एलआयसी ची नवीन पॉलिसी |LIC Dhan Sanchay Scheme

LIC : एलआयसीच्या या योजनेत जोरदार मिळेल परतावा, असा होईल फायदा

आजच्या युगात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, भारतीय जीवन विमा महामंडळावर (LIC) अनेक लोकांचा अद्यापही भरोसा कायम आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एलआयसी वेळोवेळी अनेक आकर्षक योजना घेऊन येते. आता आपण एलआयसीच्या कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणाऱ्या योजनेची माहिती घेऊयात. एलआयसीची धन संचय पॉलिसी (LIC Dhan Sanchay Scheme) ही अशीच एक योजना आहे. यामध्ये हमखास परतावा मिळतो. सोबतच इतर फायदेही मिळतात. एलआयसीच्या योजनेत गुंतवणुकीसोबतच विम्याचेही संरक्षण मिळते.

एलआयसीच्या पाच वर्षात पैसे डबल च्या योजनेबाबत अधिक माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करा.

LIC धन संचय प्लॅन एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग, स्वतंत्र बचत विमा योजना आहे. या योजनेत बचतीसोबतच जीवन विम्याचा लाभही मिळतो. या पॉलिसीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते. तर योजनेतील निश्चित फायदे आणि अनुषांगिक लाभ ही हमखास देण्यात येतात.

LIC Dhan Sanchay Scheme

एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचे चार पर्याय मिळतात. प्लॅन ए आणि बी अंतर्गत 3,30,000 रुपयांचा सम ॲश्युर्ड, प्लॅन सी अंतर्गत 2,50,000 रुपयाची किमान सम ॲश्युर्डचे संरक्षण, प्लॅन डी अंतर्गत 22,00,000 रुपयांचा सम ॲश्युर्ड संरक्षण मिळते

या योजनेत वयाची अट आहे. योजनेत 3 वर्षांच्या किमान वयाची अट आहे. वयाची कमाल अट प्लॅनमध्ये वेगवेगळी आहे. प्लॅन ए आणि बीची कमाल वयाची अट 50 वर्ष, प्लॅन सी अंतर्गत 65 वर्षे आणि डी साठी 40 वर्षाची कमाल मर्यादा आहे.

एलआयसी धन संचय स्किम

ही पॉलिसी तुम्ही 5, 10 आणि 15 वर्षांसाठी खरेदी करु शकता. जितक्या वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक कराल, त्यानंतर तितक्या वर्षासाठी उत्पन्न मिळेल. म्हणजे 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर पुढील 5 वर्षांसाठी नियमीत कमाई होईल.

22 लाखांचा पूर्ण लाभ मिळेल

तुम्ही या पॉलिसीमध्ये 5, 10 आणि 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही 10 वर्षांची योजना निवडल्यास, 10 वर्षांसाठी उत्पन्न असेल. या पॉलिसीमध्ये किमान प्रीमियम वार्षिक 30,000 रुपये आहे. या प्लॅनमध्ये गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर किमान 2.50 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 22 लाख रुपये मिळू शकतात.

या योजनेचे संपूर्ण माहितीसाठी एलआयसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

या योजनेत कमीतकमी 30000 रुपयांची वार्षिक गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. या योजनेत तुम्हाला कर्ज ही मिळते. या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पॉलिसी खरेदी करता येते.

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

गुगल पे वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा |Personal loan on Google Pay

सह्याद्री हवामान राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आजपासून (ता. २४) ...
Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र शासनाने शेळीपालन या ...
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या योजना | mini land Farmers Scheme in Marathi

अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या योजना | mini land Farmers Scheme in Marathi

अल्पभूधारक शेतकरी योजना नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी अल्पभूधारक शेतकरी योजना ...
डिझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र : Diesel Pump Subsidy scheme Maharashtra

डिझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र : Diesel Pump Subsidy scheme Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे ...
Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

सध्याच्या काळात पैसा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पैसा नसेल तर ...
1 किलोवॅट सोलर पॅनल बसवा फक्त दहा हजार रुपये देऊन | buy 1kW solar system on EMI.

1 किलोवॅट सोलर पॅनल बसवा फक्त दहा हजार रुपये देऊन | buy 1kW solar system on EMI.

सोलर पॅनल तुमच्या घरासाठी स्वच्छ ऊर्जा मिळवण्याचा एक उत्तम मार्ग ...
विहीर

विहीर अनुदान योजना 2023 |पात्रता, कागदपत्रे व अर्ज करण्याची पद्धत.

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत खाली दिलेली आहे. ???????????? ...

Leave a Comment