शेती: दामिनी ॲप बद्दल संपूर्ण माहिती |शेतकऱ्यांचं विजेपासून संरक्षण करण्यासाठी नवीन एप्लीकेशन.

वीज, प्रातिनिधिक फोटो

वीज

भारतात वीज पडल्यामुळे दरवर्षी दोन हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळे मग वीजेपासून बचाव करण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं ‘दामिनी ॲप’ तयार केले आहे.

पण, हे दामिनी ॲप नेमकं काय आहे? ते कुठे उपलब्ध आहे आणि ते वापरायचं कसं? याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

दामिनी ॲप कसे वापरावे याबद्दल माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा. ????????????

‘वीज पडल्यामुळे दरवर्षी 2 हजार जणांचा मृत्यू’

जगभरात दरवर्षी 28 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय वीज सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो.

गेल्या वर्षी या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना इंडियन मेटरॉजिकल सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. ए. के. सहाय यांनी वीज पडण्याच्या संकटाचं गांभीर्य सांगताना म्हटलं की, “भारतात अलीकडच्या वर्षांत वीज पडून मृत्यू आणि नुकसान होण्याचं प्रमाण वाढत आहे.

“वादळ आणि वीज पडणं ही भारतातील सर्वांत मोठी धोकादायक नैसर्गिक आपत्ती आहे, ज्यामुळे दरवर्षी 2000 हून अधिक मृत्यू होतात.”

दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.????????????

दामिनी ॲप्लिकेशन काय आहे?

पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटरोलॉजी (IITM) ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी या स्वायत्त संशोधन संस्था आहे. या संस्थेनं 2020 मध्ये ‘दामिनी लाईटनिंग’ अप विकसित केलं आहे.

संस्थेनं वीज प्रवण क्षेत्र अचूकरित्या शोधण्यासाठी देशभरात 83 ठिकाणी लाईटनिंग लोकेशन नेटवर्क उभारले आहेत. या नेटवर्कचा सेंट्रल प्रोसेसर हा IITM या संस्थेत आहे. हा प्रोसेसर या नेटवर्ककडून आलेले सिग्नल रिसिव्ह करतो , त्यावर प्रक्रिया करतो आणि मग 500 मीटर पेक्षा कमी अचूकतेसह वीज पडणारं ठिकाण ओळखतो.

दामिनी अॅप
फोटो कॅप्शन,दामिनी ॲप्लिकेशन

हे ॲप संपूर्ण भारतात घडणाऱ्या विजेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहे. व्यक्तीच्या जीपीएस लोकेशेनद्वारे तो राहत असलेल्या ठिकाणापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर वीज पडणार की नाही, याची पूर्वसूचना हे अॅप देतं.

तुम्ही जर वीज पडणार अशा क्षेत्रात असात तर काय खबरदारी घ्यायची याच्यासुद्धा सूचना या अॲपमध्ये दिल्या आहेत.

दामिनी ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा. ????????????

खबरदारीच्या सूचना

या ॲपवरील Instructions या पर्यायात तुम्ही जर वीज प्रवण क्षेत्रात असाल तर काय खबरदारी घ्यायची, याच्या सूचना दिल्या आहेत.

या ॲपवरील Register या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथं नोंदणी करू शकता. नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता, पिनकोड, व्यवसाय ही माहिती भरून तुम्ही या अॅपवर नोंदणी करू शकता. त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या भागात वीज पडण्यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते.

जून-जुलैचा महिना लक्षात घेत महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनांनी दामिनी अॅप वापरण्याचं आवाहन सर्वसामान्य जनतेला केलं आहे.

यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासदंर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात वीजा चमकत असल्यास काय खबरदारी घ्यायची याच्या सूचना दिल्या आहेत.

काय करावं?

  • घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजे बंद ठेवा आणि मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिटाच्या आत घरातच थांबावं.
  • घराबाहेर असल्यास मजबूत इमारतीकडे जावं. ट्रॅक्टर, शेतीची अवजारं, मोटारसायकल यांपासून दूर राहावं. मोकळ्या आणि लटकत्या तारांपासून दूर राहावं.

