नमो शेतकरी महासन्मान योजना |पहिल्या हप्त्याची तारीख जाहीर

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे.

नमो शेतकरी महासन्मान योजनेला सरकारची मंजुरी

शेतकऱ्यांना खूश करणारी बातमी राज्य सरकारने दिली असून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २ हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

या तारखेला नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे जमा होणार.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना घोषित केली होती. केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्षी एका शेतकऱ्यास ६ हजार रुपये अनुदान मिळते. यात राज्याच्या आणखी ६ हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना राबविण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली होती.

पैसे खात्यात कसे येणार?

निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकयांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे. पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरु आहे. तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकयांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या तारखेला नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे जमा होणार.

केंद्राचा १५ वा हप्ताही लवकरच– केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) १५ वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.- दोन हजार रुपयांचा हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकयांच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. हे पैसे जमा करण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असे करा तयार | create ayushyaman bharat golden card.

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड तयार कसे करायचे खालील स्टेप्स फॉलो ...
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ...
पी एम किसान योजनेची लाभार्थी स्थिती व यादी पहा. |Check beneficiary list and status 2024

पी एम किसान योजनेची लाभार्थी स्थिती व यादी पहा. |Check beneficiary list and status 2024

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात ...
दुध वाढीचे उपाय |दुध वाढीसाठी काय करावे.

दुध वाढीचे उपाय |दुध वाढीसाठी काय करावे.

गायीच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी, अनेक प्रमुख घटकांचा विचार करणे आवश्यक ...
1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

जुने सातबारे, फेरफार खाते उतारे कसे पाहायचे Bhumi Land Records ...
सर्व कागदपत्रे मिळवा भारत सरकारच्या डिजीलॉकर वर

सर्व कागदपत्रे मिळवा भारत सरकारच्या डिजीलॉकर वर

DigiLocker ही एक भारत सरकार द्वारे विमोचित केलेली एक डिजिटल ...
मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मतदान ओळखपत्र मतदान करण्यासाठी आणि एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वोटर ...
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमधून 1 कोटी घरांवर सरकार सोलार बसवणार |pm suryoday yojana solar scheme

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमधून 1 कोटी घरांवर सरकार सोलार बसवणार |pm suryoday yojana solar scheme

केंद्र सरकारची नवीन सोलार योजना - केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्योदय ...

Leave a Comment