पशुसंवर्धनासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत 25 लाख रुपये अनुदान

ऑनलाइन अर्ज करा

या योजनेच्या लाभासाठी www.udyamimitra.gov.inया पोर्टलवर थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जर शेतकऱ्यांना यात अडचण येत असल्यास त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधून पशुसंवर्धन विभागाची मदत घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी यांनी केले आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.


योजनेचा उद्देश
रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात.

ऑनलाईन पोर्टल
https://www.nlm.udyamimitra.in 

अंमलबजावणी यंत्रणा
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पात्र संस्था-व्यक्तीगत/FPO/FCOs/SHG/JLG/कलम ८ अंतर्गत नोंदणी असलेल्या कंपन्या.

योजनेची ठळक वैशिष्टे
१) अर्जदाराने nlm.udyamimitra.in या पोर्टलवर केंद्रशासन पत्र दि. ९.८.२०२१ तसेच दि. २८.१२.२०२२ अन्वये प्राप्त NUM सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार अर्ज सादर करावा.
२) राज्य अंमलबजावणी यंत्रणा सदर अर्जाची छाननी करून पात्र अर्जास Online मंजुरी देइल व as per online path सदर अर्ज बँकेकडे मंजुरीस्तव सादर होईल.
३) बँकेने कर्जपुरवठ्याची हमी दिल्यानंतर सदर प्रकल्प राज्यस्तरीय कार्यकारी समितीसमोर (SLEC) मंजुरीस्तव सादर केला जाईल.
४) सदर प्रकल्पांना SLEC द्वारे मंजुरीस्तव शिफारस प्राप्त झाल्यानंतर, SIA (State Implementing Agency) सदर प्रस्तावाचे शिफारस पत्र online portal वर upload करेल व सदर प्रकल्प केंद्र शासनास मंजुरीस्तव सादर होईल.
५) केंद्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाची प्रकल्प मंजुरी समिती राज्य शासनाने शिफारस केलेल्या प्रकल्पांना मंजुरी देईल आणि मंजुर प्रकल्पांसाठी अनुदानाची रक्कम भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) द्वारे लाभार्थ्यांच्या कर्ज मंजुरी देणारी बँक किंवा वित्तीय संस्थेकडे देईल.

पात्रता निकष
१) अर्जदार स्वत: किंवा त्यांच्याकडील तज्ञ हे प्रकल्पाशी संबंधीत प्रशिक्षित तसेच अनुभव असणे आवश्यक.
२) अर्जदारास त्याचे खाते असलेल्या शेड्युल्ड बँकेकडून संबंधित प्रकल्पासाठी कर्ज हमीपत्र आवश्यक.
३) प्रकल्पासाठी स्वतःची किंवा भाडेतत्वावरची जमीन आवश्यक तसेच KYC साठी आवश्यक कागदपत्रे.
४) अर्जदाराने अर्ज ऑनलाईन सादर करताना द्यावयाची आवश्यक.

कागदपत्रे
 सविस्तर प्रकल्प प्रस्ताव
 प्रशिक्षण प्रमाणपत्र
 अनुभव प्रमाणपत्र
 जमिनिशी सबंधित कागदपत्र (स्वतःची किंवा भाडेकरार) ७/१२
– प्रस्तावित प्रकल्प जागेचे जीओ टॅग छायाचित्र
 स्वतःचे भांडवल/बँक किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज बाबत पुरावा
 पॅनकार्ड
 वास्तव्य पुरावा
 मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
 कॅन्सल बँक चेक
 आधार कार्ड
 अर्जदाराचा फोटो
 जात प्रमाणपत्र
 शैक्षणिक प्रमाणपत्र
 भागीदारी करार
– वस्तु व सेवाकर नोंदणी प्रमणपत्र (लागु असल्यास)
 कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (FPO, FCO, Sec.8 कंपनीकरीता)
– मागील ३ वर्षाचा ऑडीट रिपोर्ट (लागु असल्यास)
 मागील ३ वर्षाचा आयकर विवरणपत्र (लागु असल्यास)

अधिक माहितीसाठी आपल्या जवळील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशूधन विकास अधिकारी यांचाशी संपर्क साधावा.

सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

सरकारकडून 3HP, 5HP, आणि 7.5 HP सौर पंपाचे नवीन दर जाहीर.|Kusum Solar Pump Price.

Kusum Solar Pump Price नमस्कार शेतकरी बांधवानो, केंद्र सरकारच्या सौर ...
तार कुंपण योजनेसाठीची अर्ज करण्याची पद्धत व  कागदपत्रे

तार कुंपण योजनेसाठीची अर्ज करण्याची पद्धत व कागदपत्रे

तार कुंपण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज व ...
लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती, व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या सामाजिक, आर्थिक ...
नमो शेतकरी महा सन्मान योजना | तारीख जाहीर

नमो शेतकरी महा सन्मान योजना | तारीख जाहीर

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो ...
ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

प्रत्येक शेतकऱ्याची शेजाऱ्या बरोबर काही ना काही तक्रार असते तक्रार ...
पशु विमा योजना महाराष्ट्र|animal insurance scheme in Maharashtra.

पशु विमा योजना महाराष्ट्र|animal insurance scheme in Maharashtra.

Animal Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो महाफार्म वेबसाईट पोर्टलवर आपले स्वागत ...
Weather Forecast

Sahyadri Weather Forecast : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Maharashtra weather Rain Forecast : राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने ...

Leave a Comment