आता सर्वसामान्य ही घेऊ शकनार टोयोटा फॉर्च्यूनर |टोयोटा काढत आहे स्वस्तातली फॉर्च्युनर |toyota fortuner new version.

फॉर्च्युनर ही महागातील एसयुव्ही कार आहे, याची शो-रुम किंमत ३३.४३ लाख रुपयांपासून ते ५१.४४ लाख रुपयांपर्यंत आहे

एखादं छानसं घरं आणि अलिशान गाडी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीकडून सर्वसामान्यांच्या कारचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. स्वस्तात आधुनिक आणि चांगल्या अलिशान गाड्या उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होतो. त्यातूनच, रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी पाहिलेलं स्वप्न म्हणून टाटाची नॅनो कार रस्त्यावरुन धावली. तर, महिंद्राच्या बोलेरो आणि स्कॉर्पिओनेही ग्रामीण भागात धुमाकूळ घातला होता. आता, टोयोटाच्या फॉर्च्युनर कारची चलती आहे. भारतीय ग्राहकांमध्ये फॉर्च्युनर गाडीला मोठी पसंती मिळत आहे.

फॉर्च्युनर ही महागातील एसयुव्ही कार आहे, याची शो-रुम किंमत ३३.४३ लाख रुपयांपासून ते ५१.४४ लाख रुपयांपर्यंत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एसयुव्ही बजेटच्या बाहेर आहे. त्यामुळे, कंपनीकडून सर्वसामान्यांच्या बजेटमधील एसयुव्ही फॉर्च्युनर लाँच केली जाण्याची शक्यता आहे. जी कार लूक आणि फिचर्सच्या बाबतीत सध्याच्या फॉर्च्युनरसारखीच असेल. पण, पावरच्या बाबतीत कमी असेल. 

बँकेने ओडून आणलेल्या गाड्या खूपच कमी दरात, एक लाखात कार तर पंधरा हजार रुपयांत टू व्हीलर घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

नुकतेच टोयोटाने इनोव्हेटीव्ह इंटरनॅशनल मल्टी पर्पज व्हेईकल (IMV 0) नावाच्या प्लॅटफॉर्मला शोकेस केले आहे. ज्यामध्ये विविध कस्टमाइजेबल आर्किटेक्चर आहे, ज्याद्वारे वेगवेगळ्या रेंजच्या एसयूव्ही बनवल्या जाऊ शकतील. त्यातच, एक स्वस्तातील टोयोटा फॉर्च्यूनर असू शकते. भारतासारख्या देशामध्ये एसयूव्हीची क्रेझ पूर्ण करण्यासाठी कंपनीकडून स्वस्तातील फॉर्च्यूनर कार बाजारात उतरवली जाऊ शकते.

टोयोटो फॉर्च्युनरला २ प्रकारचे इंजिन आहे. त्यापैकी, एक २.७ लिटर पेट्रोल इंजिन, १६६ पीएस पॉवर आणि २४५ न्यूटन मीटरचे पीक टॉर्क जनरेट करते. तर, २.८ लिटर टर्बो डिझेल इंजिन २०४ पीएसची सर्वाधिक पॉवर आणि ५०० न्यूटन मिटरचा पिक टॉर्क जनरेट करते. यास ५ स्पीड मॅन्यूअल, ६ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये बनवण्यात आलं आहे. डिझेल इंजिनला ४ व्हील ड्राईव्हट्रेनमध्ये सादर केलं गेलं आहे.

ग्राहकांच्या आवडत्या टॉप पाच SUV कार

टोयोटा फॉर्च्युनर ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे गेल्या महिन्यामध्ये 3,086 ग्राहकांनी खरेदी केली होती. त्यानंतर जीप मेरिडियन, एमजी ग्लोस्टर, फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कोडियाक सारख्या एसयूव्हीचा क्रमांक लागतो.

