मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी? व्यवस्थापन आणि माहिती

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला हाच प्रश्न पडत असतो, की मिरची लागवड ही कोणत्या हंगामामध्ये व कोणत्या महिन्यात करायला हवी. कारण प्रत्येक हंगामामध्ये दर वेगळा असतो व मिरचीवर येणारे रोग देखील वेगळे असतात. तसेच काही हंगामामध्ये किडी त्रास देतात तर काही हंगामामध्ये किडी त्रास देत नाहीत. त्यामुळे कमी खर्च व चांगले व्यवस्थापन करून जास्त उत्पादन घेण्यासाठी, मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी? याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मिरची या पिकासाठी 16 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान हे योग्य ठरते.

बाजारपेठेमध्ये मिरचीचे महत्त्व:

मिरची या पिकाला संपूर्ण वर्षभर म्हणजेच बाराही महिने मागणी असते. कारण मिरच्या पिकाची गरज सर्वांनाच असते म्हणजेच हॉटेल वरती मिरची लागते घरगुती कारणांसाठी मिरचीची आवश्यकता असते व दररोज मिरची ही लागत असते. त्यामुळे या पिकाला रोज मागणी असते. पण मिरचीचे दर हे बाजारात उपलब्ध असलेल्या आवक नुसार ठरत असतात. जर बाजारामध्ये मिरचीची आवक ही जास्त प्रमाणात झालेली असेल तर मिरचीचे दर तुलनेने कमी येतात, व बाजारामध्ये मिरचीची आवक ही कमी प्रमाणात असली तर उपलब्धता कमी असल्यामुळे मिरचीचे दर हे वाढतात. उन्हाळी दिवसांमध्ये व पावसाळ्याच्या सुरुवातीस मिरचीचे दर हे वाढलेले असतात. मिरचीची लागवड मुख्यत्वे तीन हंगामांमध्ये केली जाते जसे की पावसाळी मिरची लागवड म्हणजेच खरीप मिरची लागवड, हिवाळी मिरची लागवड म्हणजेच रब्बी मिरची लागवड व उन्हाळी मिरची लागवड.

उन्हाळी मिरची लागवड:

उन्हाळी मिरची लागवड ही फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये केली जाते, पण काही प्रमाणामध्ये ही लागवड एप्रिल ते मे महिन्यांमध्ये देखील केली जाते. मिरची लागवडीचे काही हंगामांमध्ये फायदे असतात त्याचप्रमाणे तोटे देखील असतात त्यामुळे मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये मिरची लागवड केल्यामुळे तोटे ही पुढील प्रमाणे होतात: उन्हाळ्यामध्ये उन्हाचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे तापमानात वाढ होऊन नवीन लावलेली रोपे असतात ती रोपे जास्त तापमानामुळे मरून जातात. उन्हाळ्यामध्ये मिरची लागवड करणे व प्लॉट सक्सेस करणे हे खूपच अवघड जाते. उन्हाळी हंगामात मिरची लागवड केलेल्या प्लॉटमध्ये फुलांच्या अवस्थेमध्ये मिरचीचे फुल हे जास्त तापमानामुळे गळून पडते व उन्हाळ्यामध्ये मिरचीला पाण्याचा ताण देखील जास्त देता येत नाही. तसेच रस शोषक किडींचा प्रादुर्भाव देखील या काळामध्ये जास्त होत असतो जसे की थ्रिप्स, पांढरी माशी, लाल कोळी, तुडतुडे याप्रमाणे.

उन्हाळी हंगामात मिरची लागवड केल्यामुळे ज्याप्रमाणे तोटे आहेत त्याप्रमाणेच फायदे देखील आहेत. जसे की उन्हाळी हंगामात मिरची लागवड केलेली प्लॉट्स ना तुलनेने इतर हंगामात केलेल्या प्लॉट पेक्षा दर जास्त लागतो. तसेच रोग देखील कमी येतात म्हणजेच करपा भुरी रूट रोड या प्रकारचे रोग हे कमी असतात, पण किडींचा प्रादुर्भाव हा असतोच.

