तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, त्या व्यक्तीला यासंबंधी आधी माहितीपर नोटीस दिली जाईल.

त्यानंतर मग आताच्या सुधारित धोरणाप्रमाणे त्याला मोबदला दिला जाईल.

पण, काही कारणास्तव एखादी व्यक्ती नॉट रिचेबल (संपर्काबाहेर) असेल, तर ती महापारेषणच्या किंवा संबंधित वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्यासंदर्भात अर्ज करू शकते.

जूना नियम काय होता.

महाराष्ट्रात महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) आणि इतर खासगी पारेषण कंपन्यांकडून विद्युत वाहिन्यांचं जाळं टाकलं जातं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज नेण्यासाठी ते गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मनोरे (टॉवर) उभारले जातात.

महाराष्ट्र सरकारनं 2017 साली एक नवीन शासन निर्णय पारित केला होता. त्यानुसार टॉवरखालची जमीन आणि विजेच्या तारेखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात नवीन धोरण लागू केलं होतं. ते आजतागायत लागू होतं.

या धोरणानुसार, तुमच्या शेतात 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आला असेल, तर सुरुवातीला टॉवरनं व्यापलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ मोजलं जाईल. त्यानंतर त्या क्षेत्रफळासाठी तुमच्या भागातील रेडीरेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जात होता.

पण तुमच्या शेतात टॉवर उभारला गेला नसेल आणि फक्त लाईनच्या तारा जात असतील, तर तेव्हाही तुम्हाला मोबदला मिळू शकत होता.

यामध्ये टॉवर टू टॉवर जोडण्यासाठी वायरची जी लाईन जाते, तिला वायर कॉरिडॉर असं संबोधलं जातं. या कॉरिडॉरच्या खाली जेवढी जमीन येते, त्या जमिनीसाठी रेडीरेकनरदराच्या 15 % मोबदला दिला जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं होतं.

आता आजच्या (12 ऑक्टोबर ) सुधारित धोरणामुळे अधिकचा मोबदला शेतकरी आणि जमीन मालकांना मिळणार आहे.

ड्रॅगन फ्रुट लागवड संपूर्ण माहिती |ड्रॅगन फ्रूट लागवडीचे तंत्र

ड्रॅगन फ्रुट लागवड संपूर्ण माहिती |ड्रॅगन फ्रूट लागवडीचे तंत्र

नमस्कार शेतकरी मित्रांनो, या लेखात आपण ड्रॅगन फ्रूट, निवडुंग (cactus) ...
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कशी काढायची | online driving licence Maharashtra 2024

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया पूर्वी खूप किचकट आणि वेळखाऊ होती ...
WhatsApp pay : आता गुगल पे फोन पे वापरण्याची गरज नाही, व्हाट्सअप वरूनच करा कोणालाही upi पेमेंट.

WhatsApp pay : आता गुगल पे फोन पे वापरण्याची गरज नाही, व्हाट्सअप वरूनच करा कोणालाही upi पेमेंट.

जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर पेमेंट सेंड आणि रिसिव्ह करायचे असेल, तर ...
तार कुंपण अनुदान योजना 2023 : शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

तार कुंपण अनुदान योजना 2023 : शेतीला तार कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

Tar kumpan anudan yojna मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांना शेतरस्ता, वहीवाट, यंत्र ...
रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना 2025 | rooftop solar scheme (suryaghar) 2025

रूफटॉप सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण ...
कृषी यांत्रिकीकरण रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र | rotavator anudan yojana Maharashtra

कृषी यांत्रिकीकरण रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र | rotavator anudan yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणात मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू ...

Leave a Comment