गाडीसाठी फॅन्सी नंबर कसा घ्यायचा | व्हीआयपी नंबर च्या किमती किती | how to get fancy number for vehicle.

आजकाल आपण फॅशनच्या दुनियेत वावरताना दिसत आहोत मग ही फॅशन कोणतीही असो जसे की कपडे, मोबाईल असे अनेक प्रकारचे फॅशन समाजात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अशाच प्रकारचे फॅशन ही व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी सुद्धा दिसून येते. प्रत्येकाला आपल्या बाईकला किंवा कारला फॅशनेबल किंवा व्हीआयपी दिसण्यासाठी अनेक प्रकारे त्यामध्ये मॉडीफाय केले जाते त्याचाच एक प्रकार म्हणून बाईक किंवा कारचा नंबर ही यामध्ये मागे राहिला नाही. आपण अनेकदा दुसऱ्याच्या गाडीचा नंबर पाहून आपणालाही असे वाटते की आपल्याही गाडीला असा एखादा व्हीआयपी फॅन्सी नंबर असावा त्यासाठीच आपण आज पाहणार आहोत की हा व्हीआयपी नंबर साठी कशाप्रकारे डिमांड करू शकतो.

चला तर मग फॅन्सी नंबर आपल्या बाईक किंवा कारला कसा मिळवायचा याविषयी सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून या माहितीच्या आधारे तुम्हाला नंबर मिळवणे सोपे जाईल.

व्हीआयपी नंबर म्हणजे काय?

व्हीआयपी नंबर म्हणजे असे नंबर की जे क्रमांक आहेत जे सामान्यतः सहजासहजी कोणालाही मिळत नाहीत म्हणजेच,जे लिलावातून दिले जातात आणि ते नंबर म्हणजे एकदम खास क्रमांक मानले जातात. उदाहरणार्थ सुपर एलियट नंबर (0001) अशा नंबरचा यामध्ये समावेश होतो.

तुमच्या गाडीच्या नंबर वर किती ट्रॅफिक चालन आहे चेक करा. ????

व्हीआयपी नंबर मिळवण्याची पद्धत

व्हीआयपी नंबर आपण दोन प्रकारे मिळवू शकतो.

1 लिलावाद्वारे

  • ऑनलाइन लिलाव: अनेक राज्यांमध्ये वाहतूक विभागामार्फत व्हीआयपी नंबर साठी ऑनलाईन लिलाव आयोजित केले जातात. त्या लिलावामध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला संबंधित विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करून तुम्ही लिलावात भाग घेऊ शकता.
  • ऑफलाइन लिलाव: काही राज्यांमध्ये व्हीआयपी नंबर साठी संबंधित विभागामार्फत ऑफलाइन लिलाव देखील आयोजित केले जातात. तुम्हाला जर त्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर लिलावाची तारीख आणि वेळ संबंधित विभागाकडून मिळू शकते,त्यानुसार तुम्ही त्या लिलाव मध्ये भाग घेऊ शकता.

2 थेट खरेदीद्वारे

  • डीलर कडून: बाईक किंवा कार डीलर मार्फत म्हणजेच जेथे आपण कार किंवा बाईक ची खरेदी करतो तेथील डीलरशी तुम्ही संपर्क साधून तुमच्या पसंती चा व्हीआयपी नंबर उपलब्ध आहे का ते विचारून तो मिळू शकतो का याची चौकशी केली जाऊ शकते त्याद्वारे ही तुम्हाला तुमच्या पसंतीचा नंबर मिळवता येतो.
  • खाजगी विक्रेत्याकडून: तुम्हाला जर व्हीआयपी नंबर पाहिजे असेल तर तुम्ही खाजगी विक्रेताद्वारे हा नंबर खरेदी करू शकता.

व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पत्ता पुरावा
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • लिलाव शुल्क (लिलावात प्रत्यक्ष भाग घेत असल्यास)

वरील कागदपत्रे ही व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.⤵️

व्हीआयपी नंबर साठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

जर तुम्ही घरातून व्हीआयपी नंबर साठी ऑनलाईन अर्ज करणार असाल तर तुम्हाला रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागते त्याद्वारे तुम्ही व्हीआयपी नंबर साठी अर्ज करू शकता.

मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला पब्लिक युजर म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागते.यानंतर निश्चित शुल्क भरून आपल्या पसंतीचा नंबर रिझर्वेशन करावा लागतो. व्हीआयपी नंबर साठी आपल्याला जो नंबर हवा आहे त्या नंबरच्या रेंज नुसार आपल्याकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाते.

आता आपण स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा हे पाहूया.

वाहतूक मंत्रालय वेबसाईट ????

  • सर्वप्रथम रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट द्या.☝️
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही नेव्हिगेशन मेनू वर क्लिक करा,त्यात तुम्हाला वाहनविषयक सर्व पर्याय दिसतील.
  • नागरी सेवा या पर्यायावर क्लिक करून, नवीन पर्याय उघडतील.
  • नंतर नोंदणी या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर व्हीआयपी नंबर नोंदणी या पर्यावर क्लिक करा.
  • व्हीआयपी नंबर नोंदणी या परिवारात क्लिक करून जे नवीन पेज ओपन होईल त्यावर पब्लिक युजर म्हणून तुमचे स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
  • रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जो आवडीचा नंबर आहे त्या नंबरची निवड करा.
  • त्यानंतर जो तुम्ही नंबर निवडला आहे त्या नंबरच्या रेंज नुसार शुल्क भरायचे आहे.
  • सदरचे शुल्क भरल्यानंतर नंबरच्या लिलावात तुम्हाला सहभागी व्हावे लागेल.
  • तुम्ही ज्या नंबरची निवड केली आहे तो नंबर तुम्हाला लिलावात जिंकावाच लागेल.
  • सर्व प्रक्रियेतून तुम्हाला तुमचा व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी जावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तो नंबर मिळेल.

व्हीआयपी रजिस्ट्रेशन नंबर साठीच्याअटी व शर्ती

  • 5 फेब्रुवारी 2002 पासून महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 च्या नियम आर ५४ अंतर्गत, कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच नव्या व्हीआयपी नंबर साठीचे अर्ज स्वीकारले जातात.
  • बिगर परिवहन मालिकेतील संबंधित लिपिक मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालयात कोऱ्या कागदावरील सर्व अर्ज स्वीकारण्यासाठी कटीबद्ध असेल.
  • तुमचा व्हीआयपी नंबर मंजूर झाल्यास त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी रोख शुल्क भरणे अनिवार्य आहे. तसेच रोख शुल्क भरणा करण्याची वेळ ही सकाळी १० ते दुपारी २:३०वाजेपर्यंत आहे.
  • जर एकाच नंबर साठी मागणी एकापेक्षा जास्त अर्जदाराने केल्यास तो नंबर लिलावाद्वारे दिला जाईल.
  • लिलाव आधारे प्राप्त झालेल्या नंबरचे आरक्षण कायम राहील,पण ते केवळ 30 दिवसांसाठीच असेल.

व्हीआयपी नंबर साठीचा ई लिलावाचा निकाल तपासण्याची पद्धत

  • सर्वप्रथम ई लिलाव निकाल तपासण्यासाठी फॅन्सी परिवहन वेबसाईटला भेट द्यावी लागेल.☝️
  • वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेज उघडेल,त्यावर लिलाव निकाल लिंक चा पर्याय निवडा.
  • लिलाव निकाल लिंक चा पर्याय उघडल्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
  • त्यानंतर जे काही विचारलेले तपशील असतील ते काळजीपूर्वक भरून घ्या. (जसे की राज्य,आरटीओ आणि निकालाची तारीख)
  • वरील सूचनेनुसार तुम्ही लिलावाचा निकाल हा स्क्रीनवर पाहू शकता.
  • वरील लिलाव निकाल तपासल्यानंतर जर तुम्ही नंबर साठी पात्र झालात,तर नंबर वाटप पत्र डाउनलोड करून घ्या.

