भूमी अभिलेख नवीन नियम | दोन-तीन गुंठे जमीन अशा प्रकारे खरेदी विक्री करता येणार | land record Maharashtra

गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून त्यांची दस्त नोंदणीही होत आहे.

जमीन खरेदी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक, परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

जमीन खरेदी विक्रीमध्ये होणारे तंटे आणि वादविवाद निर्माण होऊन नयेत यासाठी राज्य सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. जिरायत, बागायत जमीन खरेदीसाठी राज्य सरकारनं नवे नियम लागू केले आहेत. जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असणार आहेत. शेतकऱ्यांकडून या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जिरायत जमीन 2 एकरापेक्षा कमी क्षेत्र असल्यास खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन 20 गुंठ्यापेक्षा कमी असेल तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे. 2 एकराच्या गटातील5 ते 6 गुंठे जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही, असाही नियम बनवण्यात आला आहे.

तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.????????

तुमच्या जमिनीसाठी रस्ता कसा मिळवायचा, यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

नोंदणी आणि मुंद्रांक विभागाच्या आदेशात नेमकं काय म्हटलंय

Department of Registration Stamps circular

इतर काही योजना:????????

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

नोंदणी आणि मुंद्रांक विभागाचं परिपत्रक | land record Maharashtra

गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून त्यांची दस्त नोंदणीही होत आहे. मध्यंतरी राज्य सरकारने या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. यात असे अनेक प्रकार झाल्याचे निदशर्नास आले होते. यास्तव दुय्यम निबंधक यांना दस्त नोंदणी करतांना वर नमुद केलेल्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५, कलम ८ब मधील परंतु मध्ये नमुद केल्याप्रमाणे मंजूर केलेला पोटविभाग किंवा रेखांकन दस्तासोबत न जोडता दस्त नोंदणीस स्विकारता येणार नाही.

Department of Registration Stamps circular 1

नोंदणी व मुद्रांक विभाग परिपत्रक

नवीन शेत जमीन खरेदी करताना पाच महत्त्वाच्या गोष्टी ????????

नोंदणी व मुंद्राक विभागाचा नेमका आदेश काय?

1) एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे. त्याच सर्व्हे नंबरमधील(7/12) तुम्ही एक, दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल, तर त्यांची दस्त नोंदणी होणार नाही. मात्र, त्याच सर्व्हे नंबरचा ‘ले-आउट’ करून त्यामध्ये एक, दोन गुंठयांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली असेल तर अशा मान्य ले-आउट’ मधील एक, दोन गुंठे जमिनीच्या व्यवहाराची दस्त नोंदणी होऊ शकणार आहे.

2) यापुर्वीच ज्या पक्षकाराने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडयाची खरेदी घेतली असेल, अशा तुकडयाच्या खरेदी विक्री व्यवहारासाठी सुध्दा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अधिनियम, 2015 कायदयातील कलम 8 नुसार सक्षम प्राधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे.

3) एखादा अलहीदा निर्माण झालेल्या तुकडयाची शासन भुमी अभिलेख विभागामार्फत हददी निश्चित होऊन / मोजणी होवून त्याचा स्वतंत्र हदद निश्चितीचा मोजणी नकाशा देण्यात आला असेल अशा क्षेत्राचे विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही. अशा स्वतंत्रपणे निर्माण झालेल्या तुकड्याच्या विभाजनास वरील अटी व शर्ती लागू रहातील.

Department of Registration Stamps circular 2

नोंदणी व मुंद्रांक शुल्क विभाग परिपत्रक |land records

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. नोंदणी महानिरीक्षकांच्या आदेशावर राज्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. समाज माध्यमावर शेतकऱ्यांनी या निर्णयाबद्दल रोष व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरं जाव लागू शकतं, असं काहींचं म्हणनं आहे.

शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी ...
स्ट्रॉबेरी लागवड संपूर्ण माहिती | स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान

स्ट्रॉबेरी लागवड संपूर्ण माहिती | स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान

स्ट्रॉबेरीची शेती जास्त नफा आणि तुलनेने सुलभ लागवड प्रक्रियेमुळे महाराष्ट्रात ...
फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा |location tracker app download

फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा |location tracker app download

जेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा त्या व्यक्तिच्या ...
कृषी यांत्रिकीकरण रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र | rotavator anudan yojana Maharashtra

कृषी यांत्रिकीकरण रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र | rotavator anudan yojana Maharashtra

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणात मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू ...
Olyv (SmartCoin) Personal Loan App वरून 1.5 लाख रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे? | Olyv (SmartCoin) 1.5 lakh Personal Loan online apply.

Olyv (SmartCoin) Personal Loan App वरून 1.5 लाख रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे? | Olyv (SmartCoin) 1.5 lakh Personal Loan online apply.

आजच्या डिजिटल युगात वैयक्तिक कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे ...
आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

आधार आणि पॅन कार्ड व्हॉट्सॲप वरून मिळवा

खालील चरणांचे अनुसरण करून तुम्ही व्हॉट्सअॅपवरून पॅन कार्ड आणि आधार ...
शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाची शिलाई मशीन योजना ही एक कल्याणकारी योजना आहे ...

Leave a Comment