टोमॅटो शेतीसाठी पीक संरक्षण | टोमॅटो शेती चे कीड व रोग व्यवस्थापन

पीक संरक्षण : 

रोग टोमॅटोमध्ये प्रामुख्याने मर, करपा, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच फळे पोखरणारी अळी, नागअळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. 

मर :  हा बुरशीजन्य रोग असून, झाडे अचानक वाळू लागतात. उपटलेल्यानंतर मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास रोप मरगळलेली, माना पडलेली दिसतात.

  नियंत्रण ः रोपांच्या मुळांजवळ खुरप्याने रेघा ओढून कॉपर ऑक्‍सिक्‍लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची जिरवण करावी. लागवडीनंतर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची प्रतिझाड ५० ते १०० मि.लि. प्रमाणे जिरवण करावी.

करपा :  यात लवकर येणारा व उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात.

नियंत्रण ः मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटरप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.

विषाणूजन्य रोग :  टोमॅटोमध्ये प्रामुख्याने ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस व पर्णगुच्छ (लिफकर्ल व्हायरस) हे विषाणूजन्य रोग आढळतात. त्यांचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी यामुळे होतो. या किडींचे नियंत्रण केल्यास रोगांचे प्रमाण कमी ठेवता येते.

किडीच्या नियंत्रणासाठी: प्रोफेनोफॉस किंवा डायमेथोएट १५ ते २० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. रोग शेतामध्ये आढळल्यास झाडे उपटून नष्ट करावीत. 

फळे पोखरणारी अळी :  ही अळी पाने खाते. नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते. 

नियंत्रण ः क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. हेलीओथिस न्युक्‍लिअर पॉलिहेड्रोसीस व्हायरस (एचएनपीव्ही) विषाणूजन्य कीटकनाशक २०० मि.लि. प्रति २०० लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारावे.

नागअळी :  या अळ्या पानांच्या पापुद्र्यामध्ये शिरून हिरवा भाग खातात. परिणामी पानांच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते.

नियंत्रण ः रोपांची लागवड करतेवेळी अशी पाने काढून टाकावीत. ४ टक्के निंबोळी अर्काच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात.  अळीचे प्रमाण वाढल्यास अबामेक्‍टीन ४ मि.लि. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत शेळी पालन करण्यासाठी तब्बल 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान.

राष्ट्रीय पशुधन अभियानात आता ४० टक्के अनुदानावर शेळी, कुक्कुट व ...
प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना | मल्चिंग पेपर साठी ५०% अनुदान मिळणार

प्लॅस्टिक मल्चिंग पेपर अनुदान योजना | मल्चिंग पेपर साठी ५०% अनुदान मिळणार

मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध अशा योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये भाजीपाला ...
कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

कोटक महिंद्रा बँकेत खाते काढण्याची प्रक्रिया

सोप्या पद्धतीने कोटक बँकेत खाते काढण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेची प्रक्रिया ...
शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

शासनाकडून दुधाला 34 रुपये प्रति लिटरचा दर जाहीर

दुधाचा किमान 40 रुपये भाव (Milk Price Rate) मिळावा, अशी ...
हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

पंजाबराव डख हे हवामान खात्याचे प्रसिद्ध अभ्यासक असून त्यांनी शेतकऱ्यांना ...
आता आवश्यक खतांसाठी १००% अनुदान मिळणार | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

आता आवश्यक खतांसाठी १००% अनुदान मिळणार | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून ...
एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

एलआयसी कडून मिळवा पाच वर्षात दामदुप्पट | म्युच्युअल फंड| Life Insurance Of India gives you double your money in 5 years

कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक ...
नाबार्ड पशुपालन योजना 2024: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ऑनलाईन अर्ज

नाबार्ड पशुपालन योजना 2024: शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य ऑनलाईन अर्ज

नाबार्ड पशुपालन योजना: भारतातील पशुपालनाला चालना देणारी एक महत्त्वाची योजना ...

Leave a Comment