अशा असतात व्हीआयपी नंबरच्या रेंज

रस्ते व वाहतूक मंत्रालयातील परिवहन विभाग ०००१ ते ९९९९ या दरम्यानच्या अनेक नंबरला व्हीआयपी नंबर किंवा फॅन्सी नंबर म्हणून उपलब्ध करून देते. या नंबरच्या तीन कॅटेगरी असतात.

  • सुपर एलिट
  • सिंगल डिजिट
  • सेमी फॅन्सी नंबर

या तीन वेगवेगळ्या कॅटेगिरी मधील नंबरची किमान किंमत किंवा बेस्ट प्राईस ही वेगवेगळ्या असते. लिलावानंतर नंबर ची किंमत(सदरची किंमत ही त्यावेळी लावलेल्या बोलीवर अवलंबून राहते)ही बदलत असते.

उदाहरणार्थ जर पाहायचे झाले तर सुपर एलिट नंबर (०००१) हा पाच लाख रुपये पर्यंत लिलावात बुक केला जाऊ शकतो. सदरच्या नंबरची किंमत मात्र वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही बदलत असते.

व्हीआयपी नंबर नोंदणी क्रमांकाची यादी आणि त्यांचे शुल्क पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सदरच्या माहितीवरून तुम्ही तुमच्या बाईक साठी किंवा कारसाठी व्हीआयपी नंबर घेऊ शकता.

भेंडी लागवडीचे नियोजन | भेंडी लागवड माहिती

भेंडी लागवडीचे नियोजन | भेंडी लागवड माहिती

भेंडी हे संपूर्ण भारतात घेतले जाणारे लोकप्रिय भाजीपाला पीक आहे ...
WhatsApp pay : आता गुगल पे फोन पे वापरण्याची गरज नाही, व्हाट्सअप वरूनच करा कोणालाही upi पेमेंट.

WhatsApp pay : आता गुगल पे फोन पे वापरण्याची गरज नाही, व्हाट्सअप वरूनच करा कोणालाही upi पेमेंट.

जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर पेमेंट सेंड आणि रिसिव्ह करायचे असेल, तर ...
स्वतःचा दूध व्यवसायासाठी नाबार्डद्वारे दुग्ध व्यवसायाची अनुदान योजना. | Nabard dairy scheme.

स्वतःचा दूध व्यवसायासाठी नाबार्डद्वारे दुग्ध व्यवसायाची अनुदान योजना. | Nabard dairy scheme.

दूध व्यवसाय अनुदानासाठी अर्ज कसा करावा ग्रामीण विकास नाबार्डच्या अधिकृत ...
मोबाईल वरून वारसांची नोंद करा ऑनलाईन | सातबार्यावर वारसाची नोंद करा

मोबाईल वरून वारसांची नोंद करा ऑनलाईन | सातबार्यावर वारसाची नोंद करा

वारसांची ऑनलाईन नोंदणी कशी करावी? तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन या ...
Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र शासनाने शेळीपालन या ...
तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन, पहा संपूर्ण माहिती. |e-mudra loan 2025 |sbi e mudra loan.

e-mudra loan तुम्हालाही मिळू शकते मुद्रा लोन पहा संपूर्ण माहिती ...
प्रधानमंत्री मुद्रा योजना | PM mudra yojna | PMMY

प्रधानमंत्री मुद्रा योजना | PM mudra yojna | PMMY

प्रधानमंत्री मुद्रा योजना: भारतातील लघु उद्योगांना चालना देणारी योजना प्रधानमंत्री ...
डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत |diesel pump yojana apply

डिझेल पंपासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत: Diesel Pump Subsidy Online ...
ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा |  job card list 2023

ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा | job card list 2023

जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र: job card list 2023 : जॉब ...
असा भरा ऑनलाइन (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना)CMEGP अर्ज

असा भरा ऑनलाइन (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना)CMEGP अर्ज

ऑनलाइन CMEGP अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेआधार कार्ड क्रमांक : अर्जदाराचा ...

Leave a Comment