रबी हंगामातील पिक विमा घरच्या घरी मोबाईल द्वारे भरा |१ रुपयात पिक विमा योजना.

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या एक रुपयात पिक विमा या योजनेचा फॉर्म भरणे सध्याला मोठ्या प्रमाणात चालू आहे. आता फक्त काही दिवस पिक विमा योजनेचा फॉर्म भरणे चालू असेल.

सेतू कार्यालय किंवा ई सेवा केंद्रांमध्ये सध्याला पिक विमा भरण्यासाठी खूपच गर्दी आहे असे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फॉर्म भरले जात नाहीत. यासाठी आपण घरच्या घरी मोबाईल द्वारे पिक विमा चा फॉर्म कसा भरायचा याबाबत माहिती सांगत आहे. या माहिती द्वारे आपण आपल्या घरच्या घरीच पिक विमा चा फॉर्म भरू शकता. धन्यवाद.

घरच्या घरी मोबाईल मधून पिक विमा भरण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा.????????????

1 रुपयात पिक विमा बाबत संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो , आज आपण शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे १ रुपया मध्ये मिळणारी पीक विमा योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे , कागदपत्रे , कोण कोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ घेण्यात येईल , सर्वात महत्वाचं म्हणजे या विम्याचा हफ्ता कधी व कोठे आणि कधीपासून भरता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्र. (१) च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रं. १३.१.१० अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर, ईलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान १ रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल. तद्नुषंगाने, मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतक-यांना केवळ रु. १ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “एक रुपयात पीक विमा” या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याकरीता वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांनुसार शेतक-यांना केवळ रु.१/- भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. ३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल.

ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल. विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरींग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल (80:110) नुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्यायासह राबविण्यात येईल.

योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देते वेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली.

घरातूनच मोबाईल द्वारे पिक विमा भरण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा. ????????????????????

आता आपण पाहूया एक रुपयात पीक विमा काढला जाणार ह्या बद्दल माहिती :

1 Rupayat Pik Vima Yojana राज्यातील शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीनं पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली.

राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra मिळणार आहे. याची उर्वरित रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली. यासाठी अंदाजे ३३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

1 Rupyat Pik Vima Yojana ह्या योजनेचा हेतू :

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे.

पीक विमा म्हणजे काय ?

नैसर्गिक आपत्ती , कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा सरंक्षण देणे पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. योजनेची वैशिष्ट्य : कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये : 1 Rupyat Pik Vima Yojana Maharashtra पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. खरीपातील सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.

या कारणांसाठी विमा कवच

– हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर, दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास.

– पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र

– पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती अथवा किड, रोगामुळे होणारे नुकसान

स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, गारपीट झाल्यास नुकसान भरपाई मिळते. भारतीय कृशी विमा कंपनीतर्फे या योजनेचे संचालन केले जाते. दरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) सुरू केली आहे. १३ जानेवारी २०१६ रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता.

मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (1 Rupayat Pik Vima Yojana Maharashtra) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि , त्याच हेतू , उद्दिष्ट , ती योजना म्हणजे काय इत्यादी ,मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल .

धन्यवाद !!

मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मतदान ओळखपत्र मतदान करण्यासाठी आणि एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वोटर ...
पिक विम्याची नुकसान भरपाई कशी मिळवावी| Pik Vima Nuksan Bharpai

पिक विम्याची नुकसान भरपाई कशी मिळवावी| Pik Vima Nuksan Bharpai

Pik Vima Nuksan Bharpai : महाराष्ट्र राज्य शासन शेतकऱ्यांसाठी नेहमीच ...
महाराष्ट्र राज्य जनावर खरेदी विक्री महासंघ यांचे जिल्ह्यानुसार व्हाट्सअप ग्रुप |district wise whatsapp groups

महाराष्ट्र राज्य जनावर खरेदी विक्री महासंघ यांचे जिल्ह्यानुसार व्हाट्सअप ग्रुप |district wise whatsapp groups

नमस्कार मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुप तयार ...
पिक विमा नुकसान भरपाई| ३५ लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळाला

पिक विमा नुकसान भरपाई| ३५ लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळाला

शेतकऱ्यांना दिवाळी साठी आर्थिक मदत देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे ...
जलसंपदा विभाग मेगा भरती|अर्ज करा.

जलसंपदा विभाग मेगा भरती|अर्ज करा.

जलसंपदा विभाग भरती 2023 निवड प्रक्रिया जलसंपदा विभाग भरती 2023 ...
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार. | Nomo shetkari mahasanman yojna 1st installment.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता या तारखेला जमा होणार. | Nomo shetkari mahasanman yojna 1st installment.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच पीएम किसान सन्मान निधी या केंद्र ...
शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी ...

Leave a Comment