पावसाळी मिरची लागवड:

पावसाळी मिरची लागवडीचा हंगाम हा पावसाळ्याच्या सुरुवातीस म्हणजेच जून व जुलै महिन्यांमध्ये असतो. मिरचीची जास्तीत जास्त लागवड याच काळामध्ये होत असते जवळजवळ 50% पर्यंत लागवड ही याच हंगामामध्ये होते. या काळामध्ये म्हणजेच खरीप हंगामामध्ये मिरचीसाठी वातावरण हे खूपच पोषक प्रमाणात असते. या काळात लावलेल्या रोपांची मर ही होत नाही व झाडे देखील खूपच चांगल्या प्रकारे सुधारतात, पण या काळामध्ये मिरचीवर रोग येण्याचे प्रमाण हे अधिक असते. जसे की मूळ कुजवा, करपा बॅक्टेरियल करपा व भुरी हे रोग या काळामध्ये मिरचीला खूपच त्रास देतात. या रोगांचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन केल्यास पावसाळी मिरची लागवड ही परवडणारी ठरते.

खरीप हंगामामध्ये जरी मिरचीची लागवड ही जास्त प्रमाणात असली, तरी या काळामध्ये मिरचीला दर हा चांगल्या प्रमाणात असतो. कारण प्रत्येक शेतकऱ्याने व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने केलेली नसते, बऱ्याच प्लॉट वरती रोग येऊन प्लॉट खराब झालेले असतात.

हिवाळी मिरची लागवड:

हिवाळी मिरची लागवड म्हणजेच रब्बी हंगामातील मिरची लागवड. या हंगामा मधील मिरची ही ऑक्टोबर मध्ये लागवड केली जाते. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये देखील आपण याची लागवड करू शकतो पण जास्त थंडीमुळे रोपांची जडणघडण या काळात चांगली होत नाही. त्यामुळे ऑक्टोबर मध्ये लागवड केलेली या काळामध्ये योग्य ठरते. ऑक्टोबर मध्ये लागवड केलेल्या प्लॉटचा दर हा थोड्या प्रमाणात कमी असू शकतो. पण मिरचीचे उत्पादन या काळामध्ये खूपच चांगल्या प्रमाणात येत असते. म्हणून जरी दर हा काही प्रमाणात कमी असला तरी आपल्याला उत्पादन चांगले निघाल्यामुळे चांगला फायदा होऊन जातो.

हिवाळी हंगामामध्ये लागवड केलेल्या प्लॉट्सना मुळी वकील रोग व्यवस्थापन करणे गरजेचे असते. कारण जास्त थंडीमुळे मुळी ही व्यवस्थितपणे वाढत नाही व थंडीच्या काळामध्ये रस शोषक किडींचा प्रादुर्भाव हा खूपच वाढत असतो. या काळामध्ये मुख्यत्वे थ्रिप्स तसेच पांढरी माशी, लाल कोळी व भुरी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. या रोगांचे आपण नियंत्रण केल्यास आपल्याला चांगले उत्पादन घेण्यास मदत होईल.

सर्व विचार केला असता कमी खर्च करून व्यवस्थितपणे व्यवस्थापन केल्यास मिरची लागवड ही कधीही परवडू शकते. आपापल्या विभागामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान मिरचीसाठी पोषक आहे याचा विचार करून आपण व्हरायटी व हंगाम निवडावा. हिवाळी हंगामामध्ये व कोरड्या वातावरणामध्ये जी मिरची येथे ही मिरची वाळवून विकण्यास देखील चालू शकते. धन्यवाद..

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ???????????? अर्ज ...
हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड हॉटस्टार ॲप तुम्ही तुमच्या टीव्हीवर किंवा मोबाइल ...
व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा? |Check cibil score on whatsapp

व्हाट्सअप वर सिबिल स्कोर कसा पाहायचा? |Check cibil score on whatsapp

Cibil Score Check on Whatsapp : आपल्यापैकी अनेकांना कर्जाची आवश्यकता ...
गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

गुगल पे वर पर्सनल लोन साठी अर्ज करा | apply for personal loan on Google pay

Google Pay वर पर्सनल लोन साठी पुढील स्टेपनुसार तुम्ही अर्ज ...
Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 | शेळी पालन योजना अनुदान २०२३ | ७५% अनुदान मिळणार

Sheli Palan Anudan Yojana Maharashtra 2023 महाराष्ट्र शासनाने शेळीपालन या ...
भूमी अभिलेख नवीन नियम | दोन-तीन गुंठे जमीन अशा प्रकारे खरेदी विक्री करता येणार | land record Maharashtra

भूमी अभिलेख नवीन नियम | दोन-तीन गुंठे जमीन अशा प्रकारे खरेदी विक्री करता येणार | land record Maharashtra

गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या ...

Leave a Comment