NLM scheme. शेळीपालन योजना

NLM Scheme सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थसाह्याचे स्वरूप

अर्थसाह्याचे स्वरूप बघितल्यास या योजनेमध्ये खाली दर्शविल्यानुसार दोन समान हप्त्यांमध्ये प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर ५० टक्के अनुदान देण्यात येते.

१०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + ५ (बोकड अथवा नर मेंढे ) १० लाख
२०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १० (बोकड अथवा नर मेंढे) २० लाख
३०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १५ (बोकड अथवा नर मेंढे) ३० लाख
४०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २० (बोकड अथवा नर मेंढे) ४० लाख
५०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २५ (बोकड अथवा नर मेंढे) ५० लाख

राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर आणि बँक किंवा वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्याला वितरित केल्यानंतर, शासनामार्फत अनुदानाची ५० % रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते, उर्वरित ५० % अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

बँक कर्ज न घेता स्वयं-निधीमधून प्रकल्प उभारणी करण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये, ज्या बँकेत पात्र लाभधारकाचे खाते आहे, त्या बँकेद्वारे प्रथम प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. प्रकल्प मंजूर झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीने अनुदान वितरित करण्याबाबत शिफारस केल्यानंतर आणि प्रकल्पाच्या एकूण भांडवली खर्चापैकी लाभधारकांनी २५ % खर्च स्वतः केल्यानंतरच शासनामार्फत अनुदानाची ५० % रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित केली जाते, उर्वरित ५० % अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सीने प्रकल्पाची शहानिशा केल्यानंतर लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

स्वनिधीमधून प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या पात्र असलेल्या लाभधारकांनी प्रकल्पातील अनुदान रक्कम वगळता उर्वरित रकमेची हमी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्रालय, भारत सरकार यांच्या नावे ३ वर्षांसाठी बँक गॅरंटीच्या स्वरूपात हमी देणे आवश्यक आहे

Rashtriya pashudhan vikas abhiyan  या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in  व केंद्र शासनाच्या  पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in  यावर उपलब्ध आहे.

योजनेच्या लाभासाठी https://www.nlm.udyammitra.in संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. 

Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

Bajaj Finserv ॲप वरून इन्स्टा पर्सनल लोन कसे मिळवावे| Bajaj Finserv Insta Personal Loan

इन्स्टंट पर्सनल लोन मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे बजाज फिनसर्व्हच्या इन्स्टा ...
Get chrome

Get chrome

Introduction to Google Chrome Google Chrome is one of the ...
नरेंद्र मोदी आणि शेतकरी

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा?

किसान क्रेडिट कार्ड साठी फॉर्म डाउनलोड करा ???????? किसन क्रेडिट ...
Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

PhonePe personal loan apply: आज प्रत्येकाला पैशांची गरज असते, आणि ...
जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

जुन्या नोटा आणि नाणी विकून पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

भारतात जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याची आवड अनेकांना आहे ...

Leave a Comment