जेव्हा जेव्हा फुलसाईज एसयूव्हीचा विचार केला जातो तेव्हा पहिले नाव लक्षात येते ते म्हणजे टोयोटा फॉर्च्युनर. दमदार लुक तसेच मस्त फिचर्ससह सुसज्ज असलेल्या या एसयूव्हीची दर महिन्याला बंपर विक्री होते. यानंतर जीप मेरिडियन, एमजी ग्लोस्टर, फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कोडियाक सारख्या फुलसाईझ एसयूव्हींची चांगली विक्री होत आहे. जर तुम्हाला आजकाल स्वतःसाठी फुलसाईज SUV खरेदी करायची असेल, तर आम्ही तुम्हाला जून 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणार्‍या 5 SUV चा विक्री अहवाल सांगतो.

जुनी टोयोटा फॉर्च्युनर कमीतकमी किमतीत खरेदी करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

या 5 फुलसाईज एसयूव्हीचा विक्री अहवाल पाहा-

जून 2023 मध्ये, भारतात सर्वाधिक विकली जाणारी फुलसाईज SUV टोयोटा फॉर्च्युनर होती. ही 7 सीटर SUV 3,086 ग्राहकांनी खरेदी केली. तसेच टोयोटा फॉर्च्युनरची विक्री वर्षभरात 2 टक्क्यांनी कमी झाली आहे. जून 2022 मध्ये फॉर्च्युनरच्या 3233 युनिट्सची विक्री झाली.

जीप मेरिडियन ही 282 ग्राहकांनी विकत घेतलेली जीप मेरिडियन ही गेल्या महिन्यात दुसरी सर्वाधिक विक्री होणारी फुलसाईज SUV होती. मेरिडियनची वार्षिक विक्री कमी झाली आहे. तिसर्‍या क्रमांकावर एमजी ग्लोस्टर होते, ज्याने मागील महिन्यात 263 ग्राहकांनी खरेदी केल्यामुळे वार्षिक विक्रीमध्ये 74 टक्के वाढ झाली. जूनमध्ये, फोक्सवॅगन टिगुआन आणि स्कोडा कोडियाक 133 आणि 194 ग्राहकांसह अनुक्रमे 4 आणि 5 व्या क्रमांकावर होते. या दोन्ही SUV च्या विक्रीत वार्षिक 100% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

या 5 फुलसाईज SUV च्या किमती पाहा-

  • टोयोटा फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत 32.99 लाख ते 50.74 लाख रुपये आहे.
  • जीप मेरिडियनची एक्स-शोरूम किंमत 32.95 लाख ते 38.52 लाख रुपये आहे.
  • MG Gloster ची एक्स-शोरूम किंमत 38.08 लाख ते 43.08 लाख रुपये आहे.
  • Volkswagen Tiguan ची एक्स-शोरूम किंमत 34.70 लाख रुपये आहे.
  • Skoda Kodiaq ची एक्स-शोरूम किंमत 37.99 लाख ते 41.39 लाख रुपये आहे.

ई-पीक पाहणी (e-pik pahni app)- शेतकऱ्यांनी स्वतः शेतातल्या पिकांची नोंद सातबारावर करा तेही स्वतःच्या मोबाईलवर.

ई-पीक पाहणी (e-pik pahni app)- शेतकऱ्यांनी स्वतः शेतातल्या पिकांची नोंद सातबारावर करा तेही स्वतःच्या मोबाईलवर.

शेतकरी स्वत:हून त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार ...
SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

SBI पेंशन योजना चालू करून 60 वर्षानंतर पन्नास हजार रुपये पेन्शन मिळवा. | Sbi retire smart plan

"आयुष्य लहान आहे त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घ्या" ही लोकप्रिय ...
1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

जुने सातबारे, फेरफार खाते उतारे कसे पाहायचे Bhumi Land Records ...
मिरची वरील थ्रिप्स नियंत्रण | मिरची पिकावरील थ्रिप्स

मिरची वरील थ्रिप्स नियंत्रण | मिरची पिकावरील थ्रिप्स

मित्रांनो थ्रिप्स हे बऱ्यापैकी सर्वच पिकांमध्ये आढळते. काही पिकांमध्ये याचे ...
महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून मिळणार 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार 2024

महाराष्ट्रात महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून मिळणार 50000 प्रोत्साहन अनुदान मिळणार 2024

महाराष्ट्र मध्ये आता कर्जमाफी होण्याची शक्यता दिसून येत आहे महाविकास ...
तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, ...

Leave a Comment