ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) शेती लागवड अनुदान योजना

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना

योजनेचे नाव : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत फळबाग लागवड

#ड्रैगन फ्रुट लागवड

ड्रैगन फ्रुट (Dragon Fruit) हे एक निवडुंग जातीचे फळ आहे यातील पोषकतत्व व अँटीऑक्सीडंट मुळे या फळास सुपरफ्रुट म्हणुन देखील ओळखले जाते. या फळात विविध औषधी गुण तसेच फॉस्फरस व कैल्शीयम यासारखे मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. कमी पाण्यात अथवा पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे टिकून राहतात. या पिकामध्ये किड रोगाचा प्रादुर्भाव खूपच कमी असुन पिक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत या फळबागाची लागवड करण्यास 2021-22 पासून प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे.

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.????

अर्ज कसा व कुठे करावा :-

 महाडीबीटी वर ऑनलाईन अर्ज करावा.

लाभार्थी पात्रता : –

अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान 0.20 आर (अर्धा एकर) जमीन असणे आवश्यक आहे.

योजनेचे अनुदान कोणत्या बाबींसाठी मिळते ? 

  • आधाराकरीता कॉक्रीट खांब उभारणे. 
  • खांब उभारण्यासाठी खड्डे खोदणे.
  • खांबावर प्लेट लावणे. 
  • रोपे लागवड करणे. 
  • ठिबक सिंचन लाईनसाठी. 
  • खत व्यवस्थापन व पिकसंरक्षण. 

योजने अंतर्गत एका लाभार्थीस किती क्षेत्रापर्यंत अर्ज करता येतो ?

एक लाभार्थी किमान ०.२० हेक्टर आणि जास्तीत जास्त ४ हेक्टर पर्यंत लागवड करू शकतो आणि अनुदानाचा लाभ घेऊ शकतो. 

ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.????

किती अनुदान मिळणार?

राज्य सरकारकडून एक हेक्टरवर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी ४ लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम म्हणजे १ लाख ६० हजार रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं ड्रॅगन फ्रुट लागवड योजनेसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणीला सुरुवात झाली असून काही ठिकाणी याबाबत सोडत देखील झाल्याचं ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.

अनुदान किती व कधी मिळते: 

प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के कमाल रु.1.60 लाख इतके अनुदान प्रती हेक्टर मिळते.

आणि हे अनुदान मंडळ कृषी अधिकारी यांनी मोका तपासणी केल्यानंतर तीन टप्प्यात मिळते.

पहिल्या वर्षी 60 टक्के, दुसरे वर्षी 20 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के असे अनुदान मिळते.

अनुदान मिळण्यासाठी दुसऱ्या वर्षी किमान 75 टक्के आणि तिसऱ्या वर्षी पर्यंत  90 टक्के झाडे जिवंत ठेवणे आवश्यक आहे.

अनुदान कसे बाबींसाठी मिळते :

  • खड्डे खोदणे
  • आधाराकरीता कॉंक्रीट खांब उभारणे
  • खांबावर प्लेट लावणे
  • रोपे लागवड करणे
  • ठिबक सिंचन
  • खत व्यवस्थापन व पिकसंरक्षण

लागवड कधी करावी व किती अंतरावर करावी:

प्रथम महा DBT संकेतस्थळावर जाऊन शेतकर्याने रीतसर अर्ज करावा त्यानंतर विजेता निवड होऊन आपली निवड झाल्यानंतर कृषी सहाय्यक हे स्थळ पाहणी करतात. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांनी पुर्वसंमती दिल्यानंतर एक महिन्याच्या आत  लागवड काम सुरु करावे.

सदर लागवड ही सलग क्षेत्रावर  करणे बंधनकारक आहे. लागवडीसाठी 0.60x 0.60 x 0.60 मी आकाराचे खडड़े खोद्णे आवश्यक आहे.

लागवडीसाठी सूक्ष्म सिंचन करण बंधनकारक आहे.

लागवड ही 4.5x 3 मी. किंवा 3.5x 3 मी. किंवा 3x 3 मी.या अंतरावर करावी.

लागवड 4.5 x 3 मी.अंतरावर केल्यास हेक्टरी 2960 रोपे, 3.5x 3 मी.अंतरावर केल्यास हेक्टरी 3808 रोपे आणी 3x 3 मी अंतरावर केल्यास हेक्टरी 4000 रोपे लागतात.

लागवडीसाठी रोपे खरेदी :

  • कृषी विभाग रोपवाटीका
  • कृषी विद्यापीठ रोपवाटीका
  • आयसीएआर संस्था, कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटीका
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या रोपवाटीका
  • सामाजीक वनीकरण किंवा अन्य शासकीय विभागांच्या रोपवाटीका

वरील ठिकाणी उपलब्ध नसल्यास नोंदणी कृत मान्यता प्राप्त खाजगी रोपवाटीकेतून घ्यावीत.

आवश्यक कागदपत्रे :-

  • 7/12 उतारा
  • सामायिक 7/12 असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
  • आधार संलग्न राष्ट्रीयी कृत बँक पासबुकच्या प्रथम पानाची झेरॉक्स
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला(लागू असल्यास)
  • विहित नमुन्यातील हमी पत्र

आम्ही दिलेली माहिती आवडल्यास नक्की कॉमेंट करून कळवा आणि आपल्या जवळील शेतकरी मित्रांना नक्की पाठवा त्यांना सुद्धा या योजनेचा नक्की फायदा होईल.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl  वेळापत्रक 2024.

आयपीएल 2024: पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर! | Ipl वेळापत्रक 2024.

22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 ...
शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

शेतकऱ्यांसाठी मोफत सौरपंप : कुसुम सोलार योजना

कुसुम सोलार योजना ही भारत सरकारने सिंचनासाठी सौरऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन ...
Get chrome

Get chrome

Introduction to Google Chrome Google Chrome is one of the ...
मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मोबाईलवर मतदान कार्ड काढा |apply for voter ID card.

मतदान ओळखपत्र मतदान करण्यासाठी आणि एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून वोटर ...
मोफत पिठाची गिरणी योजना 2024 | Free Flour Mill Scheme Maharashtra

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 | Free Flour Mill Scheme Maharashtra

महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे “महिला व बालकल्याण विभागामार्फत” राज्यातील अनुसुचित जाती ...
प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत |

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली ...

Leave a Comment