तुमची कुणबी नोंद आहे का पहा? कुनबी नोंद कुठे तपासायची? : Kunabi nondi Maharashtra


मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची व्याप्ती पाहता महाराष्ट्र सरकार झुकले आणि त्यांनी एक जीआर काढला. मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढवण्यात आली आहे, असे या नव्या जीआरमध्ये म्हटलं. संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Kunabi nondi

मराठी आरक्षणाच्या निमित्ताने सध्या महसूल, शिक्षणविभाग,  ग्रामपंचायत, पोलिस विभाग अशा सर्वच शासकीय विभागाकडील 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यात जवळपास दीड कोटी दस्ताऐवज तपासून झाले असून त्यात 22 हजारांवर नोंदी आढळल्या आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात देखील 20 हजारांवर कुणबी नोंदी सापडल्या आहेत.  वंशावळ जुळलेल्या अर्जदाराने शासनाने मागितलेल्या खऱ्या कागदपत्रांसह तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधिताला 45 दिवसांत जात प्रमाणपत्र शासनाकडून दिले जात आहे. हे जात प्रमाणपत्र मराठा आरक्षणाअंतर्गत दिले जात आहे.Maratha Aarakshan kunabi nondi

मराठा तरुणांसाठी 15 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????

कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे?

मात्र कुणबी प्रमाणपत्र नक्की काढतात कसे? यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्तनातेसंबंधातील नातेवाईक म्हणजे तुमचे वडील/चुलते/आत्या, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, वडिलांचे चुलते/आत्या, आजोबांचे चुलते/आत्या, पणजोबांचे चुलते/आत्या, खापर पणजोबांचे चुलते/आत्या यापैकी कुठल्याही एका नातेवाईकाचा कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.

Maratha Aarakshan kunabi nondi

कुणबी नोंदी आणि शासकीय प्रणाली

राज्यात सर्वाधिक कुणबी नोंदी कुठे सापडल्या असतील तर त्या नगर, धुळे, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, जालना या जिल्ह्यांमध्ये आढळल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 22 हजार नोंदी आढळल्या आहेत. 3 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील नोंदीचा अहवाल राज्य सरकारला पाठविला गेला आहे.  त्यामध्ये 1948 ते 1967 नंतरच्या  नोंदींची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, वंशावळ जुळवून उर्वरित कागदपत्रे असल्याशिवाय जात प्रमाणपत्र दिले जात नाही हा देखील शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेता आहे.  Maratha Aarakshan kunabi nondi

तुमची कुणबी नोंद नसेल तर तुम्ही काय केले पाहिजे.

तुम्हाला मराठा आरक्षणांतर्गत कुणबी प्रमाणपत्र मिळवायचे असल्यास सर्वप्रथम तहसिलदाराकडे किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन कुणबी नोंदी तपासाव्या लागतील. या कुणबी नोंदी तपासण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्हानिहाय वेबसाईट तयार केल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे Maratha Aarakshan kunabi nondi

अशाच प्रकारची सरकारी माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.????

कुणबी नोंद प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराची वंशावळ  या पद्धतीने वडिल, आजोबा, पणजोबा काढून त्याची पुराव्यानिशी जुळवणी करावी लागणार.
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
  • अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
  • जन्म- मृत्यू नोंदीचा १९६७ पूर्वीचा पुरावा
  • कुटुंबातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र

कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज कुठे करावा?

  • महाराष्ट्र शासनाची ऑनलाई सेवा पुरवीणारी अधिकृत वेबसाईट https://mahasupport.in/kunbi-caste-certificate/ असून यावर क्लिक करुन तुम्ही अर्ज करु शकता. किंवा महा-ई-सेवा केंद्रातून तहसीलदारांकडे देखील अर्ज करु शकता.
  • शासनाने सांगितलेली  योग्य कागदपत्रे जोडल्यास तुम्हाला केवळ 45 दिवसांच्या आत तुम्हाला प्रमाणपत्र मिळते
  • कारण 45 दिवसांच्या आत कुणबी प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
  •  कुणबी प्रमाणपत्रेसाठी अर्ज करताना  अर्जदाराला 53 रुपये इतके शासकीय शुल्क भरणे बंधनकारक आहे.
  • अर्ज करताना काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यांची माहिती अर्जदाराला मोबाईलवर समजणार आहे.

जातीचा पुरावा मिळवण्यासाठी काय कराल?

 रक्तसंबंधातील नातेवाइकाचा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला काढून त्यावर कुणबी नोंद आहे का ते तपासा.स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील प्रत्येकाच्या जन्ममृत्यूची नोंद त्याच्या जातीसह कोतवाल बुक किंवा गाव नमुना नं. १४ मध्ये ठेवली जात असे. पूर्वी या नोंदी दरमहा तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या. १ डिसेंबर १९६३ पासून कोतवाल पद महसूल विभागाकडे वर्ग झाल्यानंतर हे काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आले. आपल्या रक्तनातेसंबंधातील नातेवाइकाचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून त्याच्या नावाच्या गाव नमुना नं.१४ किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी. त्यात कुणबी नोंद आहे का? ते तपासा. आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी(६ ड नोंदी), जमीन वाटप नोंदी, ७/१२ उतारे, ८अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा, सातबारा अमलात येण्याआधी असणारे क. ड. ई. पत्र, सूडपत्र, खासरा पत्रक, हक्कपत्रक किंवा तत्सम इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे का? ते शोधावे आणि असेल तर ते कागदपत्र काढून घ्यावे.रक्तसंबंधातील नातेवाइक शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असल्यास सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावर संबंधित कार्यालयाने त्या नातेवाइकाची कुणबी जात नोंद केलेली असल्यास त्याचा साक्षांकित केलेला उतारा घ्यावा. रक्तसंबंधातील नातेवाइकाने अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून चालेल.

वन कार्ड क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा | apply one card credit card.

वन कार्ड क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा | apply one card credit card.

वन कार्ड काय आहे? वन कार्ड हे एक क्रेडिट कार्ड ...
हवामानतज्ञ यांच्या अंदाजानुसार या वर्षी पेरणीची गरबड करू नका(IMD)

हवामानतज्ञ यांच्या अंदाजानुसार या वर्षी पेरणीची गरबड करू नका(IMD)

भारतीय हवामान विभाग (IMD) ने शुक्रवारी जाहीर केले की हिंद ...
Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

Phone pe वरून पर्सनल लोन कसा मिळवायचा | best personal loan app.

PhonePe personal loan apply: आज प्रत्येकाला पैशांची गरज असते, आणि ...
आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

आता रेशन कार्ड काढा ऑनलाईन | Online Ration Card Maharashtra 2023

Ration card online नमस्कार मित्रांनो, यापुढे जर कोणाला रेशन कार्ड ...
पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र  | Pipe Line anudan Yojana Maharashtra 2023

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Pipe Line anudan Yojana Maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना ...
Gram Panchayat Yojana 2023 : तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या योजना सुरू आहेत, आत्ताच मोबाईलवर पहा ऑनलाईन.

Gram Panchayat Yojana 2023 : तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या योजना सुरू आहेत, आत्ताच मोबाईलवर पहा ऑनलाईन.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या गावात ग्रामपंचायत मार्फत कोणत्या योजना राबवल्या ...
2,443 कोटी अनुदान मंजूर; पहा GR : Kharip nuksan bharpai 2024

2,443 कोटी अनुदान मंजूर; पहा GR : Kharip nuksan bharpai 2024

Kharip nuksan bharpai 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील 2023 खरीप ...

Leave a Comment