आता शेतकऱ्यांना मिळेल फक्त १ रुपयांमध्ये पिक विमा|पीक विमा योजनेस मान्यता

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो यापुढे शेतकऱ्यांना (1 rupayat pik vima) फक्त एक रुपये भरून कोणत्याही प्रधानमंत्री पिक विमा योजनेत भाग घेता येणार. पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये लागतात त्या कारणाने शेतकरी पिक विमा भरत नाहीत, पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त 2% टक्के रक्कम भरावी लागते तरीही शेतकरी ती रक्कम भरू शकत नाहीत या कारणाने शेतकरी मित्रांनो आता शिंदे आणि फडणवीस सरकारने योजना आणली आहे “1 रूपयात पिक विमा योजना”  (1 rupayat pik vima) म्हणजेच फक्त 1 रुपये एवढाच खर्च ठेवला आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली आहे याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार मित्रांनो यासाठी 3312 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगितलं, यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल आणि शेतकऱ्यांचे हजारो रुपये वाचतील.

पिक विमा कोण काढू शकतो

राज्यात पुढील तीन वर्षांसाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यासाठी ११ विमा कंपन्या निश्चित करण्यात आल्या आहेत. यंदापासून एक रुपयात पीक विमा काढता येईल. तर काढणीपश्चात नुकसानीसाठी ३० टक्के तंत्रज्ञान आधारित भारांकन निश्चित केले जाईल.केंद्र सरकारने यंदापासून पीक विमा योजना राबविण्यासाठी नवीन कार्यपद्धती निश्चित केली आहे. तसे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले होते. मागील वर्षीपासून राज्यात ८०: ११० म्हणजेच नफा-तोटा हस्तांतरण मॉडेलनुसार पीक विमा योजना राबविण्यात येते. ही योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठी भाडेकरार आवश्यक आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बीसाठी दीड तर खरीप आणि रब्बी असा एकत्र पाच टक्के राहील. यंदापासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेला पीकनिहाय प्रतिहेक्टरी विमा हप्ता दर, तसेच उर्वरित फरक हा सर्वसाधरण विमा हप्ता अनुदान समजून राज्य सरकार भरणार आहे. या योजनेसाठी या आधी प्रत्येक वर्षी विमा कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती. या वर्षीपासून केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील तीन वर्षांसाठी ही योजना राबविण्यात येईल. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी तीन वेळा मुदतवाढही देण्यात आली. त्यानंतर ११ कंपन्या निश्चित केल्या आहेत. खरीप हंगामासाठी ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण देण्यात येईल.

पीक वर्गवारी-खरीप हंगाम


तृणधान्य व कडधान्य पिके : भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मूग, उडीद, तूर, मका
गळीत धान्य पिके : भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन
नगदी पिके : कापूस, खरीप कांदा.
रब्बी हंगाम
तृणधान्य व कडधान्य : गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिराईत), हरभरा, उन्हाळी भात.
गळीत धान्य पिके : उन्हाळी भुईमूग
नगदी पिके : रब्बी कांदा

जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कंपन्या


नगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा : ओरिएंटल इन्शुरन्स कं. लि.
परभणी, वर्धा, नागपूर : आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.
जालना, गोंदिया, कोल्हापूर : युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं. लि.
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड : चोलामंडलम एम एस. जनरल इन्शुरन्स कं. लि.
वाशीम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार : भारतीय कृषी विमा कंपनी
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे : एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि
यवतमाळ, अमरावती, गडचिरोली : रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.
उस्मानाबाद : एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कं. लि.
लातूर : एसबीआय जनरल इन्शुरन्स कं. लि.
बीड : भारतीय कृषी विमा कंपनी

महाराष्ट्र शासन पीक विमा 2023 बाबत शासनाने निर्णय काढलेला जीआर पाहण्यासाठी खाली क्लिक करा ????????????

पिकविमा 2023 जीआर येथे पहा

योजनेचे वेळापत्रक


शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :

  • खरीप २०२३ (३१ जुलै)
  • खरीप २०२४ आणि २०२५ (१५ जुलै)
    रब्बी हंगाम : ३० नोव्हेंबर ः ज्वारी, १५ डिसेंबर ः गहू, बाजरी, हरभरा, कांदा व इतर पिके,
    ३१ मार्च : उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग..
  • यासाठी मिळणार विमा
  • हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान
  • पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग
  • स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान
  • नैसर्गिक कारणांमुळे होणारे काढणीपश्चात नुकसान
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बोअरवेल अनुदान योजना | बोअरवेल मारण्यासाठी २०००० रूपये अनुदान मिळेल.

बोअरवेल अनुदान योजना | बोअरवेल मारण्यासाठी २०००० रूपये अनुदान मिळेल.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा ...
जीबी व्हाट्सअप डाउनलोड कसं करायचं | जीबी व्हाट्सअप म्हणजे नक्की काय. | Download GB WhatsApp.

जीबी व्हाट्सअप डाउनलोड कसं करायचं | जीबी व्हाट्सअप म्हणजे नक्की काय. | Download GB WhatsApp.

WhatsApp Feature : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपचे अनेक फायदे आहेत ...
कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कसा करावा? (How to Apply for  Kadaba Kutti Machine Subsidy Scheme):

कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कसा करावा? (How to Apply for  Kadaba Kutti Machine Subsidy Scheme):

कडबा कुट्टी मशीन अनुदान मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ...
पी एम किसान ची लाभार्थी स्थिती पहा | pm kisan beneficiary status check

पी एम किसान ची लाभार्थी स्थिती पहा | pm kisan beneficiary status check

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र मधून ...
इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

इलेक्ट्रिक मोटर पंप योजना| मोटार पंप योजना | electric motor pump yojna

Motor Pump Yojana – महाराष्ट्रमध्ये शेतीचे क्षेत्र हे खूप मोठे ...
ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

ऑनलाईन 7/12 उतारा कसा डाऊनलोड करायचा | सातबारा उतारा महाराष्ट्र|7/12 online Maharashtra

प्रत्येक शेतकऱ्याची शेजाऱ्या बरोबर काही ना काही तक्रार असते तक्रार ...
हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड करा | hotstar app download

हॉटस्टार ॲप डाऊनलोड हॉटस्टार ॲप तुम्ही तुमच्या टीव्हीवर किंवा मोबाइल ...

Leave a Comment