ह्यानुसार व्हाट्सअप ग्रुप |district wise whatsapp groups

महाराष्ट्र राज्य जनावर खरेदी विक्री महासंघ यांचे जिल्ह्यानुसार व्हाट्सअप ग्रुप |district wise whatsapp groups

नमस्कार मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुप तयार ...
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

सध्याच्या काळात आयुर्विम्याचे महत्त्व वाढत असताना लोक मोठ्या प्रमाणात विमा ...
मका लागवड संपूर्ण माहिती,खत व कीड रोग व्यवस्थापन

मका लागवड संपूर्ण माहिती,खत व कीड रोग व्यवस्थापन

मका, हे जगातील सर्वात महत्वाचे पिकांपैकी एक आहे. तसेच हे ...

Leave a Comment