काय करू नये?

  • वीज चमकत असल्यास उंच जागा, टेकडी, मोकळ्या जागा, विद्युत खांब, उघडी वाहनं आणि पाण्याची ठिकाणं टाळावीत.
  • घरात असल्यास मोबाईल आणि इतर विद्युत उपकरणं चार्जिंगला लावू नये. वीजा चमकत असल्यास विद्युत उपकरणांचा वापर करू नका. यादरम्यान अंघोळ, भांडी धुणे, कपडे धुणे ही कामे टाळा.
  • घराबाहेर असल्यास वीजा चमकत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभं राहू नका. तसंच विद्युत उपकरणांशी संपर्क टाळा.
प्रातिनिधिक फोटो

शेतकऱ्यांना आवाहन

दामिनी अॅपच्या वापरासंदर्भात कृषी विभागही स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांना आवाहन करताना दिसून येत आहे.

औरंगाबादचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, “दामिनी ॲप शेतकऱ्यांसाठी फार उपयोगी आहे. कारण वीज कुठे आणि किती वेळात पडणार याची चेतावणी हे ॲप देत असतं. वीज पडण्याच्या 15 मिनिटे आधी सुरक्षित ठिकाणी जाण्याची चेतावणी हे ॲप देतं. त्यामुळे मग शेतात काम करत असलो तर बैल-बारदाणा घेऊन आपण सुरक्षित स्थळी जाऊ शकतो.

“शेतकरी बांधव नियमितपणे शेतात काम करत असतात. त्यांच्या कामात ते व्यग्र असतात. अचानकपणे वीज पडते आणि अपघात होतात. हे टाळायचं असेल तर हे ॲप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करणं फार गरेजचं आहे. शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा, असं आवाहन मी करतो.”

पाईपलाईन अनुदान योजना| अर्ज करा.

पाईपलाईन अनुदान योजना| अर्ज करा.

पाईपलाईन योजनेसाठी अर्ज कोठे करावा. शेतकरी मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजना ...
Instant 40k loan

मिळवा 40,000 रुपये तत्काळ कर्ज, झिरो CIBIL स्कोअरवर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे?

आजच्या काळात आर्थिक गरजा वेगाने वाढत आहेत. अनेकदा आपल्याला अचानक ...
ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा |  job card list 2023

ग्रामपंचायत जॉब कार्ड लिस्ट काढा | job card list 2023

जॉब कार्ड लिस्ट महाराष्ट्र: job card list 2023 : जॉब ...
पीएम विश्वकर्मा मोफत सिलाई मशीन योजना ऑनलाइन फॉर्म: सर्व महिलांना शिलाई मशीन मिळत आहेत, त्वरीत फॉर्म भरा.

पीएम विश्वकर्मा मोफत सिलाई मशीन योजना ऑनलाइन फॉर्म: सर्व महिलांना शिलाई मशीन मिळत आहेत, त्वरीत फॉर्म भरा.

देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र ...
Maharashtra Shochalay Anudan Yojana | महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

Maharashtra Shochalay Anudan Yojana | महाराष्ट्र शौचालय अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा?

महाराष्ट्र मध्ये सरकारकडून शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये इतकी अनुदान मिळत ...
प्रातिनिधिक फोटो

पीक विमा योजनेसाठी 1 रुपयात अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात ...
PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card|प्लॅस्टिक आधार कार्ड मोबाईलवरून ऑर्डर करा.

PVC Aadhaar card युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ...
किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे |किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी | kisan credit card bank list

किसान क्रेडिट कार्ड कसे काढावे |किसान क्रेडिट कार्ड साठी बँकांची यादी | kisan credit card bank list

किसान क्रेडिट साठी अर्ज करण्याची पद्धत पाहण्यासाठी खालील बटन वर ...

Leave a Comment