महाराष्ट्रातील जमिनीची मोजणी आता 30 मिनिटांत! |सरकारचा जमीन मोजणीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब | land area calculator

महाराष्ट्राचा भूमि अभिलेख विभाग आता रोव्हर मशीनचा वापर करून राज्यभरातल्या जमिनींची मोजणी करणार आहे. या मशीनद्वारे 1 हेक्टर क्षेत्राची मोजणी केवळ 30 मिनिटांत होते, असा भूमी अभिलेख विभागाचा दावा आहे.

पण हे रोव्हर मशीन काय आहे? ते कसं काम करतं? ते सध्या अस्तित्वात असलेल्या जमीन मोजणीच्या प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धतीपेक्षा वेगळं कसं आहे? तेच आता आपण जाणून घेणार आहोत.

मोबाईल वरून शेत जमीन मोजण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.????????

रोव्हर मशीननं जमीन मोजणी land area calculator करण्याच्या पद्धतीविषयी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं भूमी अभिलेख विभागाचे (पुणे) उपसंचालक किशोर तवरेज यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.

प्रश्न – रोव्हर मशीन म्हणजे नेमकं काय?

किशोर तवरेज – आता आपण महाराष्ट्रात 77 ठिकाणी CORS (continuously operational reference station) स्थापन केलेले आहेत. यांचा संपर्क थेट उपग्रहाशी आहे. आणि रोव्हर हा एक मूव्हिंग ऑब्जेट आहे, जो आपण शेतात घेऊन जाऊ शकतो.

याचंसुद्धा कनेक्शन सॅटेलाईटशी आहे. त्यामुळे कुठेसुद्धा गेलात, तर ते रोव्हर स्टेशन एखाद्या स्थानाची जास्तीत जास्त अचूकता दर्शवतं. हे रोव्हर घेऊन तुम्ही शेतात मोजणीसाठी जाऊ शकता, असं ते साधन आहे.

किशोर तवरेज
फोटो कॅप्शन,किशोर तवरेज

प्रश्न- रोव्हर मशीनच्या साहाय्यानं जमीन मोजणी कशी केली जाते?

किशोर तवरेज – पूर्वी प्लेन टेबल किंवा ईटीएस मशीनच्या साहाय्यानं जमीन मोजणी केली जायची. शेतकरी वहिवाटीच्या खुणा जसजशा दाखवेल, तर त्याच्यासोबत चालत चालतच रोव्हर त्याठिकाणचं रीडिंग एका मिनिटात घेतो.

तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. ????????

जोपर्यंत आपलं क्षेत्र फिरून होतं, तोपर्यंत क्षेत्राची रोव्हरद्वारे मोजणी पूर्ण होते. ईटीएस मशीननं अर्धा दिवस लागायचा, आता रोव्हरद्वारे एक हेक्टर क्षेत्रावरची मोजणी अर्ध्या तासात होते.

प्रश्न- जमीन मोजणीची रोव्हर मशीन पद्धत ही प्लेन टेबल आणि ईटीएस मशीन पद्धतीपेक्षा वेगळी कशी?

किशोर तवरेज- टेबल प्रक्रिया करताना आपल्याला प्रत्येक दोनशे मीटरवर टेबल लावावा लागायचा. उंच झाडांचं निरीक्षण घेता यायचं नाही. झाडाच्या फांद्या तोडाव्या लागायच्या. उंच गवत असेल, तर मोजणी होऊ शकत नव्हती. ईटीएस मशीन साडेचार फुटावर लावत असल्यामुळे यापेक्षा जास्त उंचीची झाडं असली की अडथळा यायचा.

पण ,रोव्हर्समध्ये रीडिंग सॅटेलाईटकडून येत असल्यामुळे परिसर ओपन टू स्काय असेल तर तुम्ही ऑब्झर्वेशन घेऊ शकता. ही मोजणी तत्काळ होते. यातली अॅक्यूरसी मशीनमधून पाहून आम्ही खात्री करू शकतो. आपल्याला अगदी 5 सेंटीमीटरच्या अचूकतेची मोजणी करता येते.

प्लेन टेबल पद्धतीनं जमीन मोजणी
फोटो कॅप्शन,प्लेन टेबल पद्धतीनं जमीन मोजणी

प्रश्न – प्लेन टेबल आणि ईटीएस पद्धतीनं जमीन मोजणीसाठी किती वेळ लागायचा?

उत्तर – प्लेन टेबलनं मोजणी करण्यासाठी एक दिवस लागायचा. कारण टेबल प्रत्येक ठिकाणी उचलून नव्यावं लावावा लागायचा. ईटीएस मशीनसाठीसुद्धा झाडं किंवा उंचसखल भागाचा अडथळा यायचा. यासाठी अर्धा दिवस लागायचा. रोव्हरद्वारे मात्र अगदी कमी वेळात जमीन मोजणी होते. एक किलोमीटरचं क्षेत्र केवळ 2 तासांत मोजून होऊ शकतं.

प्रश्न – रोव्हर मशीननं जमीन मोजणीची पद्धत किती अचूक आहे?

किशोर तवरेज – सोलापूरमध्ये 400, पुण्यात 400, सातारा 250 प्रकरणं आणि नांदेडमध्ये काही प्रकरणं अशाप्रकारे राज्यात रोव्हर वापरून हजारपेक्षा जास्त प्रकरणांची मोजणी झालेली आहे. आणि याची अचूकता (accuracy) 5 सेंटीमीटरच्या आतमध्ये आहे.

