मागेल त्याला शेततळे योजना 2023

शेततळे योजना: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मागेल त्याला शेततळे योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये शेततळे अनुदान योजना 2022 चे उद्दिष्ट्य, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकष, लाभार्थी लागू असणाऱ्या अटी,अर्ज कुठे करायचा, अनुदान किती असणार, शासन निर्णय, शेततळ्याचे आकारमान, इत्यादी सर्व घटकांची माहित पाहणार आहोत.

Shettale Anudan Yojana Maharashtra

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज  करण्याची पद्धत पाहण्यासाठी खाली क्लिक करा ????????????

मागेल त्याला शेततळे योजनेचे उद्दिष्ट्य –

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पावसात पडलेला खंड व पाण्याची टंचाई व पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेले आहे. शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्य यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे. तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा विचार करून हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे मागेल त्याला शेततळे योजना जाहीर केली. शेततळे निर्माण केल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे शेततळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरली आहे.

मागेल त्याला शेततळे लाभार्थी पात्रता-

  • ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे.
  • यापूर्वी इतर कोणत्याही योजनांच्या माध्यमातून शेततळे किंवा सामुदायिक सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नाही. असे लाभार्थ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यास पात्र असणार आहेत.
  • लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक असणार आहे.

मागेल त्याला शेततळे लाभार्थी निवड –

  • लाभार्थी शेतकरी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) असल्यास किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीची आत्महत्या झालेली असेल अश्या कुटुंबाला म्हणजेच त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादी देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येते.
  • याव्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची ज्येष्ठता यादीनुसार प्रथम सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात येते.

मागेल त्याला शेततळे अनुदान देय रक्कम-

शेतकऱ्यांच्या उपरोक्त नमूद आकारमानानुसार देय होणारी अनुदानाची रक्कम आयुक्त कृषी यांनी शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर त्वरीत निश्चित करावी व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित कराव्यात. तथापि अनुदानाची कमाल रक्कम रुपये पन्नास हजार इतकी राहील रुपये पन्नास हजार पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधित लाभार्थ्याने स्वतः खर्च करणे आवश्यक असणार आहे.

केवढ्या शेत तळ्यासाठी किती मिळेल अनुदान :- ????????

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा ????????????

मागेल त्याला शेततळे शेततळ्याचे आकारमान-

या योजनेअंतर्गत खालील आकारमानापैकी एका प्रकारची शेततळे घेण्यास मुभा राहील. आकारमान निहाय शेततळ्याचे पृष्ठभागावरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित काम खालील प्रमाणे असणार आहे.

magel tyala shettale yojana shettale akarman

जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रित रित्या सामुदायिक शेततळे घेता येईल. या शेततळ्याचे आकारमान अनुज्ञेय आकारमानाच्या प्रमाणात राहील. तसेच त्यांना मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर पाण्याची टक्केवारी याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार करावा व तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.

शेततळे बांधण्यासाठी लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी-

  • कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांनी शेततळ्यासाठी निश्चित केलेल्या जागीच शेततळे घेणे लाभार्थी शेतकऱ्याला बंधनकारक असणार आहे.
  • कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  • लाभार्थीने स्वतःचा राष्ट्रीयकृत बँक किंवा इतर बँक मधील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक किंवा कृषी सेवक यांच्याकडे पासबुकची झेरॉक्स सहित सादर करणे गरजेचे असणार आहे.
  • कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
  • शेततळ्याची निगा राखण्याची तसेच वेळेप्रसांगीं दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची असणार आहे.
  • पावसाळ्यामध्ये शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही, यासाठी व्यवस्था स्वतः लाभार्त्याने करावी.
  • लाभार्थ्याच्या सातबारा या उतारावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील.
  • शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावणे बंधनकारक असणार आहे.
  • शेताच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये वनस्पतीची लागवड करणे बंधनकारक असणार आहे.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसानभरपाई अनुज्ञेय राहणार नाही. याची नोंद लाभार्थी शेतकऱ्यांनी घ्यावी.
  • मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे लाभार्थीस बंधनकारक राहील.
  • इनलेट व आउटलेट विरहित शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्यास कडे शेततळ्यांमध्ये पाणी उचलून टाकण्याची आवश्यकता व त्या सर्व सुविधा असणे आवश्यक आहे. तसेच अशा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी प्लास्टिक अस्तरीकरण स्वखर्चाने करावे.

तुम्हाला शेततळे हवे असल्यास खाली क्लिक करा.????????????

मागेल त्याला शेततळे आवश्यक कागदपत्रे-

  • जमिनीचा ७/१२ उतारा
  • ८-अ प्रमाणपत्र
  • दारिद्र रेषेखालील कार्ड किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला

OLX वरून जुने वाहन कसे घ्यावे | how to buy old cars on olx

OLX वरून जुने वाहन कसे घ्यावे | how to buy old cars on olx

Second Hand Car : भारतात सेकेंड हँड वाहनांची मोठी बाजारपेठ ...
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत | mini tractor anudan yojna Maharashtra apply

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ...
क्रोम

क्रोम

क्रोम ब्राउझर काय आहे? क्रोम ब्राऊझर हा एक वेब ब्राउझर ...
मातोश्री शेत पाणंद रस्ता योजना |शेत रस्ता योजना संपूर्ण माहिती

मातोश्री शेत पाणंद रस्ता योजना |शेत रस्ता योजना संपूर्ण माहिती

मातोश्री पाणंद रस्ता शासन निर्णय pdf: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ...
बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

कसा करणार अर्ज ? Biogas subsidy scheme संबंधित पशुपालकाने आवश्यक ...
Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

PhonePe personal loan apply: आज प्रत्येकाला पैशांची गरज असते, आणि ...
महाराष्ट्र पिक विमा 2023 यादी

महाराष्ट्र पिक विमा 2023 यादी

पिक विमा महाराष्ट्र राज्य 2023 च्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जो ...
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करायचा. | अर्ज डाऊनलोड करा.

सध्याच्या काळात आयुर्विम्याचे महत्त्व वाढत असताना लोक मोठ्या प्रमाणात विमा ...
Moneyview personal loan app |मनीव्ह्यू ॲप वरून पर्सनल लोन मिळवून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करा | best personal loan app

Moneyview personal loan app |मनीव्ह्यू ॲप वरून पर्सनल लोन मिळवून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करा | best personal loan app

शेतकऱ्यांना किंवा प्रत्येक सामान्य माणसाला सध्याच्या महागाईमुळे पैशांची गरज खूप ...

Leave a Comment