Ration Card Online Maharashtra : तुम्हाला दरमहा रेशन किती मिळते? तुमच्या नावावर असलेले सर्व रेशन दुकानदार तुम्हाला देतो का? आता स्वतः तपासा मोबाईलवर ऑनलाईन?

नमस्कार मंडळी, आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, तो विषय म्हणजे तुम्हाला रेशन किती मिळते? आणि दुकानदार तुम्हाला रेशन किती देतो? यासंबंधीची सर्व माहिती आपण ऑनलाईन मोबाईलवर Ration Card Maharashtra Online कशाप्रकारे तपासायचे असते? यासंबंधी सर्व माहिती घेणार आहोत. तरीही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि तुम्हाला किती रेशन मिळते हे तुम्ही एकदा नक्की तपासा.

सरकारच्या खाद्य सुरक्षा कायदे अंतर्गत रेशन कार्डच्या माध्यमातून गरिबांना मोफत धान्य वितरित केले जाते. आणि यासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजेच पीडीएस कार्यरत आहेत. रेशनच्या खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सरकारने “ई – पीओएस” ही ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेद्वारे रेशन कार्डधारकांना किती धान्य दिले जाते यासंबंधीची सर्व माहिती दिली जाते. यासंबंधीची सर्व माहिती घेण्याअगोदर ही “ई-पीओएस” यंत्रणा काय आहे? हे आपण एकदा समजावून घेऊ. Ration Card Maharashtra

तुम्हाला रेशन किती मिळते हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

काय आहे ई-पीओएस यंत्रणा?

ई-पीओएस म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स पॉईंट ऑफ सेल होय. ही यंत्रणा केंद्र सरकारकडून चालवण्यात येत असून शिधापत्रिकाधारकांना किती आणि किंवा धान्य वितरित केले गेले आहे, Ration Card Online Maharashtra यासंबंधीची सर्व माहिती या यंत्रणेद्वारे मिळते. यासंबंधीची सर्व माहिती मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकांचे आधार कार्ड यासोबत जोडलेले असणे गरजेचे असते. राज्यात सर्वप्रथम ही यंत्रणा जानेवारी 2017 मध्ये लातूर जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. मग त्यानंतर राज्यात यंत्रणा राबवण्यात आली. सध्या या यंत्रणेद्वारे आपल्याला रेशन किती मिळते हे आपणास समजते.

ई-पीओएस यंत्रणा काम कसे करते?

राज्यातील सर्व रेशन कार्ड ग्राहकाच्या रेशन कार्ड वरील कुठलाही सदस्य रेशन दुकानावरील ई-पीओएस यंत्र म्हणजेच मशीनवर अंगठा देवून स्टेशन घेऊ शकतो. मशीनवर अंगठा दिल्यानंतर मशीन मधून एक पावती निघते त्यावर धान्य वितरकाचा संपूर्ण तपशील दिलेला असतो. काही वेळा या मशीनवर अंगठा दिल्यास काम करत नसल्यास डोळ्यांचाही वापर यासाठी केला जातो. Ration Card Online Maharashtra

तुम्हाला रेशन किती मिळते हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

रेशन दुकानावरील तक्रारीः

आता माहिती अधिकाराच्याद्वारे आपण आपल्या दुकानातील कारभार सुरळीत चालू आहे का? याची माहिती मिळवू शकतो. कारण रेशननिंग व्यवस्थेवर खूप गरिबांचे पोट चालू आहे. खूप वेळ दुकानदारांच्या तक्रारी येत असतात की, महिन्याचे जे रेशन आहे ते फक्त ८ दिवस वाटले जाणार किंवा आठवड्यातून फक्त २ वेळ रेशन दिले जाणार. यावेळी धान्य कमी आले आहे त्यामुळे तुम्हाला पण कमी दिले जाईल. अशा अनेक तक्रारी वारंवार येत असतात. जर कामकाज नीट चालत नसेल तर आपण माहितीच्या अधिकाराद्वारे कारभार कसा चालतो याची माहिती मिळव शकतो.

ही माहिती केंद्रीय माहितीच्या अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत येते. याच्या अर्जामध्ये ३ प्रकार पडतात. पहिला म्हणजे जनमाहिती अधिकार, दुसरा अपिली अधिकारी यांना द्यायचा अर्ज, तिसरा म्हणजे अर्ज थेट आयुक्तांना द्यायचा. त्यांना अ, ब, क असे गट पाडण्यात आले आहेत.

हा अर्ज आपण साध्या कागदावरसुद्धा करू शकतो. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव टाकायचे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता टाकायचा. माहीतिचा विषय टाकायचा. खाली लिहायचे की, आपल्या कार्यालय अंतर्गत असलेल्या दुकान नंबर (जो असेल तो) स्वस्त धान्य दुकानांमध्ये आला आहे.

तुमचे रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच अन्नधान्य व तेल रॉकेलचा या व पुढील महिन्यातील समायोजित झालेला कोटा इत्यादी नोंदी असलेल्या रजिस्टरची सत्यप्रत द्यावी. व विक्री पावती बुकची सत्यप्रत द्यावी. आपल्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या घाऊलरॉकेल दुकानदारांची संख्या किती? आता माहिती कोणत्या प्रकारे हवी आहे ते लिहावे.

अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे की नाही ते लिहावे. १० रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प पेपर जोडा. अर्जदाराची सही, ठिकाण, दिनांक, मोबाईल नंबर लिहा. असा अर्ज करून जमा करा.

रेशन दुकानदाराच्या तक्रारी सार्वजनिक वितरण तक्रार निवारण प्रणाली निःशुल्क क्रमांक 1800-22-4950 व 1967 तसेच ई-मेल: [email protected] वर तक्रार करा.

नमो शेतकरी महासन्मान योजना |पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर

नमो शेतकरी महासन्मान योजना |पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी ...
गावानुसार मतदार याद्या पाहा, तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा.

गावानुसार मतदार याद्या पाहा, तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा.

नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या गावातील सर्व वॉर्डातील मतदारांची यादी ...
तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा किंवा अपडेट करा | link your aadhar card online.

तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा किंवा अपडेट करा | link your aadhar card online.

आपल्या आधार कार्डशी आपला मोबाईल नंबर लिंक असणे खूप महत्त्वाचे ...
प्रधानमंत्री उज्वला योजना |PM ujwala yojna |gas subsidy scheme

प्रधानमंत्री उज्वला योजना |PM ujwala yojna |gas subsidy scheme

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दुहेरी लाभ मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता ...
वन कार्ड क्रेडिट कार्ड ॲप डाऊनलोड करा  |download one card metal credit card app.

वन कार्ड क्रेडिट कार्ड ॲप डाऊनलोड करा |download one card metal credit card app.

वन कार्ड क्रेडिट कार्ड कसे मागवावे वन कार्ड हे भारतातील ...
टोमॅटो लागवड संपूर्ण माहिती | टोमॅटो लागवड तंत्रज्ञान

टोमॅटो लागवड संपूर्ण माहिती | टोमॅटो लागवड तंत्रज्ञान

टोमॅटो हे भारतात मोठ्या प्रमाणावर लागवड होत असलेले पीक आहे ...
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा.

तर माझ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा ...
दोडका लागवड संपूर्ण माहिती | दोडका लागवड तंत्रज्ञान

दोडका लागवड संपूर्ण माहिती | दोडका लागवड तंत्रज्ञान

दोडका या भाजीला पूर्ण भारतात ओळखले जाते, ही एक वेलवर्गीय ...

Leave a Comment