मुख्यमंत्री वयोश्री योजना 2025 | मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपयांचा लाभ.

Mukhyamantri vayoshri yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही महाराष्ट्र शासनाची ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली एक कल्याणकारी योजना आहे.ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येणार आहे.  65 वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना एक रकमी आर्थिक सहाय्य करून देणे. हे उद्दिष्ट मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.ही योजना ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली.ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र आणि सन्मानाने जगण्यास मदत करणे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेची पात्रता

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे :

  • अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले महाराष्ट्रातील नागरिक.
  • अर्जदाराचे वार्षिक कुटुंबीय उत्पन्न ₹1 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार आणि त्यांच्या पती/पत्नी यांच्या नावावर कोणतीही मालमत्ता (जमीन, घर, दुकान इ.) नसावी.
  • अर्जदार आणि त्यांच्या पती/पत्नी यांना कोणतीही नियमित पेन्शन (जसे की सरकारी पेन्शन, विधवा पेन्शन) मिळत नसावी.
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षांचा निवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार आणि त्यांच्या पती/पत्नी यांच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी काय करावे लागेल याबाबत संपूर्ण माहिती पहा.????

मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून मिळणारे लाभ

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा हा ज्येष्ठ नागरिकांना खूप चांगल्या प्रकारे याचा उपयोग होणार आहे .तो म्हणजे,65 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी ₹3,000/- एकरकमी आर्थिक मदत दिली जाते.ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी मदत मिळते.ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.या योजनेत  अपंग व्यक्तीसाठी व्हीलचेअर, तसेच हृदयविकार , दमा इतर आजार असणाऱ्यांसाठीऑक्सीजन कंझंट्रेटर, स्पाइनल ब्रेस इत्यादींसारख्या इतर उपकरणांसाठीही अनुदान पुरवले जाते. तसेच या योजनेअंतर्गत कृत्रिम दात बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. दृष्टी उपकरणे ,श्रवण यंत्र अशा उपकरणांसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत अनुदान मिळते.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे :

  • आधार कार्ड(मोबाईल नंबर लिंक असावा).
  • जन्म प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार कार्यालयाकडून मिळवलेला)
  • बँक खाते
  • निवास प्रमाणपत्र/रहिवासी दाखला
  • ज्येष्ठ नागरिकांचा ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (2)

अतिरिक्त कागदपत्रे (जर लागू असल्यास) :

  • विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास वैद्यकीय अपंगत्वाचे प्रमाणपत्र

टिप :वरील कागदपत्रांची झेरॉक्स असणे आवश्यक आहे.कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी  असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

सर्वात चांगले तात्काळ लोन देणारे पाच ॲप कोणते आहेत पहा.????

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा.

या योजनेसाठी आपण दोन प्रकारे अर्ज करू शकतो ,ऑफलाइन ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया खाली दिलेली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत:

  • खाली दिलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक कल्याण विभागाच्या वेबसाईट ओपन करा.https://sjsa.maharashtra.gov.in/
  • ओपन झाल्यावर मुख्यमंत्री वयोश्री योजना या लिंकवर क्लिक करा.
  • त्यामधील नवीन नोंदणी बटणावर क्लिक करा.
  • तुमच्यापुढे एक फॉर्म ओपन होईल .त्यामध्ये आवश्यक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक इत्यादी माहिती टाका.
  • आवश्यक कागदपत्रांची स्कॅन  करून पीडीएफ अपलोड करा .
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा .

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत :

आपल्या जवळच्या सामाजिक कल्याण कार्यालयात जा. तेथे जाऊन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा फॉर्म मिळवा.फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.आवश्यक कागदपत्रांची सर्व प्रती जोडा,  अर्जाची छाननी करून अर्ज व फॉर्म सामाजिक कल्याण कार्यालयात जमा करा.

मुख्यमंत्री  वयोश्री योजनेचा फायदा :

योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार सुविधा मिळतात.यात मोफत औषधे, चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, काठी इत्यादींचा समावेश आहे.यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या आरोग्याची सुविधा मिळते आणि त्यांची जीवनमान उंचावण्यास मदत होते. ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा मिळते आणि त्यांचं जीवन आनंदी आणि सुरक्षित बनण्यास मदत होते. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी ₹3000/- आर्थिक मदत मिळते.ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्वावलंबन मिळते आणि त्यांचं जीवन सक्रिय बनण्यास मदत होते.

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या घ्या, एक लाखात कार तर पंधरा हजार रुपयांमध्ये टू व्हीलर घ्या.????

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी निश्चित पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी ज्येष्ठ नागरिक जवळच्या ग्रामपंचायत, नगरपालिका कार्यालय किंवा जिल्हा सामाजिक न्याय कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे अनेक आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक वरदान योजना आहे.

कामगार योजना 2023 संपूर्ण माहिती| bandkam kamgar yojna.

कामगार योजना 2023 संपूर्ण माहिती| bandkam kamgar yojna.

बांधकाम कामगार योजना 2023: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण ...
शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजनेची माहिती

शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजनेची माहिती

शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या पशुपालन विभागाकडून ...
पॅन कार्ड (ई पॅन कार्ड) ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

पॅन कार्ड (ई पॅन कार्ड) ऑनलाइन कसे डाउनलोड करावे?

पॅन कार्ड डाउनलोड मराठी आता तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड सहज ...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना |Annasaheb patil loan bank list|आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना |Annasaheb patil loan bank list|आण्णासाहेब पाटील कर्ज योजना

आण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र शासन राज्यातील युवकांच्या भविष्यासाठी विविध ...
पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा.

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही एक सरकारी योजना आहे ...
फवारणी यंत्र अनुदान, करा ऑनलाईन अर्ज | sprayer machine subsidy Maharashtra

बॅटरी पंप योजनेसाठी अर्ज करा |apply for battery pump yojna.

बॅटरी पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहितीसाठी खालील ...
सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन | सोयाबीन कीड नियंत्रण

सोयाबीन पिकावरील कीड व्यवस्थापन | सोयाबीन कीड नियंत्रण

सोयाबीनवर विविध कीटकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, एकूण 272 विविध ...
बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पद्धत| Biogas subsidy scheme apply

कसा करणार अर्ज ? Biogas subsidy scheme संबंधित पशुपालकाने आवश्यक ...

Leave a Comment