हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

पंजाबराव डख हे हवामान खात्याचे प्रसिद्ध अभ्यासक असून त्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी हवामानाचा अंदाज दिला आहे. त्यांच्या अचूक अंदाजामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत, पेरणी आणि इतर कृषी कामे योग्य वेळेत करता आली आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान कमी झाले आहे.

पंजाबराव ढग यांनी एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर अतिवृष्टीचा अंदाज दिला होता. त्यांचा अंदाज बरोबर ठरला पण पाऊस इतका झाला की त्यांचे स्वतःचे पाच एकरचे सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले. व पंजाबराव डख यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले .

पंजाब डख यांचा व्हिडिओ

शेतातील मोठे नुकसान

परभणी जिल्ह्यात राहणारे पंजाबराव डख यांच्या गावात मुसळधार पाऊस पडल्यामुळे संपूर्ण गाव पुरसदृश्य स्थितीत आले आहे. त्यांचं जवळपास 6-7 एकर क्षेत्रातील सोयाबीन पिक वाहून गेले आहे. या अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पंजाबराव डख यांनी सरकारकडे विनंती केली आहे की, तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जावी.

हवामानाचा अंदाज आणि आर्थिक नुकसान

पंजाबराव डख यांनी सहा सप्टेंबर दरम्यान राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यांचा हा अंदाज बरोबर ठरला, पण तरीही त्यांच्या शेतातील सोयाबीन वाहून गेल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मराठवाडा आणि विदर्भात सध्या पावसाचे थैमान सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुरामुळे नुकसान

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. यामुळे अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हिंगोली, नांदेड, परभणी यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे पाण्यात गेले आहे. अनेक जनावरे देखील पुरामुळे दगावली आहेत. नांदेड जिल्ह्यातील दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, ज्यामुळे खरीप हंगाम पाण्यात गेला आहे.

प्रशासनाची कार्यवाही

सध्याच्या परिस्थितीत हतनूर धरणाचे दरवाजे उघडले आहेत, ज्यामुळे तापी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परंतु, पावसामुळे जनजीवनावर गंभीर परिणाम झाला आहे. खुलताबाद तालुक्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. अशा घटना राज्यभरात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष

पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज हा शेतकऱ्यांसाठी नेहमीच उपयुक्त ठरलेला आहे. मात्र, यावर्षी खूप जास्त पाऊस पडल्यामुळे त्यांनी स्वतःचं मोठं नुकसान सहन केलं आहे. सरकारने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करा. | Track live location from mobile.

मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लोकेशन ट्रॅक करा. | Track live location from mobile.

ॲप वरून लाइव्ह लोकेशन पहा - तुम्ही मोबाईल नंबरद्वारे एखाद्याचे ...
पॅन कार्ड (ई पॅन कार्ड) ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

पॅन कार्ड (ई पॅन कार्ड) ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

पॅन कार्ड डाउनलोड मराठी आता तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड सहज ...
तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

तुमचे मतदान कार्ड डाऊनलोड करा

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण मतदान कार्ड मोबाईल वरून pdf ...
ऊस लागवडीबाबत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन.

ऊस लागवडीबाबत संपूर्ण माहिती व मार्गदर्शन.

उसाची लागवड तीन हंगामात करता येते: आडसाली हंगाम, पूर्व हंगाम ...
टोमॅटो शेती बाबत संपूर्ण माहिती |शेती.

टोमॅटो शेती बाबत संपूर्ण माहिती |शेती.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टोमॅटोला जास्त मागणी असल्यामुळे टोमॅटोची शेती ...
आधार कार्ड कसे डाउनलोड करावे | how to download Aadhar card.

आधार कार्ड कसे डाउनलोड करावे | how to download Aadhar card.

मोबाइलमध्ये आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे? प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे ...
पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी | poultry loan bank list.

पोल्ट्री व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी | poultry loan bank list.

शेतीसह पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. पण अनेकांकडे पैसा ...
शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शासनाची शिलाई मशीन योजना ही एक कल्याणकारी योजना आहे ...

Leave a Comment