तुमच्या शेतातून गेलेल्या वीजेच्या खांबाचा मोबदला मिळवण्यासाठी कोठे अर्ज करावा.

ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये टॉवर उभारायचा असतो, त्या व्यक्तीला यासंबंधी आधी माहितीपर नोटीस दिली जाईल.

त्यानंतर मग आताच्या सुधारित धोरणाप्रमाणे त्याला मोबदला दिला जाईल.

पण, काही कारणास्तव एखादी व्यक्ती नॉट रिचेबल (संपर्काबाहेर) असेल, तर ती महापारेषणच्या किंवा संबंधित वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयात मोबदल्यासंदर्भात अर्ज करू शकते.

जूना नियम काय होता.

महाराष्ट्रात महापारेषण (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी) आणि इतर खासगी पारेषण कंपन्यांकडून विद्युत वाहिन्यांचं जाळं टाकलं जातं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज नेण्यासाठी ते गरजेचं असतं. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मनोरे (टॉवर) उभारले जातात.

महाराष्ट्र सरकारनं 2017 साली एक नवीन शासन निर्णय पारित केला होता. त्यानुसार टॉवरखालची जमीन आणि विजेच्या तारेखाली येणाऱ्या जमिनीचा मोबदला देण्यासंदर्भात नवीन धोरण लागू केलं होतं. ते आजतागायत लागू होतं.

या धोरणानुसार, तुमच्या शेतात 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आला असेल, तर सुरुवातीला टॉवरनं व्यापलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ मोजलं जाईल. त्यानंतर त्या क्षेत्रफळासाठी तुमच्या भागातील रेडीरेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जात होता.

पण तुमच्या शेतात टॉवर उभारला गेला नसेल आणि फक्त लाईनच्या तारा जात असतील, तर तेव्हाही तुम्हाला मोबदला मिळू शकत होता.

यामध्ये टॉवर टू टॉवर जोडण्यासाठी वायरची जी लाईन जाते, तिला वायर कॉरिडॉर असं संबोधलं जातं. या कॉरिडॉरच्या खाली जेवढी जमीन येते, त्या जमिनीसाठी रेडीरेकनरदराच्या 15 % मोबदला दिला जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं होतं.

आता आजच्या (12 ऑक्टोबर ) सुधारित धोरणामुळे अधिकचा मोबदला शेतकरी आणि जमीन मालकांना मिळणार आहे.

कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

कलिंगड लागवड संपूर्ण माहिती| टरबूज लागवड संपूर्ण माहिती.

शेतकरी बांधवांनो! आज महाराष्ट्रात घेतले जाणारे कलिंगड पीक जाणून घेऊया ...
युट्युब वर व्हिडिओ टाकून पैसे कमवा | earn money from YouTube.

युट्युब वर व्हिडिओ टाकून पैसे कमवा | earn money from YouTube.

आज काल आपण पाहतो की समाजामध्ये नोकरीचे प्रमाण हे खूप ...
2,443 कोटी अनुदान मंजूर; पहा GR : Kharip nuksan bharpai 2024

2,443 कोटी अनुदान मंजूर; पहा GR : Kharip nuksan bharpai 2024

Kharip nuksan bharpai 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील 2023 खरीप ...
हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

हवामान अंदाज ॲप डाऊनलोड करा|weather application download

भारतामधील हवामान अंदाज पाहण्यासाठी टॉप 6 ॲप्स डाऊनलोड करा. 1.हवामान ...
महाराष्ट्र राज्य जनावर खरेदी विक्री महासंघ यांचे जिल्ह्यानुसार व्हाट्सअप ग्रुप |district wise whatsapp groups

महाराष्ट्र राज्य जनावर खरेदी विक्री महासंघ यांचे जिल्ह्यानुसार व्हाट्सअप ग्रुप |district wise whatsapp groups

नमस्कार मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे व्हाट्सअप ग्रुप तयार ...
शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना|gopinath munde accidental insurance.

शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना|gopinath munde accidental insurance.

महाराष्ट्रात डिसेंबर 2019 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ...
आयुष्मान भारत कार्ड असे डाऊनलोड करा

आयुष्मान भारत कार्ड असे डाऊनलोड करा

खाजगी रुग्णालय असो की सरकारी, आयुष्मान कार्डच्या मदतीने आपण ५ ...

Leave a Comment