सर्वसाधारपणे भूमी अभिलेखाची मोजणीची land area calculator जी परमिसेबल लिमिट असते ती ग्रामीण भागासाठी 25 सेंटीमीटर आणि शहरी भागात साडेबारा सेंटीमीटर असते. त्याच्या आतमधली अचूकता मिळत असल्यामुळे रोव्हरमुळे मोजणी कामाला खूप सुविधा झालेली आहे.

रोव्हर मशीनद्वारे जमीन मोजणीची प्रात्यक्षिके

इतर काही योजना:????????

ट्रॅक्टर अनुदान योजना

कडबा कुट्टी अनुदान योजना

कुसुम सोलर योजना

नमो शेतकरी महा सन्मान योजना

प्रश्न- रोव्हर मशीन पद्धतीचे फायदे काय?

किशोर तवरेरोव्हर वापरून आता जी मोजणी केली जाणार आहे, त्याचे अक्षांश रेखांश आपल्याला मिळणार आहेत. ते कायमस्वरुपी जतन केले जाणार आहेत. भूकंप झाला, पूर आला, दगड खूना वाहून गेल्या, तरी आमच्याकडे अक्षांश रेखांश असल्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या हद्दी या साहाय्यानं दाखवू शकू.

अतिक्रमण करताना लोक बांध कोरतात. त्यामुळे जमीन समोरच्याचीच असल्याचा भास होतो. पण अक्षांश रेखांशामुळे बांध कोरणारे उघडे पडतील. आणि या पद्धतीनं मोजणी करून घेतली तर समोरच्यानं किती बांध कोरला हे स्पष्ट होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल.

प्रश्न- भविष्यात रोव्हरद्वारे जमीन मोजणी करण्यासाठी विभाग काय प्रयत्न करणार?

किशोर तवरेज- पुढच्या 2 वर्षांत प्रत्येक सर्व्हेअरकडे रोव्हर मशीन देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर राज्यातील कोणतीही मोजणी रोव्हरच्या साहाय्यानं करता येईल. किंवा ईटीस मशीनचं रोव्हरमध्ये रुपांतर करून ती करता येईल.

तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर रस्ता कसा मिळवावा याबाबत माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. ????????

‘आतापर्यंत 780 जणांना ट्रेनिंग’

औरंगाबाद येथील ‘भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी’ ही महाराष्ट्र सरकारच्या भूमी अखिलेख विभागाची एकमेव राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था आहे.

रोव्हर्सद्वारे मोजणीच्या प्रशिक्षणाविषयी विचारल्यावर येथील प्राचार्य लालसिंग मिसाळ यांनी सांगितलं, “रोव्हर्सच्या बाबतीत आतापर्यंत 12 बॅचेसला ट्रेनिंग दिलेलं आहे. मार्च 2021 पासून आतापर्यंत 780 जणांना ट्रेनिंग दिलेलं आहे.”

लालसिंग मिसाळ

“रोव्हरद्वारे होणारी जमिनीची मोजणी ही तंतोतंत आहे. अचूक आहे. समजा कुणी अतिक्रमण केलं असेल तर सरकारी यंत्रणेकडे अर्ज करून त्याचं निराकरण करावं. आपआपसात तंटे अथवा भांडण करू नये,” असं आवाहन मिसाळ पुढे करतात.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2000 रुपये, अपात्र शेतकऱ्यांची यादी पहा.

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2000 रुपये, अपात्र शेतकऱ्यांची यादी पहा.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार ...
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत पॅक हाउस सबसिडी /pack house subsidy in National horticulture mission.

परिचय:कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, लाखो लोकांना उपजीविका प्रदान ...
Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

Instant personal loan mobile application |KreditBee या ॲप द्वारे 10 मिनिटात पर्सनल लोन मिळवा.

सध्याच्या काळात पैसा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पैसा नसेल तर ...
हे आहेत सर्वात चांगले 5 पर्सनल लोन ॲप्स | best 5 personal loan apps.

हे आहेत सर्वात चांगले 5 पर्सनल लोन ॲप्स | best 5 personal loan apps.

नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय ...
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | phalbag lagwad yojna 2023

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | phalbag lagwad yojna 2023

महाराष्ट्र सरकारने 2018-19 च्या खरीप हंगामापासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड ...
लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड कसे काढायचे, पहा संपूर्ण माहिती | blue aadhar card in Marathi

लहान मुलांसाठी निळे आधार कार्ड कसे काढायचे, पहा संपूर्ण माहिती | blue aadhar card in Marathi

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आहे ...
पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी | poultry loan bank list.

पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी | poultry loan bank list.

शेतीसह पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. पण अनेकांकडे पैसा ...
स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न लागवड संपूर्ण माहिती

स्वीट कॉर्न हे तृणधान्य पीक आहे जे प्रामुख्याने आहारामध्ये वापरले ...
१८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

१८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

जुने अभिलेख कसे पाहायचे? जुने अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ...
जीबी व्हाट्सअप कसे डाऊनलोड करावे | download GB WhatsApp

जीबी व्हाट्सअप कसे डाऊनलोड करावे | download GB WhatsApp

जीबी व्हाट्सअप हे एक लोकप्रिय पर्यायी व्हाट्सअप ॲप आहे जे ...

Leave a Comment