एलपीजी सिलेंडर चे दर 200 रुपयांनी कमी | या ग्राहकांना 400 रुपयांचा नफा होणार | LPG gas price cut by rs 200.

LPG Gas Price Cut:

महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनता खास करून गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आहे. उद्या ३० ऑगस्टपासून घरगुती गॅसच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात करण्याची सरकारने घोषणा केली आहे. तर उज्ज्वल योजनेच्या लाभार्थ्यांना दुप्पट फायदा मिळणार आहे.

या ग्राहकांना ४०० रुपये अनुदान मिळणार.????????

केंद्र सरकार : रक्षाबंधनाच्या एक दिवसपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे. यासोबतच ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल.

केंद्राची घोषणा
३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत ११०३ रुपये, कोलकाता ११२९ रुपये, मुंबईत ११०२ आणि चेन्नईत १११८.५० रुपये आहेत.

उज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.????????????

घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर


राजधानी दिल्लीत सध्या अनुदानाशिवाय घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ४०० रुपये मिळतील. म्हणजेच त्यांना सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सामान्य ग्राहकांसाठी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत ९०३ रुपये असेल. कमी झालेली किंमत आज रात्रीपासून लागू होणार आहे. गेल्या तीन वर्षांत देशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दुपटीने वाढल्या असताना अनेक दिवसांपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दिलासा मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. घरगुती सिलेंडरची किंमत सध्या मुंबईत ११०२.५० रुपये असून वरील घोषणेननंतर आता मुंबईकरांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी एक हजार रुपयेहून कमी किंमत मोजावी लागेल.

प्रधानमंत्री उज्वला योजनेची‌ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????????

पेट्रोल-डिझेलच्या दरातही दिलासा?
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चांगली कमाई केली असून करोनाच्या वेळी झालेले नुकसान आता भरून निघाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार वाहन इंधनाच्या दरातही मोठी कपात करू शकते.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या 18 प्रकारचे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना तीन लाख रुपयांची मदत | pm vishwakarma yojana

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत या 18 प्रकारचे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना तीन लाख रुपयांची मदत | pm vishwakarma yojana

विश्वकर्मा योजना ही भारतातील पारंपारिक कारागीर आणि हस्तकलाकारांना मदत करण्यासाठी ...
पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता येथे पहा.

पी एम किसान योजनेचा 15 वा हप्ता येथे पहा.

बऱ्याच शेतकऱ्यांना अजून त्यांच्या खात्यामध्ये किती हप्ते जमा झाले याची ...
WhatsApp pay : आता गुगल पे फोन पे वापरण्याची गरज नाही, व्हाट्सअप वरूनच करा कोणालाही upi पेमेंट.

WhatsApp pay : आता गुगल पे फोन पे वापरण्याची गरज नाही, व्हाट्सअप वरूनच करा कोणालाही upi पेमेंट.

जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर पेमेंट सेंड आणि रिसिव्ह करायचे असेल, तर ...
Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

Pm Kisan Yojana Rejected Farrmers list :- पी एम किसान योजनेतून हे शेतकरी अपात्र झाले, यादी पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ...
रोटावेटर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

रोटावेटर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत

रोटावेटर अनुदान योजना महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी ...
पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र  | Pipe Line anudan Yojana Maharashtra 2023

पाईपलाईन अनुदान योजना महाराष्ट्र | Pipe Line anudan Yojana Maharashtra 2023

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना ...

Leave a Comment