जमिनीचा नकाशा कसा पाहायचा | land record map Maharashtra

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे संबंधित गावामध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतु:सिमा, आजबाजूचे गटनंबर आणि मालक कोण आहेत, याची माहिती घरबसल्या एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहे.

गाव नकाशा ऑनलाईन

ऑनलाइन सातबारा उतारा, आठ “अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हे नंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूनकाशा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी गाव नकाशाची माहिती गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. 

सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्‍यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांक्ष-रेखांक्षसह (जीपीएस) सर्व माहिती नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणे शक्‍य झाले आहे.

सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे जमिनीचे स्थान निश्‍चितीसाठी ही माहिती उपयुक्‍त ठरणार आहे. त्याच बरोबर संबंधित सर्व्हे नंबरवर मालकी कोणाची आहे हे समजणार आहे. राज्यात एकूण 44 हजार 278 गावे असून त्यापैकी 36 हजार 500 गावचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

गाव नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

त्याच बरोबर संबंधित सर्व्हे नंबरवर मालकी कोणाची आहे हे समजणार आहे. राज्यात एकूण 44 हजार 278 गावे असून त्यापैकी 36 हजार 500 गावचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित गावांचे नकाशा लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.ऑनलाइन सातबारा उतारा, आठ “अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हे नंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूनकाशा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

गाव नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती :????

असा शोधा नकाशा

– सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा संकेतस्थळावर उपलब्ध

सर्वात पहिला महाभु नकाशा या वेबसाईटवर जा.????

– या संकेतस्थळावर गेल्यावर पहिल्यांदा जिल्हा निवडा, तालुका आणि त्यानंतर गाव निवडा

– यानंतर गाव नकाशा हा पर्याय निवडा

– गाव नकाशा उपलब्ध होईल.

– संबंधित सर्व्हे नंबर टाकल्यावर त्या क्षेत्राचा नकाशा पीडीएफमध्ये उपलब्ध.

नकाशा पाहण्याची प्रोसेस खालील प्रमाणे आहे.

आपण खाली आपल्या गावचा नकाशा कसा पाहायचा व आपल्या जमिनीचा गट नंबर नुसार नकाशा कसा पाहायचा हे आपण खाली दिलेल्या आहे. खाली आपण स्टेप बाय स्टेप नकाशा कसा पाहायचा हे दिलेले आहे, त्या पद्धतीने आपण तुमचा नकाशा पाहायचा आहे.

गावचा नकाशा कसा पाहायचा?

गावच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे.

किंवा

तुमच्या गावचा नकाशा पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

आता सुरुवातीला गावाचा नकाशा कसा काढायचा याची माहिती पाहूया.

या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी मध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर रुरल हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी village map यावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.

होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.

त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.

पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.

नकाशा

आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ?

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खाली बटन वर क्लिक करा.

या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.

इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.

होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.

आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.

नकाशा

ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.

यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 337 या गटाशेजारी 329, 338, 340,341,346,336 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.

आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

ई-नकाशा प्रकल्प काय?

भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. या नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात.

पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा हा प्रकल्प हाती सरकारनं हाती घेतला आहे.

या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे.

त्यामुळे डिजिटल सातबारा, आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.

Tags

जमिनीचा नकाशा दाखवा, जमिनीचा नकाशा पाहणे, जमिनीचा नकाशा कसा काढायचा, जमिनीचा नकाशा कसा बघायचा, जमिनीचा नकाशा कसा पाहावा, जमिनीचा नकाशा महाराष्ट्र, जमिनीचा नकाशा कसा पाहायचा, जमिनीचा नकाशा,land record, land record online, गट नंबर नकाशा, गट नंबर नकाशा कसा पाहायचा, गट नंबर नकाशा दाखवा. सर्वे नंबर/गट नंबर नकाशा, जमिनीचा गट नंबर नकाशा, जमिनीचा गट नंबर नकाशा app, land record map Maharashtra, land record नकाशा, land record Maharashtra,

स्वतः मतदान कार्ड काढा|nvsp.in voter id card

स्वतः मतदान कार्ड काढा|nvsp.in voter id card

घरबसल्या बनवा वोटर आयडी सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर ...
पुन्हा कर्जमाफी ! न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार |loan waiver for farmers

पुन्हा कर्जमाफी ! न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार |loan waiver for farmers

Maharashtra : शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनासंदर्भात ...
आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

खालील चरणांचे अनुसरण करून तुम्ही व्हॉट्सअॅपवरून पॅन कार्ड आणि आधार ...
तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा | weather report of  Maharashtra districts

तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज पहा | weather report of Maharashtra districts

जिल्ह्यांनुसार अंदाज पाहण्यासाठी विभाग निवडा या हवामान अंदाज च्या पेजवर ...
गाव नकाशा ऑनलाईन पहा |village land record map

गाव नकाशा ऑनलाईन पहा |village land record map

नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती :???? असा शोधा ...
आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

Ration card online नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला रेशन कार्ड ...
गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

गांडूळ खत प्रकल्प अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा |apply for vermicompost project subsidy scheme

सेंद्रीय निविष्ठा उत्पादन यूनिट अनुदान साठी अर्ज कुठे करावा ? ...

Leave a Comment